शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

वाईट रिझ्युमे तुमची नोकरी घालवू शकतो!

By admin | Updated: June 17, 2016 18:34 IST

मग काय नुकतेच कॉलेज पास-आऊट मित्रांनो! नोकरीचा शोध सुरू झाला की नाही. नातेवाईक, शेजारीपाजारी आणि घरच्यांनी एव्हाना नोकरीविषयी विचारणासुद्धा सुरू केली असेल.

- मयूर देवकर
 
उत्तम रिझ्युमे लिहिण्यासाठी आवश्यक ८ गोष्टी!
 
मग काय नुकतेच कॉलेज पास-आऊट मित्रांनो! नोकरीचा शोध सुरू झाला की नाही. नातेवाईक, शेजारीपाजारी आणि घरच्यांनी एव्हाना नोकरीविषयी विचारणासुद्धा सुरू केली असेल. 
पूर्वी छान होतं ना!
आपले काका-मामा किंवा वडिलांचे मित्र एखाद्या आॅफिसातील साहेबांना शिफारस करत आणि केवळ त्यांच्या शब्दावर नोकरी मिळायची. पण आज केवळ शिफारस किंवा शब्दावर नोकरी मिळत नाही. ती मिळते तुमचं टॅलण्ट आणि शिक्षण पाहून. तुमचं हे टॅलण्ट कंपनीला मुलाखतीच्याही आधी तुमच्या ‘रेझ्युमे’वरून दिसत असतं. त्यामुळे ‘जॉब हंट’मध्ये रेझ्युमे हे  एक आपले सर्वात प्रभावी शस्त्र ठरतं.
प्रत्येक एचआर मॅनेजर किंवा रिक्रुटमेंट आॅफिसर एकच सांगेन की, हजारो जॉब अ‍ॅप्लिकेशन्सच्या ढिगाºयात तुमचा रेझ्युमे वेगळा उठून दिसला तरच मुलाखतीला बोलावणं येण्याची शक्यता जास्त असते. रेझ्युमेवर केवळ सहा सेकंद नजर फिरवून मॅनेजर्स/कंपनी तुमची पात्रता ठरवतात, असं ‘द लॅडर्स’ संस्थेने केलेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे.
एवढ्या कमी वेळात जर ‘बिग इम्प्रेशन’ निर्माण करायचं असेल तर  पारंपरिक रेझ्युमे  प्रभावी ठरणार नाही. 
‘मॉडर्नाइज युअर रेझ्युमे : गेट नोटिस्ड, गेट हायर्ड’ या पुस्तकाच्या लेखिका वेंडी एनेलोव्ह यांनी आजच्या ‘अल्ट्रा-टेक्नो’ युगात, जिथे काही कंपन्या सॉफ्टवेअरद्वारे रेझ्युमे पडताळणी करतात, तिथं सर्वोत्कृष्ट रेझ्युमे कसा असावा याबाबत काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्या अशा -
 
1. संपर्क माहितीला प्राधान्य द्या
कंपन्यांचे मॅनेजर अतिव्यस्त असतात. त्यामुळे रेझ्युमेत तुमचा ई-मेल हायपरलिंक करणं त्यांच्यासाठी अधिक सोयिस्कर आहे. केवळ एका क्लिकवर ते तुमच्याशी संपर्क करू शकतील. कॉन्टॅक्टमध्ये ‘लिंक्डइन’ प्रोफाईलची अ‍ॅक्टिव्ह लिंक देता आली तर उत्तम. 
 
2. रंग आणि डिझाईन
तुमच्या फिल्डनुसार रेझ्युमेचा लूक असावा. (उदा. ग्राफिक डिझाईनरसारखी क्रिएटिव्ह फिल्ड असेल रेझ्युमे सजावटीला अधिक वाव आहे.) प्रोफेशनल दिसण्यासाठी केवळ हेडर्स रंगीत करा. इतर माहिती काळ्या रंगातच राहू द्या. ‘टाईम्स न्यू रोमन’ फॉन्ट आता कालबाह्य झाला आहे. त्याऐवजी कॅम्ब्रिया, कॅलिब्री किंवा जॉर्जिया हे फॉन्ट वापरावेत.
 
3. आॅब्जेक्टिव्ह आता आऊटडेटेड
रेझ्युमेमधील ‘आॅब्जेक्टिव्ह’ कॉलम आता अप्रचलित झाला आहे. कंपनीचे लक्ष आकर्षित करण्यासाठी रेझ्युमेची सुरूवात ‘प्रोफेशनल सिनॉप्सिस’ने करा. यामध्ये अनुभव, जॉब हिस्ट्री, करिअर अचिव्हमेंट्स यांची माहिती नमुद करा. 
 
4. नजर खिळवून ठेवा
कॉम्प्युटर स्क्रीनवर वरून सलग खालीपर्यंत कोणी वाचत नाही. केवळ नजर फिरवली जाते. त्यामुळे रेझ्युमेची रचना अशी करा की, पाहणाºयाची नजर योग्य ठिकाणी खिळून राहिल. तुमचे ‘प्लस पॉर्इंट’ त्याच्या नजेरस पडावेत म्हणून त्यांना बोल्ड किंवा अधोरेखित करा.
 
5. क्रिएव्हिट टर्म वापरा
रेझ्युमेमध्ये तुमची भाषा प्रमाण व प्रभावी हवी. एखाद्या गोष्टीला अधिक क्रिएटिव्हपणे मांडू शकतो का? या शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरता येईल का? याचा विचार करा. म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर, ‘कस्टमर सर्व्हिस’ ऐवजी ‘क्लायंट रिलेशन्स’ असं लिहिलं तर नक्कीच अधिक प्रभाव पडेल.
 
6. ‘स्किल’ लिहिताना कौशल्य दाखवा!
उमेदवार त्याचे कौशल्य कामात कसे वापरतो यामध्ये कंपनीला अधिक रस असतो. त्यामुळे रेझ्युमेमध्ये वेगळ्या कॉलममध्ये तुमचे कौशल्य लिहिण्याऐवजी ते ‘वर्क एक्सपेरियन्स’मध्ये सोदाहरण लिहा. अपवाद :  विशिष्ट कौशल्यावर आधारित नोकरीसाठी (उदा. आयटी सेक्टर) अर्ज करताना ‘स्किल’ कॉलम राहू द्यावा.
 
7. रेझ्युमेची लांबी
बºयाच जणांना असा प्रश्न असतो की, रेझ्युमे किती मोठा किंवा किती पानांचा असावा. प्रचलित गैरसमज असा आहे की, रेझ्युमे जेवढा जास्त मोठा तेवढा इम्प््रोसिव्ह. पण तसे नसते. दहा-वीस किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असलेला उमेदवाराने दोन-तीन पानांचा रेझ्युमे बनवला तर ते योग्य आहे. पण कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या पदवीधराने तसे करणे धोक्याची घंटा आहे.
 
8. थोडक्यात; पण महत्त्वाचे
अति शब्दबंबाळ रेझ्युमे वाचण्यास वेळ कोणाकडे आहे? त्यामुळी तशी चुक करू नये. केवळ महत्त्वाची तेवढीच माहिती रेझ्युमेमध्ये असावी. तीदेखील मुद्देसुद आणि बुलेट्सने दर्शवलेली. अ‍ॅक्टिव्ह व्हर्ब (सकर्मक क्रियापदे), तत्सम क्षेत्राशी सुसंगत संक्षिप्त रुपांचा वापर करण्यावर भर द्यावा.