शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून मारहाणप्रकरणी २२ जणांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:22 IST

पार्डी (ता. मानवत) येथे शिवाजी दौलत खराबे व त्रिंबक रामराव खराबे यांच्यात शेतीचा वाद होता.

परभणी : शेतीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात परभणी येथील न्यायालयाने २२ जणांना वेगवेगळ्या कलमांखाली दोन महिने कारावासाची शिक्षा आणि  ६३ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. १४ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निकाल सुनावला.

पार्डी (ता. मानवत) येथे शिवाजी दौलत खराबे व त्रिंबक रामराव खराबे यांच्यात शेतीचा वाद होता. यातून २ आॅक्टोबर २०११ रोजी दोन्ही गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी शिवाजी दौलत खराबे यांनी मानवत ठाण्यात तक्रार नोंदविली होती. न्यायालयात दोषारोपपत्र  दाखल झाल्यानंतर परभणी येथील चौथे सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षी, पुराव्यांती २२ आरोपींना कलम १४८ अंतर्गत १५ दिवसांची शिक्षा आणि ५०० रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत १५ दिवसांची शिक्षा आणि ५०० रुपये आणि कलम ३२४ अंतर्गत एक महिना शिक्षा आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणातील रामराव वामनराव खराबे हे मयत झाले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली.

यांना झाली शिक्षान्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये सटवा रावण सौदागर, वन्या पनेश चव्हाण, सुरेश सूर्यभान चव्हाण, जेकर्ण्या गाखेल चव्हाण, जनाबाई तानाजी गोरे, लक्ष्मीबाई सटवाजी सौदागर, राजामती किसन नितनवरे, कमलाबाई जगन चव्हाण, रेणुका जकरण्या चव्हाण, जयाबाई ऊर्फ लता पनेश चव्हाण,  जगन चव्हाण, देवीदास रामराव खराबे, संतोष शामराव खराबे, गंगाधर रामराव खराबे, भानदास रामराव खराबे, रामराव वामनराव खराबे, दिगंबर त्र्यंबक खराबे, जगन गंगाधर खराबे, किशन वामन खराबे, दत्ता किशन खराबे आणि छत्रगू भानुदास खराबे, त्र्यंबक रामराव खराबे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCourtन्यायालयjailतुरुंगPoliceपोलिस