शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बारा पोलीस कर्मचारी निलंबित; प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा भोवला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 12:47 IST

शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे़

ठळक मुद्देप्रशासकीय कामकाजात सुधारणा आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांची उपाय योजना १२ पोलीस कर्मचाऱ्यांना समज देऊनही त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा नसल्याने निलंबन

परभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे़ या संदर्भातील आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले़.

प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत़ या अंतर्गत शासकीय सेवेत हलगर्जीपणा करणे, शिस्तभंग करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच गैरहजर राहणे, कर्तव्यात कसूर करणे आदी प्रकरणी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना समज देऊनही त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाला नसल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहेत.  या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे़ .

यांना केले निलंबित

पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार कारभारी दादाराव वाघमारे, राजेश सत्यनारायण वाजपेयी, श्रीधर रामराव खोकले, गजानन शिवाजी पाटील, व्यंकट संभाजी बिलापट्टे, विजय नागनाथ उफाडे, जिंतूर ठाण्यातील निहाल अहमद नूर पटेल, विनायक मारोतराव भोपळे, पोलीस नियंत्रण कक्षातील सुरेश सटवाजी पानझडे, पाथरी पोलीस ठाण्यातील संतोष उत्तमराव जोंधळे, नानलपेठ पोलीस ठाण्यातील संतोष अन्सीराम जाधव व गंगाखेड पोलीस ठाण्यातील सुरेश कानोबा मोरे या १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसparabhaniपरभणीsuspensionनिलंबनParbhani spपोलीस अधीक्षक, परभणी