शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

ए.आर.रहमान यांच्यासोबत काम करण्याची दुर्मिळ संधी मिळते तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 6:00 AM

ए.आर. रहमान यांच्या अलीकडेच गाजलेल्या ‘हार्मोनी विथ ए.आर. रहमान’ या वेबसिरीजच्या प्रोजेक्टमध्ये ट्रान्सलेटर म्हणून चित्रा अहेन्थेम या मणिपुरी पत्रकार तरुणीनं काम केलं. त्या अनुभवाविषयी.

ठळक मुद्देसर रहमान एकदम आठवणीत हरवल्यासारखं हसत म्हणाले, ‘एकदम रोजाचे दिवस आठवले. मी त्याकाळी मारुती 800 वापरायचो. एकदा ती गाडी रस्त्यात बंद पडली, जिथं बंद पडली तिथंच सोडून दिली, कारण गाडीत पेट्रोल संपलं होतं, पेट्रोल भरायचं तर खिशात पैसेच नव्हते.’ मग क्षणभर थ

-चित्रा अहेन्थेम

मणिरत्नमचा रोजा आमच्या इम्फाळमध्ये रिलिज झाला तेव्हा म्हणजे 1991 साली मी अकरावीत होते. शाळा बुडवून आम्ही मैत्रिणी रोजा पहायला गेलो होतो. रोजाच्या गाण्यांनी सार्‍यांनाच वेड लावलं होतं, सिनेमाच्या तर सगळेच प्रेमात पडले. ज्या प्रॉडक्शन हाऊसने तो सिनेमा बनवला, ज्याच्या संगीतानं वेड लावलं त्यांच्यासोबत मी कधी काम करेन असं मला स्वप्नातही  वाटलं नव्हतं. पण ते झालं, कविथालय प्रॉडक्शन हाऊससोबत आणि दस्तूरखुद्द ए.आर. रहमानसोबत काम करण्याची सुवर्णसंधी माझ्यार्पयत चालून आली.कट टू एप्रिल 2018. बोरून थोकचाम, हे इम्फाळचे तरुण फिल्ममेकर. एक दिवस त्यांचा मला फोन आला. थोडक्यात म्हणाले, एक चेन्नईचं बडं प्रॉडक्शन हाऊस आहे. ते लोक लॉरेमबाम बेदबती यांच्यावर एक डॉक्युमेण्ट्री बनवत आहेत. त्यांच्याकडे ट्रान्सलेटर आहे; पण मणिपुरी भाषा, लोकसंगीत यांसाठी कुणीतरी उत्तम मणिपुरी-इंग्रजी येणारं हवंय, तू करशील का हे काम? - बेदबती या मणिपूरच्या अत्यंत ख्यातनाम खुंग इशेई गायक आहेत. हा एक प्रकारचा लोकसंगीताचा प्रकार आहे. मौखिक ज्ञानपरंपरा आणि सामाजिक-सांस्कृतिक रीतीनुसार हे लोकसंगीत गायलं-शिकवलं जातं. आताशा ही कलाही मरणपंथालाच लागलेली आहे.या डॉक्युमेण्टरीचं काम करायचं की नाही हे ठरवण्यापूर्वी मला त्या चेन्नईच्या टीमला भेटायचं होतं. पण संध्याकाळ होता होता त्या क्रूमधले आठ जण माझ्या घरीच आले. पण त्या प्रोजेक्टविषयी काही फारसं सांगत नव्हते. तुटक बोलत होते. त्यांना आता फक्त माझा होकार आणि काही विशिष्ट तारखा हव्या होत्या. काही काळ मी चेन्नईत येऊन काम करावं एवढंच म्हणणं होतं. माझा निर्णय पटकन होईना तेव्हा बोरूनच हळूच माझ्या कानात म्हणाला, या प्रोजेक्टमध्ये ए.आर. रहमानपण असणार आहेत, नाही म्हणू नकोस. पण ते तेवढंच, त्या प्रॉडक्शन हाऊसमधल्या दुसर्‍या कुणीही ए.आर. रहनामनचं नावही घेतलं नाही. पण तरीही मी त्या प्रोजेक्टला होकार भरला. त्याचं आणखी एक कारण म्हणजे मलाही ओजा बेदबतीविषयी, त्यांच्या गाण्याविषयी अधिक जाणून घ्यायचं होतंच. मणिपुरीत ओजा म्हणजे गुरु. ओजा बेदबती यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही हवासाच होता.साधारण आठवडाभरातच काम सुरू झालं. पण कुठंही ए.