आमच्याबद्दल आम्ही नायतर कोण लिहिणार? सोळाव्या वर्षी लॉग आउट
By Admin | Updated: November 13, 2014 21:01 IST2014-11-13T21:01:05+5:302014-11-13T21:01:05+5:30
आपण एखादं पुस्तक लिहावं, असं माङया डोक्यात कधीच आलं नव्हतं. मला खूप लहानपणापासून डायरी लिहायची सवय होतीच.

आमच्याबद्दल आम्ही नायतर कोण लिहिणार? सोळाव्या वर्षी लॉग आउट
>
नाव : श्रुती आवटे
पुस्तकाचं नाव - ‘लॉग आउट’
कधी प्रसिद्ध झालं? - सप्टेंबर 2क्14
पुस्तकात काय आहे? - पौगंडावस्थेतील मुलीच्या बदलत्या भावविश्वाची कहाणी.
पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेन्ट-‘मला ही कांदबरी एकूण आवडली. ती रेसी आहे. काळावर नीट बोलते. भावनांचं नीट चित्रण करते आणि अनोख्या अशा पौंगडावस्थेबद्दल आत्मीयतेने बोलते’ - प्रसिद्ध लेखक विश्रम गुप्ते
पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट - आत्तार्पयत तरी एकही नाही.
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
आपण एखादं पुस्तक लिहावं, असं माङया डोक्यात कधीच आलं नव्हतं. मला खूप लहानपणापासून डायरी लिहायची सवय होतीच. पत्र हा लिखाणातला खूप इन्ट्रेस्टिंग प्रकार वाटतो मला. माझी दहावीची परीक्षा संपली त्याकाळात मी जरा अस्वस्थच होते. ती अस्वस्थता कुठल्या तरी माध्यमातून व्यक्त करण्याची गरज आहे असं वाटू लागलं. ज्यात मी पुरेशी कम्फरटेबल असेन नि मी माङो विचार मुळासकट मांडू शकेन असं मला काहीतरी हवं होतं. मी काहीतरी लिहायला सुरुवात केली. डोक्यात साहित्यातला कुठलाच फॉर्म नव्हता. लिखाणाचा स्पीड वाढत गेला नि माङयाही नकळत लिखाणानं कादंबरीचं रूप घेतलं!
हल्लीची मुलं कुठे वाचतात? आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न- शंका मनात आली नाही का?
मुळात पुस्तक लिहायचं असं काही डोक्यातच नसल्यानं अशी काही शंका मनात डोकावलीच नाही. मला वाटलं ते मी लिहिलं. माङयातली हुरहुर, घालमेल, अस्वस्थता मला मांडायची होती. थोडक्यात, मला रिक्त व्हायचं होतं. हे लिखाण कोणी वाचेल-न वाचेल मला त्याची काहीच पर्वा नव्हती. ‘लॉग आउट’ पुस्तकरूपात आल्यावर मात्र मला हे लख्खपणो जाणवलं की, वाचणा:यांची संख्या आपल्याकडे खूप आहे. मी हे पुस्तक लिहिलं सोळा वर्षाची असताना. (आज मी सतरा वर्षाची आहे) मराठीत इतक्या लहान वयात कादंबरी लिहिणारी मी पहिली लेखिका आहे असं मला अनेकांनी सांगितलं. कादंबरीवर अनेकजणांचे अभिप्राय येत आहेत. त्यातले बहुतेकजण माङयाच वयाचे आहेत. यावरून तरु ण मुलं वाचत नाहीत हे मला तरी खरं वाटत नाही.
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला?
खरं तर, पेशन्स आणावाच लागला नाही. अनेकदा मला असं वाटतं की, हे लेखन मी केलेलंच नाही. माङयातली एक अनामिक शक्ती माङयाकडून हे सारं लिहून घेत होती. त्यामुळे मला खरंच नाही माहीत हा पेशन्स कुठून आणि कसा आला माङयात ते. पण जे काही होत होतं ते भन्नाट होतं. मी अगदी घरी, बस स्टॉपवर, लायब्ररीत कुठेही लिहीत सुटले होते.
या प्रोसेसने तुला काय शिकवलं?
या प्रोसेसने मला लिखाणासारख्या दमदार माध्यमाशी कनेक्ट केलं. आणि आपणही या माध्यमातून प्रभावीपणो काही सांगू शकतो याची जाणीव झाली. लिखाणासारख्या माध्यमातून व्यक्त होताना आपण किती बेभान होतो हेदेखील समजलं. पण त्याचबरोबर इतस्तत: विखुरलेली ‘श्रुती’ एकसंध होऊन विचार करू लागली. अधिक खोलात जाऊन विचार करू लागली. भावनांचा तळ शोधू लागली. या लिखाणाने भावनांचा गुंता हळूहळू सुटत गेला. माणूस होण्याची वाट धरणं, हे या प्रोसेसने दिलेलं मोलाचं गिफ्ट !
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
असं मला वाटत नाही. मुळात आमच्या पिढीचं जगणं हे आम्हीच मांडायला हवं. आमच्या जगण्याचं आकलन हे आमच्या अगोदरच्या पिढीला पूर्णत: होऊ शकत नाही. त्यामुळे आपली नस आपण शोधावी, पकडावी नि जगालाही दाखवावी, असं माझं मत आहे.