शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५ हजारांची लाच; बिडीओसह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

By राजन मगरुळकर | Updated: February 28, 2025 13:24 IST

पाथरीमध्ये पंचायत समितीच्या आवारामध्येच एसीबीच्या पथकाची कारवाई

परभणी : तक्रारदार यांच्या ७ विहिरींच्या वर्क ऑर्डर मिळण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाला मंजूर करण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी ३५ हजारांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाचेची रक्कम गट विकास अधिकारी यांच्या सांगण्यावरून बाह्यस्त्रोत कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने स्वीकारली. ही सापळा कारवाई पाथरी पंचायत समितीत गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.

ईश्वर बाळू पवार, गट विकास अधिकारी पं.स. आणि गोवर्धन मधुकर बडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पं.स.पाथरी अशी आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदार यांनी पंचायत समिती पाथरीमध्ये झरी ग्रामपंचायत अंतर्गतच्या ७ विहिरींचे वर्क ऑर्डर मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. ते वर्क ऑर्डर मंजूर करण्यासाठी एका विहिरीचे पाच हजार याप्रमाणे ३५ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लोकसेवक ईश्वर पवार यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार गुरुवारी तक्रारदाराने दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानुसार पडताळणीत लाच रक्कम स्वीकारण्यास संबंधिताने सहमती दर्शविली. सायंकाळी पं. स. आवारात सापळा कारवाईत आरोपी लोकसेवक गोवर्धन बडे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून ३५ हजार लाचेची रक्कम लोकसेवक ईश्वर पवार यांच्या सांगण्यावरून स्वीकारली.

घर झडतीत मिळाले ६३ हजारलोकसेवक गोवर्धन बडे यांच्याकडे अंगझडतीत ३५ हजार लाचेची रक्कम व त्या व्यतिरिक्त रोख ८ हजार व लोकसेवक ईश्वर पवार यांच्याकडे रोख सहा हजार मिळाले. लोकसेवक ईश्वर पवार व बडे यांचे पंचायत समिती पाथरी शासकीय वसाहतीत निवासस्थानाची घर झडती घेतली असता ईश्वर पवार यांच्या घरझडतीत ६३ हजार रोख मिळाले. संबंधित दोघांविरुद्ध पाथरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी, पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, निलपत्रेवार, रवींद्र भूमकर, सीमा चाटे, नामदेव आदमे, अतुल कदम, कल्याण नागरगोजे, श्याम बोधनकर, जे.जे.कदम, नरवाडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी