स्वतंत्र, मॉडर्न मुलीही टिपिकल का वागतात?
By Admin | Updated: September 10, 2015 21:50 IST2015-09-10T21:50:31+5:302015-09-10T21:50:31+5:30
तरुणींच्या बाजूने विचार करायचा तर मित्र मान्यकरण्याइतपत मोकळेपणा आता कुठे समाजात येऊ लागला आहे. प्रेम, आकर्षण आणि मानलेला भाऊ यापलीकडे जाऊन कुठल्यातरी निराळ्या कारणासाठी स्त्री-पुरुषानं एकत्र येणं

स्वतंत्र, मॉडर्न मुलीही टिपिकल का वागतात?
तरुणींच्या बाजूने विचार करायचा तर मित्र मान्यकरण्याइतपत मोकळेपणा आता कुठे समाजात येऊ लागला आहे. प्रेम, आकर्षण आणि मानलेला भाऊ यापलीकडे जाऊन कुठल्यातरी निराळ्या कारणासाठी स्त्री-पुरुषानं एकत्र येणं, त्यांची मैत्री असणं हे आता कुठे आपल्या समाजातल्या एका अत्यंत लहानशा घटकाला मान्य व्हायला लागलंय. पण ही मैत्रीही पुन्हा व्यक्तिसापेक्षच असते. काहीवेळा वेवलेंथ जुळते. काहीवेळा एकमेकांकडून बौद्धिक देवाणघेवाण होत असते.
ती मुलींना महत्त्वाची वाटते. कारणं काहीही आणि कुठलीही असली, तरी कालच्यापेक्षा आज तरुणी अधिक मोकळ्या झाल्या आहेत. त्यांना अचानक स्वत:च्या स्वातंत्र्यापासून स्वत:च्या गरजांबद्दल कंठ फुटलेला आहे.
मात्र आपल्याला नक्की काय हवं याबाबत अनेकदा अनेकींनी पुरेसा विचारही केलेला नसतो. त्यामुळे मग त्यांच्या रिअॅक्शन्स सतत बदलतात. एरवी कट्टय़ावर बसून गप्पा झोडणारी मैत्रीण एकदम श्रवणी सोमवार आहे म्हणून लवकर घरी पळाली की ही असं का वागतेय मित्रला समजत नाही. एखादा अॅडल्ट मुवी एकत्र बघताना कसलाही ऑक्वर्डनेस न वाटणारी मैत्रीण, त्यानंतर गप्पागप्पात मित्रने पाठीवर थाप मारली तर रागारागाने त्याच्याकडे का बघतेय हे त्याला समजत नाही. खरंतर अशावेळी तिच्याशी सलगी करण्याचं वगैरे काहीही त्याच्या मनात नसतं. तो आपला सवयीने तसा वागत असतो. पण तिच्या रिअॅक्शन्स बदलतात आणि घोळ होतो.
त्यात एक अपेक्षा कायम असते की, आपल्या मित्रने आपल्याला पुरतं ओळखलं पाहिजे, त्यानुसार वागलं पाहिजे, आपले मूडस्वींग्ज न सांगता त्याला कळले पाहिजे अशा अवाजवी अपेक्षाही असतात. बरं, मित्र हा काही बॉयफ्रेण्ड नसतो, त्यामुळे त्यानं हे सगळं करताना आपण घालून दिलेल्या चौकटीत करणं तिला अपेक्षित असतं. आणि अनेकदा या चौकटीच न समजल्यामुळे तरुणांचा सगळा घोळ होतो. त्यांची घुसमटही होते आणि विचित्र कोंडीही!
ती मूडी नाही,
कन्फ्यूज्ड असते!
‘जरा मोकळं वागलं की मित्र लगेच सुटतात. अरे मोकळं वागले म्हणून काय झालं, कुठे थांबायचं हे समजायला नको?’ - सविता तणतणत होती.
प्रत्येक तरुणीला वाटतं तिच्या आयुष्यात बॉयफ्रेण्डव्यतिरिक्त असा एखादा पुरुष असावा जो तिचा निव्वळ छान मित्र आहे. त्या नात्यात शारीरिक आकर्षण नको, पण सहवासाची ओढ हवी. पुरुषी हक्क गाजवण्याची धडपड नको, पण तिच्यासाठी काळजी हवी. स्पर्श हवा पण त्यात वासनेला जागा नको.
