World cup special फुटबॉलचो पिसो
By Admin | Updated: June 13, 2014 10:08 IST2014-06-13T10:08:31+5:302014-06-13T10:08:31+5:30
स्वत:ला विसरून फुटबॉल जगणार्या एका खास जगाची सैर

World cup special फुटबॉलचो पिसो
>Hear the whistle
Kick the ball,
The entire world
Sears like an eagle
La la la la
I dare you
-शकीराच्या आवाजातलं हे गाणं ऐकलंच (आणि पाहिलंही) असेल तुम्ही?
ब्राझील वर्ल्डकपचं ऑफिशियल सॉँग.
‘फील हाऊ द प्लॅनेट बिकम वन’,
असं गात शकीरा म्हणते तसं आता एकाच रंगात रंगायला लागेल सारं जग.
येता एक महिनाभर सगळ्या जगात महत्त्वाचा असेल फक्त एकच विषय .
तो विषय, हरण्या-जिंकण्याच्या, रडण्या-हसण्याच्या, चिडण्या-चिडवण्याच्या
खुनशीपणा करण्याच्या आणि पागल होत स्वत:लाही विसरून जाण्याच्या
सगळ्या कहाण्याच बदलून टाकेल.
आयुष्यात एकाएकी फ्री किक मारतील.
वेग.
जोश
कीक.
थरार.
मॅडनेस.
पॅशन.
फायटिंग स्पिरीट.
आणिं एकदम उसळत्या ज्वालामुखीसारखं जगणंच
व्यापून टाकेल एक गोष्ट.
‘फुटबॉल’
त्या ‘फुटबॉल’च्या जगात नेणारा हा एक खास अंक.
आपल्या गोव्याच्या मातीत रुजलेली,
मणिपुरातल्या पहाडात उंच उभारलेली
फुटबॉलची एक खास गोष्ट या अंकात आहे..
त्या गोष्टीतले भारतीय ‘नायक’
भारतीय फुटबॉलला जागतिक स्तरावर नेण्याचं स्वप्न पाहणारे
त्या ‘स्वप्ना’च्या जगाची खिडकी हळूच उघडून
डोकावून पाहिलं तर दिसतं,
द बिग इंडियन फुटबॉल ड्रीम.
ते काय आहे?
पान उलटा आणि वाचा.
ते वाचता वाचता,
तुम्हाला भेटतील
तुमचे आवडते मेस्सी-नेयमार आणि अजूनही काही स्टार फुटबॉलर्स
एका ‘पर्सनल’ रुपात.
वाचा,
आणि शकीरा म्हणते तसा
एन्जॉय करा हा फुटबॉलचा महाजलसा.
ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com