शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

परभणी जिल्ह्यातील विकास कामांना 134 कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 3:57 PM

सुमारे २०० कोटी रुपयांचा हा आराखडा असून, त्यात विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविकास कामांसाठी निधीची गरज

परभणी :  राज्याच्या वित्त विभागाने जिल्हा वार्षिक योजनांसाठी १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्याला या निर्णयानुसार १३४ कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. कोरेानाच्या संकटामुळे सात महिन्यांपासून ठप्प असलेल्या विकास योजनांसाठी आता या निधीची प्रतीक्षा सुरू झाली आहे. 

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास योजना राबविल्या जातात. शिक्षण, आरोग्य, रोजगार या योजनांसह भौतिक सुविधाही नियोजनच्या निधीतून उपलब्ध केल्या जात आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात वर्षभरासाठी करावयाच्या योजनांचा आराखडा तयार केला जातो. यावर्षी एप्रिल महिन्यात जिल्हा  नियोजन समितीचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला. 

सुमारे २०० कोटी रुपयांचा हा आराखडा असून, त्यात विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र विकास आराखडा तयार झाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचे संकट निर्माण झाले. त्यामुळे सर्व योजना ठप्प आहेत. याच काळात राज्य शासनाने विकास कामांवरील निधीला कात्री लावली. नियोजन समित्यांना एकूण तरतुदीच्या ३३ टक्केच निधी वितरित करण्यात आला असून, यातील बहुतांश निधी कोरोनाच्या संकटासाठी आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

जिल्हा नियोजन समितीला यावर्षी ३३ टक्क्यांप्रमाणे ६६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी २० कोटी ९ लाख रुपये कोरोनासाठी आरोग्य विभागाला देण्यात आले. उर्वरित निधी विकास योजनांवर खर्च करू नये, अशा सूचना असल्याने विकास कामे ठप्प आहेत. शिल्लक राहिलेल्या निधीतून जुन्या कामांवर खर्च केला जात आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील विकास कामे ठप्प असून, उर्वरित ६७ टक्के निधीची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे. याच दरम्यान, राज्याच्या वित्त विभागाचे सहसिचव व.कृ. पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनांसाठी १०० टक्के निधी वितिरत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याला १३४ कोटी रुपयांची प्रतीक्षा लागली आहे. 

जिल्ह्यातील विकास कामे सध्या ठप्पचजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांनी विकास कामांचे नियोजन केले आहे. तसा आराखडाही सादर करण्यात आला आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने सध्या तरी ही कामे ठप्प आहेत. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा लागली आहे. 

नियोजन विभाग सुधारित सूचना करणारवित्त विभागाने १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेलता असला तरी नियोजन विभागातून अद्याप तशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. निधी वितरित करताना नियोजन विभागातून मार्गदर्शक सुधारित सूचना दिल्या जातील. त्यानुसार निधी प्राप्त झाल्यानंतर इतर यंत्रणांना तो वितरित केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी