1/10 सेकंदात तुमची परीक्षा !

By Admin | Updated: September 4, 2014 16:31 IST2014-09-04T16:31:32+5:302014-09-04T16:31:32+5:30

तोंडाला वास, कुतरडलेली नखं, नाकात बोटं, कानात मळ, कपडय़ांना वास, केसांचा अवतार हे सारं असेल तर तुम्ही फॅशनेबल कसं दिसाल ? स्वत:ला ग्रूम करायचंय तर काही गोष्टी शिकाव्याच लागतील.

Your exam in 1/10 seconds! | 1/10 सेकंदात तुमची परीक्षा !

1/10 सेकंदात तुमची परीक्षा !

>
प्राची खाडे, स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर
 
‘नेव्हर जडज अ बूक बाय इट्स कव्हर’ म्हणजेच फक्त कव्हर पाहून पुस्तक चांगलंय की वाईट हे ठरवू नये. असं मानू नये असं म्हणण्याचे दिवस आता गेले, चांगल्या पुस्तकाचं कव्हर त्या पुस्तकाहून चांगलं असायला हवं, तर लोक पुस्तक हातात घेतात अशा काळात आपण राहतोय. पॅकेजिंग महत्त्वाचं ठरतंय ! मग आपले कपडे, आपलं दिसणं हा झाला आपला बाह्य लूक. आपलं कव्हरच. ते गचाळ असून कसं चालेल. स्टायलिंगचे नियम सांगताना मी नेहमी काही बेसिक सांगते. लोकांना वाटतं हे तर काय सगळ्यांनाच माहिती आहे. पण अनेकांना ते माहितीच असलं तरी प्रत्यक्षात ते त्याच त्या चुका करतात. आणि अनेकजण केवळ त्यांच्या दिसण्यामुळेच मागे राहतात.
तसं होऊ नये, म्हणून आज काही बेसिक गोष्टीं विषयी बोलू. कारण आजच्या इंटरनेटच्या युगात फक्त एक दशांश सेकंदात तुमचं फस्र्ट इम्प्रेशन तयार होतं, त्यावरुन लोकं तुमच्याविषयी मतं बनवतात असं आमचा स्टायलिंगचा अभ्यास सांगतो. त्यामुळे स्वत:चं दिसणं सुधरावायचं असेल तर या पाच गोष्टी आपल्या जगण्याचा भाग तातडीनं व्हायला हव्यात.
 
1) धुरकट, बुरकुलांचे कपडे .
वाचून कसंतरी वाटेल पण अनेक  लोक धुरकट, रंग उडालेले, बुरकुलं आलेले कपडे सर्रास वापरतात. अनेकांच्या कपडय़ांवर तर चक्क डाग असतात. इस्त्री कधी असते कधी नाही. त्यामुळे असे कपडे वापरू नका. एकावेळी अनेक कपडे घेऊन तेच ते वापरण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं कपडे घ्या. म्हणजे असे जुनाट कपडे वापरावे लागणार नाहीत.
2) नो, तडकफडक अॅक्सेसरीज
कुणी सांगितलं महागडय़ा अॅक्सेरीज वापरल्या पाहिजेत किंवा अॅक्सेसरीज वापरल्याच पाहिजेत म्हणून! शूज, बेल्ट, बॅग, घडय़ाळं हे जर वापरणार असाल तर ते स्वच्छ, टापटीप वापरा. मळलेले असू नये इतकंच. त्यात अनेकजण भलेमोठे गॉगल वापरतात. महत्त्वाच्या मिटिंगला जाताना असे गॉगल वापरू नयेत. नजरेत नजर घालून बोलता यायला हवं. तेच मुलींचं भरमसाठ काहीतरी घालतात, वेस्टर्नवर ट्रॅडिशनल घालतात. तसं करु नका, ते वाईट दिसतात. तेच गंडेदोरे, ताबीज, काळेदोरे, खडय़ांच्या अंगठय़ा, हे सारं अती नको. त्यातून तुम्ही ‘डिपेण्डण्ट’ आहात, आत्मविश्वास कमी आहे, असं सहज कळतं.
3) भडक रंग कुठं वापराल?
फॅशन आणि स्किन टोन म्हणून ही रंगांची चर्चा नाहीये.  तुम्ही ज्या वातावरणात आहात त्या वातावरणाला शोभतील असे कपडे घाला. त्याची निवड करताना साधा कॉमनसेन्स लागतो. इण्टरव्ह्यूला जाताना काळे कपडे घालू नयेत, तसं लगAाला जाताना गबाळं जाऊ नये इतकं सिम्पल लॉजिक.
4) स्वत:वरच मेहनत
केस टापटीप, वेल स्टाईल्डच असले पाहिजे, केसांचा अवतार तुमचं गबाळेपण सांगतं.
 अती मेकप नकोच, भडक लिपस्टिक तर नाहीच नाही. भडक नेलपेण्ट, तुटलेली नखं अत्यंत वाईट आणि तुमची असलीयतच सांगतात.
5) नखं कुरतडता? नाकात बोटं?
कोण असं करतं? अनेकजण त्यांच्याही नकळत हे सारं करतातच. दात पिवळे, केस घाणोरडे, नाकात बोटं, कुरतडलेली नखं, तोंडाला वास हे सारं आपल्याकडे अत्यंत कॉमन आहे. त्यामुळे आपलं असं काही होतंय का, हे पहा. डिओ मारून हे सारं झाकलं जात नाही हे लक्षात ठेवाच.
 
 
 

Web Title: Your exam in 1/10 seconds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.