शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

तुम्ही कोण आहात,डोंगरपर्यटक की ट्रेकर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 2:13 PM

हिवाळ्यात ट्रेकिंगला जाणार्‍यांची संख्या प्रचंड वाढते. पण डोंगर चढणारे, भटकणारे सारेच ट्रेकर असतात का? आपण विचारू स्वतर्‍ला, आपण ट्रेकर की डोंगर पर्यटक? ट्रेकिंग आणि पर्यटन यात फरक असतो, हेच आपण का विसरतो?

ठळक मुद्देट्रेकिंग हे नव्या लाइफस्टाइलमध्ये आकर्षक वाटत असलं आणि सोशल मीडियात त्यातून लाइक्स मिळत असलं, तरी आपण कोण हे ज्यानं त्यानं विचारावं स्वतर्‍ला!

- प्रशांत परदेशी

मागच्या शतकात जन्मलेल्या पिढीनं माहितीचा विस्फोट हा प्रकार ऐकला, त्यावेळेला या शब्दाचा अर्थ कळायचाही नाही. हॉलिवूडच्या काही सायन्स फिक्शन मुव्हीजमधून त्याची काही झलक मिळायची. आता मात्र माहितीचा विस्फोट काय आहे हे सगळ्यांनाच कळून चुकलंय. या विस्फोटात आपले स्थान नक्की कुठं आहे याचा शोध आणि बोध घेणं ज्याला जमलं त्याची वाट बरोबर दिशेकडे चालली. त्यावर काहींनी दमदार मार्गक्रमण करून मोठं यश संपादन केलं. या लाटेत काहींसाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टि¦टर हे आता बॉम्ब झालेत, काहींना त्याची झळ बसत आहे तर काहींना मोठी किंमत चुकवावी लागत आहे. काही जण मात्र शांत झाले आहेत.यासार्‍यात अजून एक बदल घडला. औद्योगिक साम्राज्यं उभारली गेली, काहींनी कार्पोरेट जगात आपलं स्थान निर्माण केली. रोज त्या स्पर्धेत माणूस धावू लागला. सारं काही आहे पण असमाधानही मनात तयार व्हायला लागलं. त्यात रोजचं जगणं हीच परीक्षा झाली. त्यातून बाहेर पडून निदान सुटीच्या दिवशी तरी काहींनी डोंगर दर्‍यांची वाट धरली. मात्र दुर्दैवानं काहींच्या या भटकंतीची अखेरही दुर्‍खद झाली. गेल्या काही वर्षात बातम्यांत भर पडली आहे ती डोंगरांवर होणार्‍या अपघातांची. अशा अपघातात कोणी जखमी झाले किंवा दगावले तर त्याला सरसकटपणो ट्रेकर नावाचे लेबल चिटकवलं जातं; पण तो दुर्दैवी जीव खरंच ट्रेकर होता का, हे कुणी समजून घेत नाही. ट्रेकर म्हणजे नेमकं काय, ट्रेकिंगला कोणत्या गोष्टी कायम अभिप्रेत आहे हे आपण समजून घ्यायला हवं.