आपलं माणूस कायमचं जाण्यापूर्वी.
By Admin | Updated: April 10, 2015 13:40 IST2015-04-10T13:40:07+5:302015-04-10T13:40:07+5:30
फक्त एकदाच. आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना.. प्लीज!

आपलं माणूस कायमचं जाण्यापूर्वी.
>
फक्त एकदाच.
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी
हाक मारा त्यांना..
प्लीज!
***
आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा,
मीच का एसएमएस करू,
आणि कधीतरी जिवाभावाचं माणूस अशा ठिकाणी निघून जातं,
जिथे नेटवर्क पोहचत नाही,
आपलं माणूस नॉट रिचेबल होण्यापूर्वी,
एक फोन कराल त्यांना.
प्लीज.!
**
आपण असतो फार बिझी,
वेळच नाही,
कुठं जायला फुरसत नाही,
जिवाभावाची माणसं आठवतसद्धा नाहीत,
आपण कधी पत्र लिहित नाही,
ख्यालीखुशाली विचारत नाही,
त्यांचे बर्थडे आपल्याला आवडत नाही,
त्यांच्या आठवांनी मन काहूर करत नाही.
आणि मग एकदिवस येतो निरोप,
ते ‘नसल्याचा’.
आणि जातो फक्त दारावर,
कधीही न होणा:या भेटीसाठी.
असं होण्यापेक्षा
कधीतरी पाच मिण्टं वेळ काढता नाही का येणार,
थोडावेळ भेटून गप्पा मारता नाहीच का येणार.
प्लीज.
त्या गप्पांना वेळ द्याच.
प्लीज.
***
हे सारं कळतं आपल्याला,
पटतंही.
मात्र तरीही आपण आपल्याच आयुष्यात
बांधलेले,
आपले दोर काचलेले.
त्या काचल्या दोरांपायी
कुणाशी शेवटची भेट झाली नाही
असं होऊ नये.
आणि जिवंत असलेली माणसं कायमची दुरावू नये,
म्हणून एकदाच.
मनापासून हाक माराल प्लीज.
आपल्या माणसांना.