शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत २३ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : ओरिसा राज्यातून परभणीत विक्रीसाठी आणलेला २२ किलो ७५७ ग्रॅम गांजा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : ओरिसा राज्यातून परभणीत विक्रीसाठी आणलेला २२ किलो ७५७ ग्रॅम गांजा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शहरातील बसस्थानक परिसरात जप्त केला आहे. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

परभणी आणि जालना जिल्ह्यात विक्री करण्यासाठी काहींनी गांजा आणल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून पथकातील कर्मचाऱ्यांनी दिवसभर शोध मोहीम राबविली. गांजा घेऊन आलेेले काही जण बस स्थानक परिसरातील एका लॉजमध्ये थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आली. यावेळी १ लाख १३ हजार ७८५ रुपये किमतीचा २२ किलो ७५७ ग्रॅम गांजा, एक दुचाकी, एक मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हा गांजा ओरिसा राज्यातून परभणी आणि जालना जिल्ह्यात विक्री करण्यासाठी आणला असल्याची माहिती या आरोपींनी पोलिसांना दिली. दरम्यान, एन.डी.पी.एस. कायद्यानुसार ९ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे तपास करीत आहेत.

सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक बापुराव दडस, उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, दीपक मुदीराज, विष्णू भिसे, अरुण कांबळे, आरेफ कुरेशी, गणेश कौटकर, कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, कर्मचारी राजेश आईटवाड, बालाजी लटपटे, रामा कदम यांनी ही कारवाई केली.