दिराकडून भावजयीला मारहाण

By Admin | Updated: May 7, 2014 01:02 IST2014-05-06T20:57:51+5:302014-05-07T01:02:31+5:30

सांगोला : तू नीट वागत नाहीस, बाहेरख्याली आहेस, असे म्हणून संतप्त दिराने भावजयीस चाबकाने फोडून जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बलवडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. अनिता बाळासाहेब शिंदे (वय ३८, रा. बलवडी) असे जखमी महिलेचे नाव आहे.

Darwati kills Bhavaiya | दिराकडून भावजयीला मारहाण

दिराकडून भावजयीला मारहाण

सांगोला : तू नीट वागत नाहीस, बाहेरख्याली आहेस, असे म्हणून संतप्त दिराने भावजयीस चाबकाने फोडून जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बलवडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. अनिता बाळासाहेब शिंदे (वय ३८, रा. बलवडी) असे जखमी महिलेचे नाव आहे.
अनिता शिंदे व भानुदास शिंदे हे दीर भावजय शेजारी शेजारी राहत असून मंगळवारी दु. १ वा. अनिता जनावरांना पाणी पाजत असताना दीर भानुदास याने तिच्या घरासमोर येऊन तू नीट वागत नाहीस, तू आमच्या शेजारी राहायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करीत चाबकाने मांडीवर, पाठीवर, हातावर मारले. त्याच चाबकाच्या दांड्याने डोकीत मारून जखमी केले. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिता शिंदे हिने दीर भानुदास शिंदे याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. तपास हवालदार फुलचंद सानप करीत आहेत. 

Web Title: Darwati kills Bhavaiya