जे मित्र या चौकटी सांभाळू शकतात त्यांच्याशीच सर्वसाधारणपणो तरुणी मैत्री करते. किंवा झालेली ओळख मैत्रीत रूपांतरित होते. अनेकदा तरुणी मनातून खूप वाइल्ड असतात. समाजाने घालून दिलेले सगळे नियम धाब्यावर बसवून वागण्याची त्यांना आतून तीव्र इच्छा असू शकते, पण त्या तसं बरेचदा करत नाहीत. ते त्यांना सोयीचं नसतं आणि समाजमान्यही. त्यामुळे मैत्रिणी त्यांच्या चौकटी तयार करतात, मोडतात, पुन्हा बनवतात. आणि त्यांचे मित्र या सगळ्याशी जुळवून घेता घेता दमून जातात.
ब:याचदा असंही असतं की तरुणींना त्यांच्या ी असण्याचा अचानक उमाळा येतो. अशावेळी मग आपल्या मित्रंनी आपल्याशी मोजूनमापून वागावं असं त्यांना वाटायला लागतं, तर कधी त्यांना स्त्री म्हणून मित्रंनी दाखवलेली सहानुभूती नकोशी वाटते. त्यातून आपले मित्र आपल्याला कुठेतरी कमी लेखतायेत असंही त्यांना वाटायला लागतं.
आणि मित्रंना वाटतं, मैत्रीण किती मूडी आहे.
ब:याचदा समाजाचं प्रेशर असतं. कुटुंबाचं प्रेशर असतं. बॉयफेण्डचं प्रेशर असतं. त्यात आपण टिपिकल नाही असा आव आणलेला असेल तर ही प्रेशर्स हाताळत मित्रची मैत्री तिला टिकवावी लागते. त्यासाठी मग तारेवरची कसरत सुरू होते. मित्र दुखावला जाता कामा नये पण त्याचबरोबर आपल्या अपेक्षित गोष्टी त्यानं केल्या पाहिजेत. आपल्या अपेक्षेप्रमाणो आपल्याला वागवलं पाहिजे असा अट्टहास सुरू होतो. जर मित्रला तिची ही गोची लक्षात आली तर तो स्वत:चं वागणं बदलतं ठेवतो. नाही लक्षात आली तर सगळाच गोंधळ होतो.
या सगळ्यात मैत्री खोलवर रुजलेली असेल तर ते दोघेही तरून जातात. नसेल तर सारंच मोडकळीस येतं. काहीवेळा संपूनही जातं.
प्रेमापेक्षा मैत्रीची वाट अवघड;
पण का?
प्रेम जपण्यापेक्षाही मैत्री जपणं अधिक किचकट असतं.
कारण मुळात या नात्यात कुठेही जाऊन पोचायचं नसतं.
प्रेमात, प्रेमाचा इजहार. डेटिंग. एकमेकांना जाणून घेणं. सहवास. स्पर्श.. पुढे सगळं सुरळीत झालं तर लगA. असे कितीतरी टप्पे गाठत पुढे जायचं असतं. कुठेतरी पोचण्याचा एकत्र प्रवास असतो तो..
पण मैत्रीत कुणालाच कुठेही पोचायचं नसतं. या नात्यात डेस्टीनेशनच नसतं. असतो फक्त प्रवास. सुंदर प्रवास. तो करण्याची मजा घेता आली तर गंमत आहे. नाहीतर मग उरते फक्त तारेवरची कसरत. आणि त्यातून येणारा कंटाळा.
मैत्रीचे जे बंध प्रवासाच्या मध्येच संपतात, त्यांच्यात प्रवासात येणारे खाचखळगे सोसत जाण्याची ताकद नसते. जे नेटाने चालत राहतात. येणारं प्रत्येक वादळ अंगावर घेत मैत्रीची गंमत लुटत पुढे जात राहतात त्यांना आपण कुठे पोचणार याची काळजी नसते.
कारण एकत्र चालण्याच्या आनंदातच ते मशगुल असतात.
अशी मशगुल राहण्याची संधी स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत सर्वाधिक असते. त्यामुळे नात्यात कोण कसा वागतोय याचे ठोकताळे बांधण्यापेक्षा, एकमेकांबरोबर वाढण्याच्या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. त्यातली गंमत शोधता आली पाहिजे.
ती ज्याला जमली त्यांची मैत्री शेवटच्या श्वासार्पयत टिकते. बाकीच्यांचे हात रस्त्यातच सुटून जातात.