work from home - नो पजामा @ वर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:58 IST2020-05-28T16:57:47+5:302020-05-28T16:58:54+5:30
घरातले कपडे घालूनच कामाला बसता, मग तुमचं वर्क फ्रॉम होम बोअर होणार, कामातही मज्जा येणार नाही, असं काही होम-वर्कर्सचा अनुभव म्हणतोय.

work from home - नो पजामा @ वर्क
- निकिता बॅनर्जी
एव्हाना हा जोक तुमच्याही व्हॉट्सअॅपवर आला असेलच की, आता कपाटातले कपडे बाहेर येऊन विचारायला लागलेत, की जिवंत आहात मालक की.?
- वर्क फ्रॉम होम करताना रोजचे घरातलेच कपडे घातले जातात. ऑफिसला जाण्याचे, फॉर्मल कपडे तर मागेच पडले.
पण आता वर्क फ्रॉम होमचा रेटा वाढतोय तशी चर्चा वाढते आहे की, घरातले जुनाट कपडे घालून काम करण्याचा मूड जातो का?
तेच ते कपडे, तेच वातावरण, तेच रुटीन, त्यानं कामातली ऊर्जा कमी होते, त्याचा परिणाम प्रॉडक्टिव्हिटीवर होतो.
कामच चांगलं आणि भरपूर केलं नाही तर नोकरी कशी टिकणार याकाळात?
त्यामुळे वर्क फ्रॉम होम कसं करावं, स्वत:चा त्रस कसा कमी करावा याविषयी बरीच चर्चा आहे.
त्यातला एक पर्याय असाही अनेकजण सांगतात की, जरा कपडय़ांचा विचार करा.
अनेकजणांनी त्यावर आपले अनुभव सोशल मीडीयात लिहिले, ब्लॉग लिहिले.
ब:याच जणांनी तर स्पष्ट सांगितलं की, गेट आउट ऑफ यूअर पायजमा.
म्हणजे काय?
तर घरात घालायचे कपडे घातले की, अजिबात काम करायचा मूड तयार होत नाही. काहीच बदल होत नाही.
आपला माइण्ड स्वीच काम करत नाही आणि त्यामुळे उदास वाटतं, आपण कामाला भिडलो असं वाटत नाही, असं अनेकांचं म्हणणं.
त्यावर मग अनेकांनी उपाय करुन पाहिले.
त्यातून हाती लागलेल्या या काही सरासरी कॉमन गोष्टी.
1. ऑफिसला जाताना घालायचो, तसे पण कम्फर्टेबल कपडे घाला. आठवडाभराचा सेट काढून ठेवा. तो बदलून रोज वापरा.
2. घरातले कपडे, नाइट ड्रेस, घालून कामाला बसू नका.
3. जरा केस नीट विंचरुन, छान किरकोळ मेकअप करून फ्रेश होऊन कामाला बसा. कुणाला दाखवायचंय, घरातच तर बसायचं आहे असं म्हणू नका.
4. मळलेले कपडे, इस्त्री नसलेले, असा अवतार करून कामाला बसू नका.
5. सगळ्यात महत्त्वाचं, आपले आवडते रंग, आवडते कपडे कपाटातून काढा, घाला. त्यानं कामाचा मूड चांगला राहतो.