एकेकाळी माणसं जगप्रवासाला निघाली. समुद्रातला प्रवास महत्त्वाचा ठरू लागला. शिडाच्या मोठमोठय़ा नौका घेऊन दर्यावर्दी सफरी निघायच्या. विविध देश शोधले जायचे. समुद्रातून, हवेतूनचा प्रवास अधिक वेगवान झाला आणि जिज्ञासू माणूस भौगोलिक शोधमोहिमांवर जाऊ लागला. ज्याठिकाणी विमान व जहाज पोहचू शकत नाही, अशा  ठिकाणी शोध घेण्यासाठी माणसाची पावले वळू लागली. त्यातूनच मग त्यानं अमॅझॉनचे जंगल हिंडलं, सहारा वाळवंटातल्या अस्पर्शीत ठिकाणांना भेटी दिल्या, पृथ्वीचे उत्तर व दक्षिण ध्रुव गाठले. या प्रकारच्या शोधांच्या नंतर काय असा प्रश्न सतावू लागला तेव्हा माणसानं आपल्याच परिसरातील डोंगर परिसरांना भेटी द्यायला सुरुवात केली. त्यावेळी लक्षात आलं की, डोंगरांवरचं वातावरण रोजच्या वातावरणापेक्षा वेगळं आहे. यात वेगळी गंमत आहे. त्यातून मग त्याला कुठे अनोख्या सजीवांचं दर्शन घडलं तर कुठे नागर समाजापेक्षा भिन्न अशा मूळनिवासींच्या वसाहती नजरेस पडल्या. आज आपण ज्याला ट्रेकिंग म्हणतो त्याची ही प्राथमिक अवस्था. अशा जवळच्या भटकंतीत माणसाला आता वेगळेपणाची गरज भासू लागली आणि त्याला त्यानं जैवविविधतेचा अभ्यास, साहसी खेळ, इतिहासाचा वेध, छायाचित्रण, आकाश निरीक्षण अशी जोड द्यायला सुरुवात केली. भटकंतीचा छंद पुरवण्यासाठी माणसाला आता दुरवर जाण्याची गरज नव्हती, त्याची हौस आपल्याच परिसरात भागायला लागली; पण त्यातले धोकेही हळूहळू लक्षात यायला लागले. हे धोके कमी करण्यासाठी त्यानं याला काही नियमात बांधायला सुरुवात केली. पहिला नियम म्हणजे स्वतर्‍ची काळजी घेणं, ऋतुमानाचा सामना करण्यासाठी आधुनिक उपकरणांचा शोध घेणं, सुयोग्य असा पेहेराव करणं आणि गरज पडल्यास अशा भटकंतीत मुक्कामाची वेळ आली तर ती निर्धाेक कशी राहील यावर त्याचे प्रयोग सुरूझाले. मार्ग भटकणं, विपरीत, तीव्र हवामानाचा सामना करणं अशा घटना घडू लागल्या. म्हणजे डोंगरावर फिरायला जायचं तर उत्तम प्रकारचे बुट हवेत, पाऊस, बर्फ, उन्हाचा मुकाबला करण्यासाठी त्या त्या प्रकारची वस्रे हवीत. काही उपकरणं डोंगरांवरच्या तीव्र चढ व उतारात वावरण्यासाठी फायद्याची ठरावीत या दिशेनं त्याचे शोध सुरू झाले. ट्रेकिंगमधूनच खास छंद म्हणून हायकिंग, फ्लायमिंग, रॅपलिंग, हॉलीक्रॉसिंग अशा विविध खेळांनी जन्म घ्यायला सुरुवात केली. अर्थात ट्रेकिंग ही या खेळांची जननी होतीच असं नाही; परंतु ट्रेकवर या गोष्टी करणं आनंदादायी व प्रसंगी वेळ व श्रम वाचविणारं ठरू लागल्यानं या छंदांची ट्रेकिंगला जोड मिळाली. थोडक्यात ट्रेकिंग म्हणजे काय? तर जंगल, डोंगर किंवा नदी अथवा तिच्या खोर्‍यात केली जाणारी पायी भ्रमंती. जिथलं वातावरण कमालीचं अनिश्चित आणि विपरीत आहे अशा ठिकाणी जाऊन माणसानं त्यात सुरक्षित राहण्यासाठी काही मूलभूत नियम तयार केले. त्यातले काही तर अगदी साधे सोपे होते. या