आर. रहमानचा उल्लेख नव्हता. तासन्तास शूटिंग चालायचं, कामापलीकडे काही बोलणंही व्हायचं नाही. पुन्हा ए.आर. रहमानचा कुणी कुठं उल्लेखही करत नव्हतं. पहिलं काही शूट संपवून तो क्रू पुढच्या शेडय़ुलसाठी सिक्कीमला रवानाही झाला. मेमध्ये पुन्हा शूटिंगचं दुसरं शेडय़ुल लागलं.आणि त्यावेळी वाटलं ए.आर. रहमान भेटणार. ‘हार्मोनी विथ ए.आर. रहमान’ या म्युझिक मिनी सिरीजचं हे शूटिंग होतं. खुद्द रहमान मणिपूरला, ओजाब बेदबतीच्या घरी आला. पूर्व इम्फाळच्या काहीशा ग्रामीण भागात, सेईंजंगमध्ये ओजा बेदबती यांचं घर आहे. जुनी पुरातन वास्तू. तिथं शूट सुरू झालं. मी आसपासच होते, ट्रान्सलेटरची गरज कधीही भासली तर आपण जवळ असणं गरजेचं असं मला वाटलं. ओजा बेदबती रहमानचं स्वागत करतात, असा पहिला सीन शूट झाला आणि मग घरात पुढच्या सीनची तयारी झाली.पुढच्या सीनची तयारी होत होतीच त्या दरम्यान कार्यक्रमाची दिग्दर्शक श्रुती हरीहरा हिने मला थेट रहमानला भेटवलं. ओळख करवून दिली. आम्ही शेकहॅण्ड केलं, ओळख झाली. आणि त्या क्षणापासून सर रहमान आणि ओजा बेदबती यांच्या गप्पांतला मी एक अदृश्य धागा बनले. जुन्या पद्धतीची भुई घेतलेली जमीन, जुनंच चमचमतं छत, जुनं घर या वातावरणातही सर रहमान सहज वावरत होते. शूटिंगची तयारी होईर्पयत शांतपणे वाट पाहत होते. कॅमेरा अ‍ॅँगल्स लागले, त्या गप्पांचेही टप्पे झाले म्हणजे मग गप्पा सुरू झाल्या, की मी दोघांचं बोलणं परस्परांना ट्रान्स्लेट करून सांगू लागले. दोघांच्या गप्पा झाल्या, शॉट ओके झाला की रीटेक देऊ, असं ते शांतपणे विचारतही.ए.आर. रहमानविषयी मी वाचलं, ऐकलं होतं की, ते अत्यंत कमी बोलतात, अत्यंत विनम्र आहे. दुसरी गोष्ट खरीच आहे; पण कमी बोलतात असा माझा तरी अनुभव नाही. त्यांनी मणिपूरविषयी मला बारीक बारीक प्रश्न विचारले. इथली माणसं, वातावरण, जेवणखाण याविषयी उत्सुकतेनं जाणून घेतलं. मग विचारलं की ही जी पहाडांची रांग दिसतेय, त्यापलीकडे काय आहे? मी त्यांना सांगितली की, त्यापलीकडे एक नदी आहे, ती पार करूनच दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानी सैन्य इथवर पोहचलं होतं. हे ऐकून ते पटकन म्हणाले, ‘हाउलीटल वुई नो अबाउट यूअर प्लेस !’ हे असं चटकन म्हणणंही मला फार मोलाचं वाटलं. अजून एक गोष्ट मला चकीत करून गेली. त्यांचा मिश्कील स्वभाव. अत्यंत सहजपणे ते आवतीभोवती वावरणार्‍या लोकांना स्वतर्‍शी जोडून घेतात, सहज गप्पा मारतात. या शूटच्या वेळीही मधल्या वेळात ते मणिपूरच्या प्रसन्न हवेविषयी कौतुकानं बोलले आणि एकदम म्हणाले, ‘नाहीतर आमच्या चेन्नईची हवा, रंग बघ माझा कसा झालाय त्यामुळे.!’ मग मी त्यांना सांगितलं की पहिलं शूट संपलं तेव्हा मी काळ पोस्ट प्रॉडक्शनच्या कामासाठी चेन्नईत येऊन गेले. मुलाखती ट्रान्स्क्रीब करण्याचं काम केलं तेव्हा ते ऐकून ते हसले म्हणाले, ‘आह, तुला भयंकर उकडलं असेल तिथं. पण डोण्ट वरी, तू काही फार काळी पडणार नाहीस तिकडे ! पण पुढच्या वेळी चेन्नईला आलीस की माझ्या म्युझिक कॉलेजला ये!’ - हे शेवटचं वाक्य ऐकून तर मी उडालेच!

