आपण नक्की कुणाला फसवतोय?

By Admin | Updated: November 20, 2014 18:17 IST2014-11-20T18:17:31+5:302014-11-20T18:17:31+5:30

मला माहितीये की, माझं हे पत्र तुमच्या कॉलममध्ये मिसफिट आहे, पण तरी मी लिहितोय! हे नेचरफ्रेण्डली असण्याची काही फॅशन आली आहे का सध्या?

Who are you really cheating? | आपण नक्की कुणाला फसवतोय?

आपण नक्की कुणाला फसवतोय?

>मला माहितीये की, माझं हे पत्र तुमच्या कॉलममध्ये मिसफिट आहे, पण तरी मी लिहितोय!
हे नेचरफ्रेण्डली असण्याची काही फॅशन आली आहे का सध्या?
आपण कसे निसर्गाच्या जवळ आहोत, कसे प्लॅस्टिक वापरत नाही, आपण कसे कमीतकमी पाणी वापरतो, झाडबिड लावतो, हे सगळं फेसबुक आणि मित्रांमध्ये सतत सांगत राहणं आणि आपण फार एन्व्हार्यनमेण्ट फ्रेण्डली आहोत हे लोकांना सांगणं, हा तद्दन मूर्खपणा, खुळचटपणा आहे असं माझं ठाम मत आहे! आपण माणूस म्हणजे असे कोण वाया चाललोत निसर्गाशी दोस्ती करणारे? आपण निसर्गापेक्षा वेगळे आहोत का?
निसर्गातून बाहेर काढून जगू शकतो का? निसर्गाजवळ जातो आपण म्हणजे काय करतो, पिकनिकला जातो ना !
कशाला हा खोटेपणा? खरंच जर आपलं निसर्गावर प्रेम असेल तर साधेपणानं जगू. मस्त झाडाफुलात फुलपाखरांइतक्याच अलिप्ततेनं जगू. आपण चिमण्याकावळ्यांइतकेच निसर्गाच्याजवळ जाऊन राहू.
म्हणजे काय तर होता होईल तितके साधे राहू. नाहीतर काय एसीतल्या गप्पांना काही अर्थ नसतोच, नुस्ताच बोलघेवडेपणा!
-अभिमन्यू गुंजाळ

Web Title: Who are you really cheating?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.