ही माध्यमं ‘ताकद’ देतील? सोशल मीडियावरचा संताप कोरडाच!
By Admin | Updated: September 11, 2014 17:15 IST2014-09-11T17:15:01+5:302014-09-11T17:15:01+5:30
सरकारी यंत्रणांशी जिथे जिथे कामासाठी संपर्क येतो, तिथे तिथे त्रास होतो. अनेकांना होतो. सरकारी यंत्रणांचं काम सोपं करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो का?

ही माध्यमं ‘ताकद’ देतील? सोशल मीडियावरचा संताप कोरडाच!
>सरकारी यंत्रणांशी जिथे जिथे कामासाठी संपर्क येतो, तिथे तिथे त्रास होतो. अनेकांना होतो. सरकारी यंत्रणांचं काम सोपं करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो का?
तर होऊ शकतो.
पण सोशल मीडियाचा असं म्हणण्यापेक्षा इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीचा जास्त उपयोग होऊ शकतो. सरकारी कामात चांगल्या अर्थानं बदल करायचा असेल
तर तंत्रज्ञानाच्या मदतीनं नक्की करता येईल. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आयआरसीटीसी’ची वेबसाइट. पूर्वी रेल्वेची तिकिटं काढणं, आरक्षण करणं हा केवढा सायास होता. किती अवघड, भयानक वाटत असे सारं. आता किती सोप्या पद्धतीनं घरबसल्या आपण तिकीट आरक्षण करू शकतं. इंटरनेट एखाद्या व्यवस्थेत किती आमूलाग्र परिवर्तन घडवू शकते याचं हे एक उदाहरणच आहे. निवडणूक आयोगाची वेबसाइटवर अशीच सगळी माहिती मिळते. आपण आता सगळी बिलं घरबसल्या ऑनलाइन भरू शकतो.
डिजिटल माध्यमांचा हा वापर, आपलं जगणं सुखकर करू शकतो. ज्यांच्या या नव्या माध्यमांवर हात आहे, जी तरुण मुलं टेक्नॉलॉजी उत्तम वापरू शकतात त्यांनी या बदलत्या डिजिटल यंत्रणांचा फायदा करून घेणं
शिकलं पाहिजे. त्यातून माहिती तर चटकन मिळेलच पण आपली कामंही जलद-सोप्या आणि पारदश्री पद्धतीनं होऊ शकतील.
ज्या ज्या सरकारी व्यवस्थेनं तंत्रज्ञान वापरून आपली माहिती, सेवा थेट वापरकर्त्यापर्यंत ( एण्ड युजरपर्यंत) पोहोचवली, तिथे मध्यस्थ उरलेच नाहीत. त्या
त्या योजना प्रचंड यशस्वी झाल्या. अशा प्रकारच्या सेवांचा लाभ करून घेणंही आता तरुण मुलांना जमायला हवं!
नुस्तं फेसबुक अर्थात सोशल मीडिया वापरता आल्यानं हे जमेलच असं नाही. सोशल मीडियात आपण त्या यंत्रणेविषयी बोलू शकतो. व्यक्त होऊ शकतो. राग प्रकट करू शकतो. इतरांची मतं ऐकून घेऊ शकतो. तक्रारी मांडू शकतो. मात्र आपण सोशल मीडियात काही अँक्शन नाही करू शकत. ज्यांनी आपले प्रश्न समजून घेऊन कृती करायची ते तशी कृती लगेच करतील का, आपली दखल घेतली जाईल का हे प्रश्न अनुत्तरीत राहतातच.
त्यामुळे आपल्या तक्रारी आणि प्रश्न सोडवण्यासाठी नुस्ता सोशल मीडियावरच संताप पुरेसा ठरेल, असं अजिबात नाही.
याउलट सरकारी यंत्रणा मात्र सोशल मीडिया वापरून व्यक्तिगत स्तरावर एकाचवेळी अनेकांशी संपर्क करू शकतात. एका ट्विटने सगळ्यांना माहिती देऊ
शकतात. आपल्यापर्यंत पोहोचू शकता, आपल्याला माहिती देऊन अपेक्षित गोष्टी व्हाव्यात म्हणून प्रयत्न करू शकतात.
मात्र ही झाली वन वे ट्रॅफिक. लोकांकडची ट्रॅफिक मात्र खाचगळग्यांनी भरलेलीच आहे, असं म्हणावं लागेल.
त्यामुळेच नुस्ता सोशल मीडिया वापरून फार उपयोग होणार नाही, इंटरनेटबेस्ड टेक्नॉलॉजी सरकारी यंत्रणा किती वापरतात, आणि लोक त्याचा जास्तीतजास्त उपयोग करून घेतात, यावर बदल घडू शकेल!
- विश्राम ढोले
माहिती आणि संज्ञापन विषयाचे अभ्यासक