आम्ही काय घालायचं, हे तुम्ही कोण ठरवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 07:30 IST2019-04-04T07:30:00+5:302019-04-04T07:30:03+5:30

मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात बंड पुकारणार्‍या मुली काय म्हणतात?

Who will you decide what should girl wear? | आम्ही काय घालायचं, हे तुम्ही कोण ठरवणार?

आम्ही काय घालायचं, हे तुम्ही कोण ठरवणार?

ठळक मुद्दे आम्ही कोणते कपडे घालायचं, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? 

-स्नेहा मोरे

जे. जे. महाविद्यालयात तोकडय़ा कपडय़ांवरून हंगामा झाला. मुलींनी शॉर्ट स्कर्ट घालू नयेत, मुलांशेजारी बसू नये असा आदेश निघाला. काही वेळातच तो मेसेज व्हायरल झाला, अन मग वसतिगृहात एकच खळबळ माजली. मुलींना वेळेचं- कपडय़ांचं बंधन होतंच त्यामुळे असंतोष वाढला. मुंबईसारख्या मेट्रो शहरातील प्रख्यात जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला याचंच अनेकांना नवल वाटलं.
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आदेश दिले अन मग त्यानंतर ते काही दिवस सुटीवर होते. दरम्यान महाविद्यालयात मुलींनी आक्र मक पवित्ना धरला. त्यातल्याच एका विद्यार्थिनीने या बंडखोरीविषयी सांगितले की, अधिष्ठाता कार्यालयासमोर स्कार्फ बांधून ठिय्या सुरू केला. आमच्याच वागण्यावर बंधनंका? आम्हीच का वेळ पाळायची, असं आमचं म्हणणं. काही बदलायचचं असेल तर तुमचे विचार बदला. आता एकविसाव्या शतकात आहोत, आम्ही मॅच्युअर्ड आहोत. डॉक्टर होणार आहोत. आम्ही कोणते कपडे घालायचं, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? 
नुकतीच इंटर्नशिप पूर्ण व्हायला आलेली विद्यार्थिनी सांगत होती. लायब्ररीत थांबायच्या वेळेवरही बंधनं आहेत आणि हे फक्त आमच्याच महाविद्यालयात आहे. हे असं का? आम्हाला नियमांची वेगळी फूटपट्टी का? आम्ही ठरवलं होतं, नियम पाळायचे नाहीतच. बंडखोरी करायलाच हवी. हा संघर्ष केवळ कपडय़ांपुरता मर्यादित नव्हता. ही आमच्या अस्तित्वाची लढाई होती, आज आवाज उठवला नाही तर आमच्यानंतरच्या बॅचलाही हे असले ठोकताळे लावले गेले नसते. महोत्सवाचा दिवस उजाडला, अन वर्षभर तयारी केल्याप्रमाणे आम्ही तयार झालो. थोडं दडपणं होतं मनात; पण आम्ही ठरवल्याप्रमाणे महोत्सवाच्या दिवशी ठरवलेले आमच्या आवडीचे कपडे परिधान करून गेलो. त्यावेळी तेथील सुरक्षारक्षकाने हटकलं खरं, पण आम्ही ऐकलं नाही. आम्ही त्या महोत्सवात सहभागी झालो, रात्नंदिवस काम करताना थकणारे आम्ही वर्षभरातून एकदाच येणारा हा दिवस आम्ही साजरा केला.
 महाविद्यालय प्रशासन घडल्याप्रकाराबाबत चौकशी करणार आहे. मात्न आम्ही त्याला सामोरे जायचं ठरवलं आहे.’
मुली सांगतात की ही आमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आता तूर्तास हे प्रकरण मिटलं असलं तरी मुंबईसारख्या शहरातही मुलींच्या कपडय़ांवरून अजून वादंग होत आहेत आणि त्याविरोधात मुली उघड बंड करत आहेत, हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.


 

Web Title: Who will you decide what should girl wear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.