मुलांना आत्महत्येच्या टोकावर पोहचवतं कोण?
By Admin | Updated: April 4, 2017 18:39 IST2017-04-04T18:32:54+5:302017-04-04T18:39:27+5:30
खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही

मुलांना आत्महत्येच्या टोकावर पोहचवतं कोण?
- किरण पवार
खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही. आणि घेतला तरी आपल्याला त्याच्या मुळाशी जाता येत नाही. या विषयावर चित्रपट तयार झाले पण त्यामध्ये मुळ कारणं बाजुलाच राहिली.
विद्यार्थी का आत्महत्या करतात याची कारणं मी मांडू शकत नाही पण एक महत्वाचं कारण मला यामागे दिसतं. ते म्हणजे विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. निर्णय घेता येत नाहीत किंवा घेतलेच जात नाही. त्यात मानसिक शिण बराच येतो.
तुम्ही जर बारकाईने निरीक्षण कराल तर अशी मुलं नेहमी दडपणात जगत असतात. सतत त्यांच्या मनात काही ना काही विचार सुरूच असतात. अशा मुलांना पालकांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेवू द्यायला हवेत. त्यांच्यावर आपला निर्णय लादण्याची घाई करू नये. किंवा त्यांना सतत दुसऱ्या मोठ्या, यशस्वी मुलांची उदाहरणं दिली जातात ती थांबवली पाहिजे.
हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते यशस्वी झालेले असतात कारण त्यांनी त्यांच्या करिअरचे निर्णय स्वत: घेतलेले असतात. पालक सतत तुलनाच करत राहिले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते डिप्रेशनच्या गर्तेत फेकले जातात.