शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

फ्रान्समध्ये पिवळं जॅकेट घालून तरुण रस्त्यावर का उतरले आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:44 IST

यलो वेस्ट चळवळ फ्रान्सच्या सत्तेला आव्हान देतेय, कोण आहेत हे पिवळ्या जॅकेटवाले?

ठळक मुद्देफ्रान्समध्ये काही तरु णांनी  येऊन सुरू केलेली ही यलो वेस्ट चळवळ आता कुठल्या दिशेनं जाते हे पहायचं.

 - कलीम अजीम

गेल्या तीन महिन्यांपासून फ्रान्समधले तरुण जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. डिसेंबर महिन्यात एकीकडे जगातील सर्व तरुणाई न्यू इअर सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त होती, तर दुसरीकडे त्याचवेळी फ्रान्समधले तरु ण इमॅनूअल मेक्र ॉ सरकारच्या निर्णयाविरोधात रस्ते जाम करत होते. पिवळं जॅकेट परिधान केलेल्या हजारो तरु णांनी संपूर्ण पॅरीस शहर वेठीस धरलं होतं. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि कररचनेतील वाढीविरोधात हे आंदोलन होतं.नोव्हेंरबला सुरू झालेलं हे आंदोलन डिसेंबर येता रौद्र रूप धारण करून गेलं. हळूहळू करत फ्रान्सची तरुण जनता एकजुटता दाखवत सरकारविरोधात रस्त्यावर उतरली. आंदोलनामुळे रस्ते, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठान, शॉपिंग मॉल सगळे बंद झाले. एकवेळ परिस्थिती अशी आली की सरकार आणीबाणी जाहीर करण्याच्या तयारीत होतं. फ्रेंच जनता सरकारला वेठीस धरून जाचक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत होती. पण सरकार काही मागे हटायला तयार नव्हतं. परिणामी जनतेचा आक्र ोश वाढत राहिला. पिवळं जॅकेट घातलेल्यांचं हे आंदोलन एव्हाना जगभर पसरलं आणि  ‘यलो जॅकेट मूव्हमेंट  जगभर चर्चेचा विषय ठरली.’तर ही सगळी चळवळ सुरू कशी झाली?ऑक्टोबरला चेंज ओआरजी या वेबसाइवर इंधन दरवाढीविरोधात एक निवेदन आलं. सामाजिक कार्यकत्र्या  सीन-एट-मर्ने यांनी हे निवेदन पोस्ट केलं होतं. तब्बल 3 लाख लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या. कुणीतरी हे निवेदन सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, 17  नोव्हेबरला देशभरातील सर्व रस्ते बंद करून विरोध प्रदर्शन करावं.  हा मेसेज व्हायरल झाला. आवाहनानंतर काहीजण ट्रॅफिक पोलीस वापरत असलेला पिवळा रेडिअम जॅकेट घालून रस्त्यावर उतरले. लोकांचं लक्ष आपल्याकडे वळावं यासाठी पिवळं जॅकेट घालण्यात आलं. हे जॅकेट लांबून चमकत असल्यानं ते सहज लोकांचं लक्ष वेधून घेत होतं. लक्ष वेधण्याची ही शक्कल कामाला आली व आंदोलनाची व्याप्ती देशभरात वाढली.फ्रान्समध्ये 2008 च्या एका कायद्यानुसार प्रत्येक वाहनधारकांना आपल्या गाडीत हे जॅकेट ठेवणं अनिवार्य करण्यात आलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने हे जॅकेट कम्पलसरी करण्यात आलं आहे. कारण रस्त्यावर गाडी खराब झाली की हे जॅकेट घालून बाहेर पडावं लागतं. गेल्या काही विरोधी आंदोलनात हे जॅकेट सांकेतिक पद्धतीने घालण्यात आलंही होतं. पण यावेळी हे जॅकेट मोठय़ा आंदोलनाचं सिम्बॉल म्हणून पुढं आलं. तब्बल 84 हजार आंदोलकांनी यलो वेस्ट परिधान करून सरकारच्या नाकी नऊ आणले. तज्ज्ञांच्या मते गेल्या 50 वर्षात फ्रान्समध्ये अशा प्रकारचं आंदोलन झालेलं नाही. 1871 सालच्य़ा पॅरीस कम्यूननंतर 1968 साली विद्याथ्र्यानी जाचक नियमाविरोधात अशाच प्रकारचं आंदोलन फ्रान्समध्ये केलं होतं. ज्याने आजही जगाच्या इतिहासात मोठी जागा पटकावलेली आहे.आता ही चळवळ आकार घेते आहे.फ्रान्समध्ये सध्या डिझेलचा दर  121  रु पये प्रतिलिटर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही किंमत तब्बल 23 टक्क्यांनी वाढली आहे. या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या कररचना वाढल्यानं लोकांचं वेतन मोठय़ा प्रमाणात कपात होणार आहे. फ्रेंच जनतेने या धोरणांचा तीव्र विरोध केला. राष्ट्रपती इमॅनूअल मेक्र ॉ सरकारच्या या जाचक धोरणाविरोधात जनता संघटित झाली. त्यातून ‘यलो वेस्ट’ मूव्हमेंट  आकाराला आली.राष्ट्रपती इमॅनूअल मेक्र ॉ यांनी संवादासाठी आंदोलकांना बोलावलं. पण आंदोलकांनी संवाद करण्यास नकार दिला. आधी दरवाढ मागे घ्यावी त्यानंतर संवाद होईल, असा पावित्ना आंदोलकांनी घेतला होता. सरकारने विविध प्रकारे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, फ्रेंच जनता संघटित राहिली. या आंदोलनात 10 लोकांचा मृत्यू झाला असून, 18 हजार लोक जखमी झालेली आहेत, तर 5 हजारपेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या विरोधी आंदोलनामुळे फ्रेंच सरकारचे 17 अब्ज डॉलर म्हणजे 1.19 लाख कोटींचं नुकसान झालेलं आहे. बघता-बघता यलो जॅकेट मूव्हमेंट शेजारी राष्ट्रात पोहोचली. वाढत्या महागाईविरोधात इटली, बेल्जिअम आणि नेदरलॅण्डमध्ये विरोधी आंदोलनं सुरू झाली. पण ती यशस्वी होऊ शकली नाही.मात्र फ्रान्समध्ये काही तरु णांनी  येऊन सुरू केलेली ही यलो वेस्ट चळवळ आता कुठल्या दिशेनं जाते हे पहायचं.