नियमांमुळे अशी भटकंती निर्धोक होऊ लागली. आज अनेकजण सांगताना आढळतात, ट्रेकवर हे करू नका, ते करू नका, ट्रेकच्या नियमात ते बसत नाही, तर त्याचे मूळ जुन्या लोकांना आलेल्या या पूर्वानुभवात आहे. या नियमांचा एक फायदा असा झाला की, माणसाचे अपघात किंवा मृत्यूदर अशा भटकंतीत कमी होऊ लागला. आज या छंदानं मध्यमवर्गाच्या मनावर गारुड केले आहे. त्यातही तरुण आघाडीवर. ट्रेकिंग करणं हा मध्यमवर्गात जीवनशैलीचा विषय बनला आहे. ट्रेक करत नाही म्हणजे मागासलेपणाचं लक्षण मानलं जाऊ लागले आहे. अशा पद्धतीने ट्रेकिंगचं जग नकाशाच्या उंचीवर येऊन पोहचत असताना ज्याला ट्रेक करायचा नाही; पण निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याची, दोन क्षण वेगळेपणानं व्यतित करण्याची हौस आहे, अशी मंडळी डोंगर, जंगल, नदी, तलाव, धबधब्यांकडे आकर्षित होऊ लागली. पर्वतातले पर्यटन आनंद मिळवून देते म्हटल्यावर शेकडोंनी लोक डोंगराकडे जाऊ लागले. खासकरून पावसाच्या मनोहरी वातावरणात जिथं निसर्गाचं रूप खुलतं, तिथं लोकांच्या झुंडीच्या झुंडी पर्यटनाला जाऊ लागल्या. काही हौशी मंडळी हिवाळ्यातही डोंगरांवर जाऊ लागली. हिवाळा ट्रेकिंग जोरात सुरू झालं.डोंगरांवर लोक मोठय़ा प्रमाणावर येताहेत म्हटल्यावर डोंगर, किल्ले अशी ठिकाणं पर्यटन केंद्र बनली. आता लोक डोंगरावर जायला सरावले; परंतु महाराष्ट्रात त्यानं एक नवीनच समस्या निर्माण झाली. डोंगरावर वावरायचं कसं याचं ज्ञान नसलेला हा अफाट समुदाय आवरायचा कसा ही समस्या भेडसावू लागली. सार्वजनिक बांधकाम खात्यानं कठडे बांधून डोंगरांचे काठ सुरक्षित करण्यास सुरुवात केली. वनविभागाच्या लक्षात आलं की, त्यांच्या हद्दीत बरेच डोंगर आहेत व बर्‍याच ठिकाणी ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असलेले किल्ले व मंदिरे आहेत, त्यांनी या वनपर्यटनाच्या नावाखाली आपला निधी पर्यटनाकडे वळविला. ज्या ठिकाणी निवांतपणा, एकांत असायचा अशी ठिकाणं आता गर्दीने गजबजू लागली, तशी मूळ ट्रेकिंगचा प्रभाव असणारी मंडळी त्यापासून दूर राहून घाटवाटा आणि दुर्गम भागाकडे वळू लागली. सुट्टीचे दिवस टाळून आता कामाच्या दिवशी कमी गर्दीत जाण्याचे पर्याय निवडू लागली. यासार्‍यात प्रत्येकानं हे समजून घ्यायला हवं की आपण ट्रेकर आहोत की फक्त भटकंती करतोय, पर्यटक आहोत. त्यात वाईट काही नाही; पण ट्रेकर होणं सोपं नाही, त्याला पॅशन लागते. त्यामुळे ट्रेकिंग या कलेचा गांभीर्यानं स्वीकार करा, प्रशिक्षण घ्या, मगच त्यात उतरणं योग्य!

