World Naked Bike Ride - तरुण मुलं नग्न होत रस्त्यावर का उतरलेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 07:00 IST2019-08-08T07:00:00+5:302019-08-08T07:00:07+5:30
नग्न होऊन काही तरुण मुलं रस्त्यावर उतरले ते कुणाचा निषेध म्हणून नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठी! जगभर आता ही रॅली पोहोचते आहे!

World Naked Bike Ride - तरुण मुलं नग्न होत रस्त्यावर का उतरलेत?
- कलीम अझीम
जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात पर्यावरण बचावचा संदेश देत मेक्सिको शहरात शेकडो तरुण नग्न अवस्थेत रस्त्यावर होते. ग्लोबल वार्मिंगचे वाढते धोके निदर्शनास आणून देणे या उद्देशाने ‘वर्ल्ड नेकेड राइड’ काढली गेली. जूनपासून मेक्सिको शहरातील ही तिसरी मोठी सायकल रॅली होती. ‘कार संस्कृतीचा निषेध’ असं घोषवाक्य असलेली ही मोहीम जगभरात वाढत आहे. शहरात डिझेल व पेट्रोलवर चालणार्या वाहनांचा वापर टाळावा, यासाठी हा जनजागृतीपर उपक्र म राबविला जात आहे.
शहर वाहतुकीसाठी इंधनावर चालणारी वाहने टाळून सायकलींचा वापर करावा, असा मेसेज या सायकल राइडमधून दिला जात आहे. ह1’ठिं‘ीइ्रि‘ीफ्रीि (हठइफ) नावाने सुरू झालेल्या या ट्रेण्डला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ट्विटर आणि फेसबुकच्या पलीकडे जाऊन या चळवळीने जनआंदोलनाचं स्वरूप घेतलंय.
2004 पासून कॅनडामधून सुरू झालेल्या या मोहिमेला आता जागतिक स्वरूप आलेलं आहे. या शृंखलेत ही राइड अर्जेटिना आणि फिनलँडपासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडपर्यंत 20 देशांमधील 70 शहरांमध्ये पोहोचणार आहे. ‘नेकेड राइड’ या शहरांत जाऊन इंधनावर चालणार्या गाडय़ांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करणार आहे.
9 जूनला मेक्सिको सिटीत एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शेकडो लोकं सामील झालेली होती. फोब्र्जच्या मते शहरात रोज अंदाजे 8 दशलक्ष वाहने रस्त्यावर अडथळा निर्माण करतात. परिणामी सायकलस्वारांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. हे धोके लक्षात घेऊन जूनपासून मेक्सिको सिटीत राइड्स सुरू झाल्या आहेत.
वर्ल्ड नेकेड बाइक राइडमध्ये सहभागी होणारे स्री-पुरु ष पूर्णतर् नग्नावस्थेत असतात. जुलैमध्ये झालेल्या मेक्सिकोतील रॅलीत आंदोलकांवर काही ठिकाणी हल्ले झाले. त्यामुळे आयोजकांनी सहभाग घेणार्यांना रॅलीच्या सुरु वातीला व शेवटी कपडे घालण्याची विनंती केली होती. पोलीस व सार्वजनिक स्थळांचे नियम लक्षात घेता, मेक्सिकोतील आंदोलकांनी शरीरावर पेंटिग्ज करून घेतली. शरीरावर झाडांची पाने, मुळ्या, फांद्या रंगवून वेगळ्या प्रकारे पर्यावरण बचावचा संदेश हे आंदोलक देत आहेत.
मेक्सिकोतील रॅलीत अनेक आंदोलक असेही होते ज्यांनी पूर्ण कपडे परिधान करून आपल्या कपडय़ांवर पर्यावरण रक्षणाच्या घोषणा लिहिल्या होत्या. राइडमध्ये सामील होणारे बरेच लोक त्यांचे शरीर आणि त्यांच्या सायकली कल्पक पद्धतीने सजवतात. आर्ट डिझाइनने सजविलेल्या सायकली व शरीरावरील चित्नकला रस्त्यावर चलणार्या लोकांचे लक्ष सहज वेधून घेतात. वाटसरूंचे लक्ष वळावे यासाठी वेगवेगळ्या रंगांचे व लक्षवेधी कपडे या आंदोलकांनी परिधान केलेली होती. काही रायडर्सनी चेहर्यांवर मुखवटे घातले होते, तर काहींनी आपला चेहरा देशाच्या राष्ट्रध्वजासारखा पेंट केलेला होता.
रॅलीत सहभागी होण्याची अट अगदी साधी आहे. आपल्या शरीरावर पेंट करून किंवा रंगीबेरंगी कपडय़ांनी सजवून, शरीरावर स्लोगन लिहून पूर्णनग्न, अर्धनग्न किंवा फॅन्सी ड्रेसमधील कुठलाही व्यक्ती या रॅलीत सामील होऊ शकतो. प्रत्येक शहरात होणार्या अशा राइडला प्रसारमाध्यमे मोठय़ा प्रमाणात कव्हरेज देतात, अशावेळी अपघातही होतात. त्यामुळे वर्ल्ड नेकेड बाइक राइडने अनेक प्रकारची दक्षता आता घेण्यास सुरु वात केलेली आहे. वर्ल्ड नेकेड बाइक राइडने आपल्या जगभरातील राइडची माहिती आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.
ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेत दरवर्षी सर्वाधिक संख्येने अशाप्रकारच्या राइड्स केल्या जात आहेत.
जगात नग्न होऊन निषेध नोंदविण्याचे अनेक प्रकार होत आहेत. काहीवेळा मानवी नैतिकतेला दोषी ठरवत नग्नता प्रदर्शित केली जाते, तर अनेकवेळा दृष्कृत्याचा निषेध नोंदवायचा म्हणून आंदोलक आपली वस्त्नं उतरवतात. ढासळत्या पर्यावरणाकडे लक्ष वेधण्यासाठी नग्न होण्याचे प्रकार तसे जुनेच आहेत. तरीही सभ्य म्हणवला जाणारा समाज जागा होत नाही, त्यामुळे त्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीनेआंदोलक समाजाला जागे करण्याचा प्रयत्न करतात.
वाढत्या वाहनांमुळे रस्ते आक्र सत आहेत. जगातील कुठल्याही शहरात पायी चालणे आता अवघड होत चालले आहे. त्यामुळे सायकलस्वारांना रस्त्यावर हक्काची जागा मिळावी अशीही मागणी ‘वर्ल्ड नेकेड बाइक राइड’ या मोहिमेतून केली जात आहे. वाढते प्रदूषण ही जगाला भेडसावणारी मोठी समस्या आहे. पर्यावरणाच्या असमतोलाकडे लक्ष दिले नाही तर एकेदिवशी पृथ्वी नष्ट होईल. त्यामुळे शक्य होईल तेवढे हवेचं व ध्वनीचं प्रदूषण टाळून पर्यावरण जतन करणे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे.