रस्त्यावरचं तरुण मरण
By Admin | Updated: September 24, 2015 15:45 IST2015-09-24T15:45:18+5:302015-09-24T15:45:18+5:30
लहानसहान चुकांमुळे होणारे रस्ते अपघात, त्याला जबाबदार नक्की कोण?

रस्त्यावरचं तरुण मरण
> हेल्मेट कशाला?
बोडख्यावर ओझं?
डोक्याला ताप?
काही गरज नाही,
काही होत नाही.
असं वाटतं तुम्हाला?
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
गाडीवर असताना मोबाइल वाजला
की लगेच उचलता तुम्ही?
तिरकं होत होत बोलता,
गाडी चालूच.
काहीच महत्त्वाचं नसतं,
तरी बोलता?
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
मुलींनी चेह:याला स्कार्फच गुंडाळायचा असतो,
तसा तुम्ही गुंडाळता? फार फॅशन कॉन्शस आहात?
काय म्हणता फक्त चेहरा महत्त्वाचा!
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
संताप झाला, चिडचिड झाली की,
ती कुठं काढणार?
रस्त्यात खड्डा दिसला की मुद्दाम गाडी त्यात घालायची,
जोरात आदळायची.
संताप कमी होतो आपला असं वाटतं तुम्हाला?
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
बुंगाट गाडी चालवायला आवडतं?
सुसाट, फास्ट.
एक्सिलेटर नुस्तं पिळता तुम्ही?
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
कुणी जरा ओव्हरटेक करून गेलं की,
तुमचा इगो हर्ट होतो,
त्याच्या पुढे गाडी दामटायची शर्यत,
मागून हॉर्न वाजला तरी
तुमचा संताप होतो,
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
काय नाय होत,
एवढं काय बिघडत नाही गाडी जोरात चालवल्यानं,
उगीच अति काळजी नको असं वाटतं तुम्हाला,
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
कॉलेजात मुलींवर शायनिंग मारायचं,
मागे बसलेल्या गर्लफ्रेण्डला इम्प्रेस करायचं
म्हणून गाडी दामटता तुम्ही,
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
सिग्नलवर तुम्ही थांबत नाही,
वळताना सिग्नल देत नाही,
गाडीला आरसा नाही की हॉर्न नाही,
मग जीव धोक्यात आहे तुमचा!
तुम्हाला कायमच उशीर झालेला असतो,
कायम घाई, कायम धावपळ
तुम्ही घाईघाईतच कुठंही जायला निघता,
मग जीव धोक्यात आहे तुमचा!