यश चोप्राच्या सिनेमातले नायक-नायिका?

By Admin | Updated: November 6, 2014 17:17 IST2014-11-06T17:08:39+5:302014-11-06T17:17:30+5:30

दोस्तहो. आज जरा स्वच्छ, स्पष्ट बोलू. काही गोष्टी वाचून ‘हर्ट’ व्हाल तुम्ही, कदाचित थोडासा रागही येईल, पण येऊ द्या.

Yash Chopra's hero-heroine in the movie? | यश चोप्राच्या सिनेमातले नायक-नायिका?

यश चोप्राच्या सिनेमातले नायक-नायिका?

दोस्तहो.

आज जरा स्वच्छ, स्पष्ट बोलू.
काही गोष्टी वाचून ‘हर्ट’ व्हाल तुम्ही, कदाचित थोडासा रागही येईल, पण येऊ द्या.
वेळचेवेळी आपला चेहरा आरशात पाहिला की, आपलंच ‘रूप’ जसं आहे तसं दिसतं.
तर मुद्दा, आजच्या अंकातल्या एकदम ज्वलंत विषयाचा.
आंतरजातीय लग्न, आतंरजातीय प्रेम.
त्यावरून घरोघर होणारी वादळ, टेन्शन, इमोशनल ब्लॅकमेलिंग, धमक्यांची सत्रं आणि कुणी कुणासाठी काय केलं याची टॅलीच न होणारी बॅलन्सशिट्स.
अनेक तरुण मुलंमुली या अशा टप्प्यातून जाताना आम्हाला फोन करतात, विचारतात, काय करु, नेमका कसा निर्णय घेऊ?
प्रेमात पडताना आपण पाहतो का, जात धर्म?
मग एकदम लग्न करताना, घरी सांगतानाच का यश चोप्रांच्या सिनेमातल्या नायिकांसारखे वागत घरच्यांच्या ब्लॅकमेलिंगकडे बोट दाखवतो? इतकंच आईबाबांच्या आ™ोत होतो तर मग प्रेमात पडताना, परस्परांना ‘हो’ म्हणण्यापूर्वीच पालकांना विचारायला हवं होतं? पण तसं अनेकजण करत नाही. 
म्हणजे अनेकांना ‘सोयीचं स्वातंत्र्य’हवं असतं. प्रेमात पडताना जातपात न पाहणारे, पण लग्न करायची वेळ येताच घरच्यांचं प्रेशर, समाजाचा दबाव अशी कारणं पुढे करत जातीच्या ढालीआड लपायला लागतात? 
एरव्ही आईवडील खिजगणतीतही नसतात, कपडे कुठले घालायचे, शिक्षण कुठलं घ्यायचं, करिअर कशात करायचं, एवढंच काय मोबाइल फोन कुठला घ्यायचा हे आपलं आपण ठरवणार?
त्यात ‘तुमचा काय संबंध?’
असा उर्मट प्रश्न आईबाबांना सहज विचारणार आणि लग्न करायची वेळ आली की, जातीआड लपत आपल्या आईबाबांवर दोष ढकलणार? ते ऐकत नाही, काय करणार म्हणत रडणार? हे किती ‘सोयिस्कर’ जगणं झालं?
जात जर नकोच असेल तर तिच्याविरोधात ठाम उभं राहण्याचं बळ आपल्यालाच एकवटायला हवं !
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com

Web Title: Yash Chopra's hero-heroine in the movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.