***** 

इंटरनेटच्या  आभासी जगात लाईक कमेंटीत व्यस्त राहणार्‍या तरुणांनी बेसिक प्रश्नांसाठी मोठा लढा उभारला त्याचं हे एक उदाहरण. ‘यलो वेस्ट’ आंदोलनाची व्याप्ती इतकी होती की फ्रान्स सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलं. यलो वेस्टची ही एक छोटीशी ठिणगी फ्रान्सची सत्ता धोक्यात आणण्यासाठी पुरेसी होती. मेक्र ॉ सरकारने हा धोका लक्षात घेऊन येत्या काळात अशा प्रकारची कुठलीच आंदोलनं उभी राहू नये याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी फ्रान्स सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या परवानगीशिवाय कुठलंही आंदोलन केलं तर संघटकांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे.

***

अरब स्प्रिंगला आता 9 वर्षे झालेली आहेत. सोशल मीडियातून उभारी घेतलेलं हे गेल्या दशकातले सर्वात मोठं आंदोलन होतं. इजिप्त, लीबिया, अल्जेरिया, टय़ुनिशिया, मोरोक्को, सुडान या सहा राष्ट्रामध्ये सत्ता हलवून गेला.  फ्रान्सच्या यलो वेस्ट मूव्हमेंट यात भर घातली आहे.

***

यलो वेस्ट आंदोलन तरुणांनी सुरू केलं किंवा उभारलं अशी चर्चा असली तरी त्या आंदोलनाला कुणाचं तरी पाठबळ असावं, अशी चर्चा जगभर आहे. कारण आंदोलनाची नियोजनपूर्वक तयारी करण्यात आली होती. अश्रूधुर, पाण्याचा मारा, रबराच्या गोळ्या आदींपासून बचाव करण्यासाठी विशेष  ट्रेनिंग या तरुणांना देण्यात आलं होतं. अनेक आंदोलकांनी डोक्यावर हेल्मेट व चेहर्‍यावर स्टोल वापरला होता. इतकंच नाही तर प्रत्येकानं  हातात जे येईल ती वस्तू हत्यार म्हणून वापरली होती.