प्रियांका चोप्राची डेनीम स्टाईल आपल्याला शोभेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:02 IST2018-06-21T15:02:08+5:302018-06-21T15:02:08+5:30

जान्हवी कपूरने घातलेली नवी जीन्स स्टाइल पाहिली? निळी जीन्स आणि पांढरा टॉप हे कॉम्बिनेशन परत चर्चेत येतंय.

would you like to try Priyanka Chopra's danim style? | प्रियांका चोप्राची डेनीम स्टाईल आपल्याला शोभेल का?

प्रियांका चोप्राची डेनीम स्टाईल आपल्याला शोभेल का?

ठळक मुद्देकरिना कपूरचाही ऑल डेनिम लूक पहा. एकदम फ्रेश. गडद आणि फिक्या डेनिमच्या शेड वापरून केलेलं पॅचवर्क जॅकेट सुरेख दिसलं. या सोबत वापरलेली बूट कट अँकल जीन्स आपल्याला नवीन ट्रेण्डची चाहूल देऊन गेली. 

-श्रुती साठे

डेनिम हे तरुण-तरुणींच्या  मस्ट  यादीत  हमखास असतंच. प्रत्येकाकडे एकतरी डेनिम जीन्स असतेच. काही लोक आपलं डेनिमवरचं प्रेम पुढे नेत डेनिम स्कर्ट, जॅकेट, शॉर्ट्स, शर्ट यावर न थांबता डेनिमच्या साडय़ासुद्धा वापरताना दिसतात. उन्हाळा असो की पावसाळा, डेनिम नेहमीच ट्रेण्डमध्ये राहिलेलं आपण पाहिलंय.
जान्हवी कपूरने अलीकडेच वापरलेली डेनिम जीन्सची स्टाइल तरुणींनी नक्की ट्राय करून पाहावी अशीच आहे. नेहमीच्या निमुळत्या पायांच्या जीन्स स्टाइलला बगल देत ती बूट कट जीन्समध्ये दिसली. कलर ब्लॉक/पॅचवर्क केलेल्या या जीन्सवर डेनिमचे विविध शेड्स वापरलेल्या दिसल्या. बाकीच्या साध्या लूकमुळे ही स्टाइल उठून दिसली. पॅचवर्क डेनिमबरोबर पांढरा क्र ॉप टॉप, पीप टोज सॅण्डल्स आणि लाइट मेकअप वरून तिने आपला लूक पूर्ण केला.


करिना कपूरचाही ऑल डेनिम लूक पहा. एकदम फ्रेश. गडद आणि फिक्या डेनिमच्या शेड वापरून केलेलं पॅचवर्क जॅकेट सुरेख दिसलं. या सोबत वापरलेली बूट कट अँकल जीन्स आपल्याला नवीन ट्रेण्डची चाहूल देऊन गेली. 
प्रियांका चोप्राही नेहमीच काहीतरी वेगळी स्टाइल वापरून पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रियांकाने निवडलेली हाय वेस्ट जिन्स त्यावर असलेल्या कलर ब्लॉक स्टायलिंगमुळे उठून दिसली. या सोबत वापरलेला पांढरा क्र ॉप शर्ट हाय वेस्ट डेनिमला न्याय देऊन गेला. 
या तिघींनी डेनिम सोबत पांढर्‍या शर्ट/टॉपला पसंती दिलेली दिसून येते आणि परत एकदा  व्हाइट शर्ट आणि  ब्लू जीन्स हे सर्वमान्य क्लासी रंगसंगती आहे हे सिद्ध झालं.

Web Title: would you like to try Priyanka Chopra's danim style?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.