आपणच आपले बॉस
By Admin | Updated: May 22, 2014 16:17 IST2014-05-22T16:17:16+5:302014-05-22T16:17:16+5:30
नाकासमोर नोकरी करणार्या जगापेक्षा उद्योग हे जग वेगळं दिसू शकेल. बघा, जमतंय का स्वत:च्या पायावर उभं राहणं.

आपणच आपले बॉस
>नोकरीला लागणं आणि धंद्यात पडणं असं म्हणतात. मराठी माणूस म्हणजे हमखास धंद्यात ‘पडणार’ असाच एक समज. त्यापेक्षा नाकासमोर नोकरी बरी.. कशाला नस्ते ‘उद्योग’ करायचे? व्यवसाय करणं आपल्या रक्तातच नाही .-असा एक पूर्वीचा जुनाट समज. तो कुणी आणि कसा मोडून काढायचा? तो मोडता येतो का? आपल्याच गावात, आपल्याच अवतीभोवतीच्या माणसांच्या गरजा ओळखून एखादा छोटासा उद्योग सुरू करायचा, स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा तर काय लागतं? असा व्यवसाय कुणालाही सुरू करता येऊ शकतो का? केलाच सुरू तर तो व्यवसाय चालतो का? मुळात तो व्यवसाय कशाच्या भरवशावर सुरू करायचा? भांडवल कुठून आणायचं? पैशाची सोंगं कुठून आणणार?
मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं? या सार्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारा हा विशेष अंक.
धंद्यात पडा. असं सांगणं सोपं, पण ते कसं पडावं? पडताना आपल्याला नक्की काय माहिती हवं? काय केलं तर ‘न पडता’ धंद्यात उभं राहू शकता येतं याचा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट देणारा हा अंक वाचा. नाकासमोर नोकरी करणार्या जगापेक्षा हे जग वेगळं दिसू शकेल. बघा, जमतंय का स्वत:च्या पायावर उभं राहणं.