स्पेनची तरुणी कर्नाटकात लॉकडाऊन काळात राहते तेव्हा ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 04:49 PM2020-08-06T16:49:57+5:302020-08-06T16:52:06+5:30

एक स्पेनची मुलगी कर्नाटकात एका गावात लॉकडाऊनच्या काळात अडकली; पण त्या काळात तिनं काय केलं या अनुभवाची एक गोष्ट.

When a young Spanish woman lives in Karnataka during the lockdown | स्पेनची तरुणी कर्नाटकात लॉकडाऊन काळात राहते तेव्हा ..

स्पेनची तरुणी कर्नाटकात लॉकडाऊन काळात राहते तेव्हा ..

Next
ठळक मुद्देगिग वर्कर

- भाग्यश्री मुळे
मार्चमध्ये स्पेनची ही तरु णी पर्यटनासाठी भारतात आली; पण लॉकडाऊनमुळे भारतातच अडकली.
वेळ होताच म्हणून तिनं इथल्या गोष्टी शिकून घेतल्या. गेल्या पाच महिन्यांपासून ती भारतात आहे. इथलं लोकजीवन समजून घेत अनेक गोष्टी स्वत: करुन पाहतेय.
तिचं नाव आहे ट्रेसा सोरीयानो. ती स्पेनच्या व्हेलेन्सियामध्ये औद्योगिक डिझायनर म्हणून काम करते. कर्नाटकातील कुनडापूरमधील हेरंजल गावात मित्रच्या घरी ती सध्या थांबली आहे. भारत आणि श्रीलंका असे दोन देश फिरायला ती आली होती.
ती व तिचा मित्र मार्चमध्ये वेगवेगळ्या दिवशी भारतात आले. ट्रेसा उडपी जिल्ह्यातील गावी पोहोचली; पण तिचा मित्र लॉकडाऊनमुळे मुंबई विमानतळाबाहेर पडू न शकल्याने स्पेनला परतला. तेव्हापासून ट्रेसा हेरंजल गावच्या सर्व कामात सहभागी झाली आहे. रांगोळी काढण्यापासून ते गायीचं दूध काढणं, भुईमूग लागवड,भात पेरणी, नारळाच्या पानांचा झाडू तयार करणं, वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी जंगलातून पाने गोळा करणं, नदीत मासे पकडणं या गोष्टीही शिकली आहे. 
कानडी भाषाही ती शिकायचा प्रयत्न करतेय. घरी जाण्यापूर्वी तिला गोव्यालाही जाऊन यायचं आहे.
तिचा भाऊ क्यारीस आणि सहकारी, ज्याच्या गावी ती आली आहे त्या कृष्णा पुजारीकडून तिने भारताबाबत अनेक गोष्टी एकल्या होत्या. त्यामुळे तिला भारतला भेट द्यायची होती. लॉकडाऊनमुळे तिला भारतभ्रमण करता आलं नाही; पण भारतात खेडेगावात माणसं कशी राहातात, जगतात हे सारं तिनं अनुभवलं. आनंदानं. कृष्णा पुजारी यांच्या आई चिकम्मा यांच्याकडून तुळूही शिकतेय.
एक परदेशातली मुलगी आपली भाषा शिकतेय, हे पाहून गावकरीही खुश झाले आहेत. 


ट्रेसा गिग लाइफस्टाइलच्या विचारांची आहे. अर्थात गिग वर्कर आहे.
म्हणजे काही काळ काम करायचं, पैसे कमवायचे, मग मनासारखं जगायचं, पुन्हा काम करायचं.
प्रोजेक्टवर हे लोक काम करतात. सतत नोकरीला बांधून घेत नाहीत.
कोरोनानंतर गिग वर्कर्सना काम मिळणं अवघड होणार का, त्यांची अवस्था अधिक बिकट असेल का, अशी चर्चा आहे.
मात्र ट्रेसा या सा:याचा विचार न करता, आता हातात आहे तो वेळ नवीन जग अनुभवत जगून घेते आहे.
कोरोनानंतरच्या काळात हे असेही बदल होणार हे निश्चित.



( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: When a young Spanish woman lives in Karnataka during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.