गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:46+5:302021-06-26T04:13:46+5:30

परभणी शहरातील दर्गा रोड भागात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातून शेख इम्रान शेख अमीर व शेख ...

6 people attacked the shooter with a sword | गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीने हल्ला

गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीने हल्ला

परभणी शहरातील दर्गा रोड भागात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातून शेख इम्रान शेख अमीर व शेख सलीम शेख अमीर (रा. एकमिनार मस्जिद) हे जात होते. यावेळी शेख इम्रान याने जुन्या वादातून बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगून एकावर गोळीबार केला; मात्र समोरील व्यक्ती पळून गेल्याने पिस्टलमधील गोळी एका कारला (एमएच १२ पीक्यू ०५०३) लागली. यामध्ये शेख इस्माईल शेख युनूस (रा.वसमत, जि.हिंगोली) यांच्या वाहनांचे नुकसान झाले. यावेळी एका घराच्या पाठीमागून मोहम्मद रिजवान, अली चाऊस, रिजवान खान, मोहम्मद रिजवान ऊर्फ एमआर यांचे वडील, झिया व अन्य एक इसम आले. त्यातील एकाजवळ तलवार होती. त्याने व नंतर त्याच्याकडून तलवार घेऊन इतरांनी शेख इम्रान शेख अमीर व शेख सलीम शेख अमीर यांच्यावर हल्ला केला. यात शेख इम्रान हा गंभीर जखमी झाला. यानंतर मारहाण करून आरोपी पळून गेले. या दोन्ही घटनेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख सलीम शेख अमीर यास अटक केली आहे तर अन्य एक जण दवाखान्यात उपचार घेत आहे. तलवारीने मारहाण केलेल्या घटनेतील सर्व सहा आरोपी शुक्रवारी दुपारपर्यंत फरार असल्याची माहिती कोतवालीचे सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी दिली. या दोन्ही घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक तुरनर करीत आहेत. दरम्यान, ही घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Web Title: 6 people attacked the shooter with a sword