***

ट्रेकला जाण्यापूर्वी.

वन पर्यटन, डोंगर पर्यटन याला जाण्यापूर्वी घ्यावयाची काळजी एकच की, आधी ओळखावं की आपण ट्रेकर नाही. आपण हौस म्हणून भटकंती करतोय. ते करतानाही ज्यांच्याबरोबर जाणार ते आयोजक अनुभवी आणि प्रशिक्षित असणं आवश्यक आहे. * त्यांच्याकडून संपूर्ण वेळापत्रक घेणं, त्यात काही बदल झाल्यास पर्यायी व्यवस्था काय याची माहिती घेणं आवश्यक आहे.* बरेचदा आपली मुलं कुठं चालली आहेत याची पालकांना खबरबात नसते. गाडी चालवताना रस्त्यात कोणी जराही समोर आलं तर कर्कश हॉर्न मारणारी, अस्वस्थ मनोवृत्तीची मुलं डोंगरावरही अशाच अस्वस्थ मानसिकतेत वावरली तर काय होणार, याचा विचार करा. 

भटकंती म्हणजे ट्रेकिंग नव्हे.आता एक लक्षात आलं असेल की, ट्रेकवर जाणं म्हणजे ट्रेकिंग नव्हे. तुमचा ¨पड ट्रेकरचा असावा लागतो, अन्यथा तुम्ही ट्रेकवर गेलात तरी तुम्ही पर्यटक असतात. माध्यमं अणि  वृत्तवाहिन्या ही गल्लीत नेहमी करतात. डोंगर, दर्‍यातल्या प्रत्येक अपघाताला ट्रेकरशी जोडले जाऊ लागले. परिणामी त्यावर र्निबध घालण्याची भाषा सुरू झाली. गडांची दुर्गमता नष्ट करताना त्यावर लोखंडी कठडे, सौर दिवे, सिमेंटच्या पायर्‍या, गडाच्या वातावरणात वर्ष दोन वर्षेही तग धरू शकणार नाही, अशी लोखंड व पंत्र्यांची बांधकामे मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. प्लॅस्टिकच्या कचर्‍याचे ढीग साठू लागले, जंगल कटाई दुसर्‍या बाजूने गडांचं वातावरण बिघडवायला घातक ठरू लागली. मोठा खर्च अक्षरशर्‍ वाया गेला. लोकांच्या अपघातांना अशा सहज सोप्या वाटांनी जणू आमंत्रणच दिले. काही संस्थांनी या धंदेवाईकपणाचा लाभ उठविण्यास सुरुवात केली, त्यानेही अपघातांना आमंत्रण दिले. नोव्हेंबरच्या शेवटच्या सप्ताहात हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर 20 पर्यटकांची एक तुकडी धोकादायक कडय़ावर अडकून पडली. माध्यमात, ट्रेकर हरवले, ट्रेकर अडकले अशी राळ उठली. त्या लोकांचा नुसता पेहराव जरी बघितला तरी ट्रेकर आणि पर्यटक हा फरक लगेच कळेल. उलट कोकणकडय़ासारख्या ठिकाणी 1000 फुटावर रात्र घालविण्यास मिळावी याकरता खरे ट्रेकर्स देवाकडे प्रार्थना करत असतील. परंतु त्यातील फार फार थोडय़ांच्या वाटय़ाला हे सुख आजवर आले आहे. कोकणकडय़ावर अशा पद्धतीने अडकून रहायला कोणालाही आवडले नसते, हे खरे आहे; परंतु ट्रेकिंगमध्ये अनिश्चितता आहे, अनपेक्षितपणे रात्रीचे मुक्काम आहेत. वाट चुकणे व ती शोधणे आहे, उनवारा पावसाच्या तुफानाचा सामना करणे आहे आणि प्रसंगी वेळेचे गणित चुकले, एखादे अवघड ठिकाण समोर आले तर तिथे वेळ किती जाईल याची तमा न बाळगता सुरक्षितपणे उतरणं किंवा यशस्वी माघार घेणं त्यात महत्त्वाचं आहे. मुद्दा हाच की, भटकंती म्हणजे ट्रेकिंग नव्हे हे सार्‍यांनीच समजून घ्यायला हवं.आता तर ट्रॅव्हल कंपन्या या क्षेत्रात शिरल्यामुळे ट्रेकिंग व पर्यटन या दोघातली सीमारेषा धूसर बनली. बर्‍याच कंपन्याया नियमांना फारसे महत्त्व देत नाहीत, अशा कंपन्यांमुळे ट्रेकिंग बदनाम होऊ लागले आहे याचं वाईट वाटतं.