तुमच्या पाऊसवाटेची गोष्ट
By Admin | Updated: July 10, 2014 19:01 IST2014-07-10T19:01:43+5:302014-07-10T19:01:43+5:30
पावसाची लपाछपी सुरूच आहे.दुष्काळाचं सावट आहे. आषाढ सुरू झालाय.

तुमच्या पाऊसवाटेची गोष्ट
>पावसाची लपाछपी सुरूच आहे.
दुष्काळाचं सावट आहे.
आषाढ सुरू झालाय.
तरी मुसळधार सरी काही अजून फार कोसळत नाही.
असा हा पाऊस जीवघेणा.
आला तरी छळतो.
न येऊन जीव खातो.
कधी भर पावसात मनाची लाही लाही होते.
तर कधी हा पाऊस नुस्ता शिंतडून गेला तरी
मनभर गारवा पसरतो.
असा प्रत्येकाचा पाऊस वेगळा.
प्रत्येकाच्या मनातला नाचरा मोर वेगळा.
प्रत्येकाच्या पावसात भिजल्या ओल्या आठवणी वेगळ्या.
त्या आठवणींचं एक पान
‘ऑक्सिजन’शी शेअर करायची ही तुम्हाला एक खास संधी.
तुमच्या मनातलं पाऊस वाटून घ्यायची एक
खास पाऊसवाट.
तुमचा स्वत:चा पाऊस. तो कसाही असेल.
एका छत्रीत भिजणारा तुफान रोमॅण्टिक.
बाईकवरून फिरला असेल रानोमाळ.
ङिाम्माड पावसात कधी कपभर चहानं
जुळलं असेल नवं नातं.
तर कधी भर पावसात हरवलं असेल सर्वस्व.
पेटलं असेल मन. आणि कधी पोटातल्या आगीचा डोंब या पावसानंही विझला नसेल. किती आठवणी असतील तुमच्या
फक्त. तुमच्या पावसाच्या.
त्या तुमच्या आमच्या पावसाच्या आठवणींनी सजवूया एक अंक.
त्यासाठीच तर ही एक खास पाऊसवाट तुमच्यासाठी.
लिहा मग.
आणि पाठवा तुमच्या पाऊस आठवणींचा पाऊस.
पत्ता - नेहमीचाच, शेवटच्या पानावर तळाशी.
अंतिम मुदत - 20 जुलै 2014
पत्रवर - ‘पाऊसवाट’ असा उल्लेख करायला विसरू नकाच.