शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

स्पेनची तरुणी कर्नाटकात लॉकडाऊन काळात राहते तेव्हा ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 4:49 PM

एक स्पेनची मुलगी कर्नाटकात एका गावात लॉकडाऊनच्या काळात अडकली; पण त्या काळात तिनं काय केलं या अनुभवाची एक गोष्ट.

ठळक मुद्देगिग वर्कर

- भाग्यश्री मुळेमार्चमध्ये स्पेनची ही तरु णी पर्यटनासाठी भारतात आली; पण लॉकडाऊनमुळे भारतातच अडकली.वेळ होताच म्हणून तिनं इथल्या गोष्टी शिकून घेतल्या. गेल्या पाच महिन्यांपासून ती भारतात आहे. इथलं लोकजीवन समजून घेत अनेक गोष्टी स्वत: करुन पाहतेय.तिचं नाव आहे ट्रेसा सोरीयानो. ती स्पेनच्या व्हेलेन्सियामध्ये औद्योगिक डिझायनर म्हणून काम करते. कर्नाटकातील कुनडापूरमधील हेरंजल गावात मित्रच्या घरी ती सध्या थांबली आहे. भारत आणि श्रीलंका असे दोन देश फिरायला ती आली होती.ती व तिचा मित्र मार्चमध्ये वेगवेगळ्या दिवशी भारतात आले. ट्रेसा उडपी जिल्ह्यातील गावी पोहोचली; पण तिचा मित्र लॉकडाऊनमुळे मुंबई विमानतळाबाहेर पडू न शकल्याने स्पेनला परतला. तेव्हापासून ट्रेसा हेरंजल गावच्या सर्व कामात सहभागी झाली आहे. रांगोळी काढण्यापासून ते गायीचं दूध काढणं, भुईमूग लागवड,भात पेरणी, नारळाच्या पानांचा झाडू तयार करणं, वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी जंगलातून पाने गोळा करणं, नदीत मासे पकडणं या गोष्टीही शिकली आहे. कानडी भाषाही ती शिकायचा प्रयत्न करतेय. घरी जाण्यापूर्वी तिला गोव्यालाही जाऊन यायचं आहे.तिचा भाऊ क्यारीस आणि सहकारी, ज्याच्या गावी ती आली आहे त्या कृष्णा पुजारीकडून तिने भारताबाबत अनेक गोष्टी एकल्या होत्या. त्यामुळे तिला भारतला भेट द्यायची होती. लॉकडाऊनमुळे तिला भारतभ्रमण करता आलं नाही; पण भारतात खेडेगावात माणसं कशी राहातात, जगतात हे सारं तिनं अनुभवलं. आनंदानं. कृष्णा पुजारी यांच्या आई चिकम्मा यांच्याकडून तुळूही शिकतेय.एक परदेशातली मुलगी आपली भाषा शिकतेय, हे पाहून गावकरीही खुश झाले आहेत. 

ट्रेसा गिग लाइफस्टाइलच्या विचारांची आहे. अर्थात गिग वर्कर आहे.म्हणजे काही काळ काम करायचं, पैसे कमवायचे, मग मनासारखं जगायचं, पुन्हा काम करायचं.प्रोजेक्टवर हे लोक काम करतात. सतत नोकरीला बांधून घेत नाहीत.कोरोनानंतर गिग वर्कर्सना काम मिळणं अवघड होणार का, त्यांची अवस्था अधिक बिकट असेल का, अशी चर्चा आहे.मात्र ट्रेसा या सा:याचा विचार न करता, आता हातात आहे तो वेळ नवीन जग अनुभवत जगून घेते आहे.कोरोनानंतरच्या काळात हे असेही बदल होणार हे निश्चित.

( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)