शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने येलदरी धरणाचे 10 दरवाजे पुन्हा उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 15:36 IST

सध्या 10 दरवाजामधून 16 हजार 800 क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

ठळक मुद्देयाआधी दि. 17 रोजी रात्री 1:15 मिनिटाला 10 दरवाजे उघडलेले होते. दि. 19 रोजी सकाळी 8 वाजता 6 दरवाजे बंद करून 4 दरवाजे सुरू ठेवण्यात आलेसध्या धरण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे  या धरणाचे 10 दरवाजे दि 20 ऑगस्ट रोजी दुपारी  1:55 वाजता पुन्हा उघडण्यात आले आहेत. याआधी दि. 17 रोजी रात्री 1:15 मिनिटाला 10 दरवाजे उघडलेले होते. दि. 19 रोजी सकाळी 8 वाजता 6 दरवाजे बंद करून 4 दरवाजे सुरू ठेवण्यात आले होते.

येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे येलदरी धरणात येवा वाढला आहे, सध्या 10 दरवाजामधून 16 हजार 800 क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

यावर्षी येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. तसेच या धरणाच्या वरील बाजूला असलेले खडकपूर्णा धरण शंभर टक्के भरल्याने या धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. हे पाणी येलदरी धरणात दाखल होत असल्यामुळे ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी धरणातून पाणी सोडावे लागणार आहे.

प्रकल्पातून पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. सध्या धरण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून, नागरिकांना या परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक पाणी पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे

टॅग्स :DamधरणparabhaniपरभणीRainपाऊस