येस, इन रिलेशनशिप! टीनएजर्स प्रेमात ‘पडतात’ तेव्हा......
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 14:06 IST2019-02-14T14:06:30+5:302019-02-14T14:06:59+5:30
तरुण मुलं जेव्हा म्हणतात आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, तेव्हा ते प्रेमाविषयीच नाही तर शारीरिक जवळिकीविषयीही बोलत असतात. ते धक्कादायक आहे; पण मुलांसाठी नव्हे, तर पालकांसाठी !

येस, इन रिलेशनशिप! टीनएजर्स प्रेमात ‘पडतात’ तेव्हा......
- डॉ. संज्योत देशपांडे
मानसोपचारतज्ज्ञ
खूप लहान वयात अनेक गोष्टी ‘एक्सप्लोअर’ करून मुलांना पहायच्या आहेत, हे खरं आहे. अगदी शाळकरी वयापासून म्हणजे 15-16 वयापासून मुलं लैंगिक गोष्टींकडे आकर्षित होऊ लागली आहेत. त्यापेक्षा लहान वयातल्या मुलामुलींनाही आता गर्लफ्रेण्ड/ बॉयफ्रेण्ड (त्यांच्या भाषेत जीए/ बीएफ) असतात. ते असावेत यासाठीचं पिअरप्रेशर त्यांच्यावर असतं. आणि त्याहून थोडी म्हणजे विशीच्या आतबाहेरचे मुलंमुली जेव्हा म्हणतात की, वुई आर इन अ रिलेशनशिप, तेव्हा ते केवळ प्रेमात नाही तर फिजिकल रिलेशनशिपसंदर्भातच बोलत असतात, असं आमच्याकडे येणार्या तरुण मुलामुलींचा अनुभव तरी सांगतो. त्यांना एक्सप्लोअर करून पहायचं असतं, आणि ते करताना त्यांचा अॅप्रोच एकदम ‘कॅज्युअल’ असतो असं काही नाही, असतात ते सिरिअसच. म्हणजे जेव्हा प्रेमात असतात तेव्हा मनापासून प्रेमात असतात, त्यात गुंततात. त्यासाठी वेळ देतात. मात्र आधीच्या पिढय़ांपेक्षा या मुलांचं नात्यात येणं-जाणं तसं ‘सोपं’ त्याअर्थी बर्यापैकी कॅज्युअल असतं. म्हणजे प्रेमभंग झाल्याचं, ब्रेकअपचं, डंप केल्याचं दुर्ख नसतं असं काही नाही; पण हे होऊ शकतं, हे त्यांनी गृहीत धरलेलं असतं. आणि तसं झालं तरी फार रडत न बसता, मुव्ह ऑन म्हणण्याचा प्रॅक्टिकल अॅप्रोच त्यांनी स्वीकारलेला दिसतो. बदल असेलच तर तो हा आहे. आणि प्रेमात पडणं म्हणजे शारीरिक जवळीक असणं हे त्यांनी एक टप्प्यात मान्य करून टाकलेलं आहे.
हे सारं धक्कादायक आहे का? तर आहे.
मात्र किशोरवयीन मुलांना नाही तर त्यांच्या पालकांसाठी हे धक्कादायक आहे. अलीकडेच एक मुलगा माझ्याकडे पालकांना घेऊन आला होता. मला काउन्सिलिंग हवं आहे असं पालकांना सांगून तो त्यांना सोबत घेऊन आला होता. प्रत्यक्षात मला म्हणाला, मी बराय, ते शॉकमध्ये आहेत. काउन्सिलिंगची गरज त्यांना आहे म्हणून घेऊन आलो आहे.
या मुलांना पालकांनी त्यांच्याच एका दुसर्या फ्लॅटवर रंगेहाथ पकडलं होतं. विशीतही नसलेला आपला मुलगा मुलीला फ्लॅटवर घेऊन येइल आणि नको ते करेल हे पालकांसाठी धक्कादायक होतं. आणि तो मुलगा मात्र विशेष काहीही झालेलं नाही अशा मनर्स्थितीत होता.
प्रेम-शारीरिक संबंध यासंदर्भातले प्रश्न घेऊन त्याअर्थानं ही मुलं आता येत नाहीत. त्यांना माहिती असतं ते काय करत आहेत, पालकांसाठी हे सारं भयंकर जिकिरीचं होतं. आपण जे करतोय त्याची जबाबदारी घ्यायलाही ते तयार आहेत. काहीजण केवळ उत्सुकतेपोटी अनेक गोष्टी करून पाहतात. त्यांना आता गर्भनिरोधक गोष्टी, काळजीची अन्यं साधनं याविषयीचीही माहिती असते. त्यामुळे अमुक करा, तमुक करू नका, हे नैतिक-हे अनैतिक असं सांगून काही ही मुलं ऐकतीलच असं नाही.
त्यापेक्षा त्याना ‘जबाबदारीची’ जाणीव करून देणं, आणि प्राधान्यक्रमांचं भान देणं ही खरी मोठी गोष्ट आहे.
लैंगिक शिक्षणाची गरज या मुलामुलींना आहे का, तर आहेच. मात्र मोबाइल हातात आहे, त्यांना इंटरनेटमुळे अनेक गोष्टी कळत आहेत. असं असताना योग्य शास्रीय माहितीही त्यांच्यार्पयत जाणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे जबाबदारीचं भान देणं गरजेचं आहे. आपलं वय काय, या वयात शिक्षण-करिअर या गोष्टींना प्राधान्य हवं. लैंगिक ओढ, आकर्षण याच्याशी कसं डिल करायचं हे सांगायला हवं.
त्याहून महत्त्वाचा मुद्दा आहे तो, पिअर प्रेशर हाताळण्याचा. प्रत्येकाला जीएफ/बीएफ असायलाच हवी, ते नसेल तर आपल्यात काहीतरी कमीच आहे हे समजण्याची काही गरज नाही. ते नसलं तरी चालेल, आपला प्राधान्यक्रम वेगळा आहे हे मित्रमैत्रिणींना आणि स्वतर्लाही पटवून देण्याइतपतची जाणीव तरी तयार व्हायला हवी.
किशोरवयीन मुलामुलींचं प्रेम, त्यातलं गुंतणं हे सारं नजाकतीनं हाताळण्याची गरज आहे.