इंद्रधनुष्य कॉलेजात खुललं तेव्हा.

By Admin | Updated: September 11, 2014 17:23 IST2014-09-11T17:23:22+5:302014-09-11T17:23:22+5:30

डिप्लोमाच्या लास्ट इयरपर्यंत कॉलेजलाईफ गाजवायची जिद्द अगदी शिंगेला पेटलेली होती; म्हणून मग ठरवलं डिग्री मुंबईबाहेर करायची जेणेकरुन आपण हॉस्टेलाईट होऊ आणि घरच्यांच्या नकळत एकांकिकेच्या रिहर्सल्स, लेट नाईट ग्रुप स्टडी, स्पोर्टस् टीममध्ये भाग घेणं हे सगळ सहज शक्य होईलं.

When the rainbow opens in the college. | इंद्रधनुष्य कॉलेजात खुललं तेव्हा.

इंद्रधनुष्य कॉलेजात खुललं तेव्हा.

डिप्लोमाच्या लास्ट इयरपर्यंत कॉलेजलाईफ गाजवायची जिद्द अगदी शिंगेला पेटलेली होती; म्हणून मग ठरवलं डिग्री मुंबईबाहेर करायची जेणेकरुन आपण हॉस्टेलाईट होऊ आणि घरच्यांच्या नकळत एकांकिकेच्या रिहर्सल्स, लेट नाईट ग्रुप स्टडी, स्पोर्टस् टीममध्ये भाग घेणं हे सगळ सहज शक्य होईलं. मग  घरच्यांच्या विरोधाला न जुमानता स्वइच्छेच्या लाटेवर डायरेक्ट विश्‍वभारती अँकॅडमीज् कॉलेज ऑफ इंजि. अहमदनगरला येऊन धडकलो.
कॉलेजचा कॅम्पस चांगला.  अॅकॅडमीक्सच्या बाबतीत खूप छान वातावरण पण आपण मात्र क्रिएटीव्ह किडे. अगदी पहिल्याच दिवशी एकांकिका ज्याच्यावर माझं पहिलं प्रेम आहे त्याच्या रिहर्सलस् कुठे होतात हे विचारत हिंडलो. भेटलेल्यांमध्ये  अलमोस्ट ७0-८0 टक्के  विद्यार्थी ग्रामीण भागातले होते. अनेकांनी आधी कॉलेजात असं काही केलंच नव्हतं.  
ज्या कारणासाठी मुंबईतून स्वारी थेट नगरपर्यंत तेही घरच्यांचा विरोध झुगारुन आली ते कारण इथं अस्तित्वातच नाही असं समजलं .  दोन-तीन महिने गम मध्ये बुडालेला देवदास झालो. एक दिवस असच टाइमपास म्हणून स्नेहसंम्मेलनाच्या अँकरिंगच्या ऑडीशनला गेलो आणि निवड झाली. रातोरात अख्ख्या कॉलेजने डोक्यावर घेतलं.
असेच इव्हेंटस् आपल्या कॉलेजमध्ये घेतले तर? या प्रश्नापासृून सुरुवात झाली. मग मला माझ्यासारखच विचार करणारे सात-आठ जण भेटले त्यातूनच आमच्या सुपिक आणि क्रिएटीव्ह किडा असलेल्या डोक्यात एका मंचाची कल्पना डोकावली एक कलामंच! प्राचार्यांना ही आयडीया सांगितली त्यांनी खुल्या हाताने आणि मोठय़ा मनाने मदत करायची तयारी दाखवली.  बर्‍यापैकी मुला-मुलींनी ग्रुप जॉईंन केला. आता दहा-वीस जणांची टीम तर तयार झाली होती. त्यातही, निलेश स्वप्नाली, निदा, विजय, देवा, मेघा, जयेश यांचा सपोर्ट म्हणजे दिल की धडकन होती. रियाज, सागर, सुमित, अभि, आरती, अनुजा अशा किती तरी सिनिअर्सचा गाइडन्स खूप मोलाचं ठरलं.
ग्रुपची सुरुवात झाली ती ‘आरंभ’ या इनॉग्रेशनच्या इव्हेंटपासून. कार्यक्रमात मॅन पॉवर मॅनेजमेंट पासून ते मार्केटिंगपर्यंत असे सगळे गुण शिकायला मिळाले. सकाळ-संध्याकाळचे जेवण विसरुन स्पॉन्सरशिपसाठी धडपडणं, त्यांना आपल्या कल्पनेसोबतच त्यांचाही फायदा पटवून देणं हे खूप दांडगे अनुभव ठरले त्यातच कॉलेजच्या भिंती रंगवण्यापासून ते एकाच डब्यात ५-६ जण जेवणं, उशिरापयरंत कार्यक्रमाचं प्लानिंग करण आणि उशीर झाल्यानंतर गेटवरुन उड्या मारुन रुम मालकापासून ुलपून छपून दोन-चार मित्रांसोबत रुमवर जाणं हे सगळं भारीच होतं. 
एकदाचं ‘इंद्रधनुष्य कलामंचं’च उद्घाटन झालं आणि सगळ्या टीमच्या चेहर्‍यावर एकप्रकारचं समाधान झळकत होतं. त्या कार्यक्रमानंतर आमची १0-२0 ची टीम  १00-१२0 जणांची झाली आहे. या इंद्रधनुष्य कलामंचची परंपरा इथून पुढे वर्षानुवर्षे चालत राहावी यासाठी आमचे ज्युनिअर्स, विकी, सनी, सुधीर, राम, चेतन, शुभम, शुभांगी, मोनिका हे. लिडर बनूना जिद्दीने पुढे नेत राहतील ही आशा आहेच. आज मागे वळून पाहिलं तर त्या ब्रॅण्डेड कॉलेजमध्ये एखाद्या  एकांकिकेचा भाग घेण्यापेक्षा , एखाद्या इव्हेंटचा ऑर्गनाईजर होण्यापेक्षा इथं उभ्या केलेल्या ‘इंद्रधनुष्य कलामंच’चा सदस्य असल्याचा जास्त अभिमान वाटतोय. 
-आकाश बुचडे (अ. नगर)

Web Title: When the rainbow opens in the college.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.