शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास १९ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:46 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला शासनाने सुधारित अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यापीठास १९ कोटी २० लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

परभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला शासनाने सुधारित अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यापीठास १९ कोटी २० लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २१ मार्च रोजी अद्यादेश काढून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुधारित अंदाजानुसार कार्यक्रमांतर्गत  योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या चारही विद्यापीठांना सुधारित अनुदान वितरित करण्यात आले. 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ९ कोटी २१ लाख ८९ हजार रुपयांचे वेतनेत्तर सहाय्यक अनुदान या शासन आदेशानुसार प्राप्त झाले आहे. वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी विद्यापीठाकडे १० कोटी रुपयांची मूळ तरतूद होती. पूरक अनुदान व मूळ तरतूद अशी ११ कोटी ५२ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद होती. प्रत्यक्षात ९ कोटी २१ लाख ८९ हजार रुपये विद्यापीठास प्राप्त झाले असून तरतुदीच्या तुलनेत २ कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची तूट झाली आहे. राज्य शासनाच्या कृषी व पशू संवर्धन विभागाच्या कार्यासन अधिकारी भारती धुरी यांनी हे अनुदान मंजूर केले आहे. अनुदान मंजूर करीत असताना ते उपविभागीय कृषी अधिकार्‍यांच्या नावे दिले असून उपविभागीय कृषी अधिकार्‍यांनी हे अनुदान कृषी विद्यापीठाच्या नियंत्रकांना अदा करावयाचे आहे. तसेच ज्या योजनेसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. त्याच योजनेसाठी खर्च करावा, असे स्पष्ट निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. 

अनिवार्य योजनेतूनही विद्यापीठास अनुदानशासनाने अन्य एका अद्यादेशाद्वारे सुधारित अंदाजानुसार अनिवार्य योजनेसाठीही अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. शासनाच्या या आदेशानुसार पीक संवर्धन या लेखाशिर्षाखाली निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ५७ कोटी ६६ लाख ५६ हजार, वेतनेत्तर सहाय्यक अनुदान ६ कोटी ८१ लाख ८४ हजार, वेतनासाठीचे सहाय्यक अनुदान ८९ कोटी ८८ लाख ८७ हजार असे १५४ कोटी ३७ लाख २७ हजार रुपये वितरणास मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे पशू संवर्धन लेखाशिर्षाअंतर्गत इतर संस्थांना सहाय्य करण्यासाठी वेतनेत्तर सहाय्यक अनुदान ७ लाख ४ हजार रुपये तर वेतनासाठीचे अनुदान  १ कोटी ८८ लाख १७ हजार असे १ कोटी ९५ लाख २१ हजार रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. सर्वसाधारण या लेखाशिर्षाखाली निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ५ कोटी ८६ लाख १२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शैक्षणिक फीसाठी ९ कोटी ९९ लाख राज्य शासनाने याच अध्यादेशाद्वारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ९ कोटी ९९ लाख रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी सहाय्यक अनुदान म्हणून वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी जेवढी तरतूद उपलब्ध केली होती. तेवढीच तरतूद राज्य शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न निकाली निघाला आहे.

टॅग्स :Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठparabhaniपरभणीMONEYपैसाState Governmentराज्य सरकार