ओजा बेदबती आणि सर रहमान काही बोलायचे, आणि अडलंच काही तर पटकन हाक  मारायचे, अत्यंत मऊसर हाक, ‘चित्राजी.’ विषय समजून घ्यायचे. शूट संपल्यावर मी त्यांना विचारलं, ‘सगळं ठीक होतं, अजून काही हवंय का मणिपूरविषयी?’ एरव्ही पत्रकार म्हणून मला मुलाखती घ्यायची सवय; पण सर रहमान स्वतर्‍ मणिपूरविषयी माहिती विचारत होते. मणिपूर समजून घेत होते. स्वतर्‍च्या फोनवर माझी उत्तरं रेकॉर्ड करून घेत होते. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ते मणिपूरविषयी वाचून तरी आलेत किंवा निदान त्यांना इथल्या माहितीविषयी कुणी ब्रिफ तरी दिलं आहे. त्यांनी मला विचारलं, ‘इथं लोकांमध्ये इतका असंतोष, उद्रेक का आहे?’ त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी त्यांना मणिपूरचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास सांगितला. बोलता बोलता मी त्यांना सांगितलं की, प्रसिद्ध संगीतकार एस.डी. बर्मनच्या आई मणिपूरच्या राजघराण्यातल्या होत्या. त्यांच्या संगीतात इथल्या लोकसंगीताची, निसर्गातल्या विविध लयींची झलक दिसते.हे बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की, आपण हे काय सांगतोय, द ए. आर. रहमानना संगीताविषयी सांगतोय. मी पटकन स्वतर्‍च्या तोंडावर हात ठेवत म्हणाले,‘ओह. सॉरी!’ सर रहमान फक्त हसले आणि आपण किती शांतपणे समजून घेतोय, असा त्यांचा चेहरा कायम ठेवला. ते सारं बारकाईनं ऐकतच होते. त्यानंतर पुढच्या कामासाठी चेन्नईला जावं लागलं. प्रॉडक्शन टीमने सांगितलं की, काही फायनल एपिसोडसंदर्भात तुझ्याशी रहमानसरांना बोलायचं आहे. प्रोडय़ुसर, डिरेक्टरसोबत मी पंचथन रेकॉर्ड इन अ‍ॅण्ड एएम स्टुडिओत पोहचले. सर रहमान यांचा हा कोडमबकममधला स्टुडिओ. आम्ही जाऊन बसलो. वीस मिनिटानंतर सर रहमान आले. त्यांच्यामागे आम्ही रेकॉर्डिग रूममध्ये गेलो. इलेक्ट्रॉनिक मशिन्स, पियानो, जायण्ट टी स्क्रीन भिंतीवर चिकटलेले होते. आपण द ए.आर. रहमान याच्या स्टुडिओत आहोत या भावनेनंच मी दोन इंच जमिनीच्या वर चालत होते. आम्ही बसलो, रहमान सरांनी पहिला प्रश्न विचारला, ‘जेवायचं काय तुझ्या? आवडतंय का इथलं जेवण? चेन्नईदर्शन झालं की नाही?’ मी सांगितलं, आवडतं इथलं जेवण, जिथं जाते तिथलं लोकल फुड खाण्यात मजा असते; पण यावेळी कामच इतकं की गेल्या दोन आठवडय़ात पहिल्यांदाच बाहेर पडलेय. नाहीतर हॉटेल ते कामाचं ऑफिस एवढंच रुटीन वर्क सर, पण पूर्वी मी येऊन गेलेय चेन्नईत!मी ‘वर्क सर’ असं म्हणाले आणि सर रहमान एकदम आठवणीत हरवल्यासारखं हसत म्हणाले, एकदम रोजाचे दिवस आठवले. मी त्याकाळी मारुती 800 वापरायचो. एकदा ती गाडी रस्त्यात बंद पडली, मी जिथं बंद पडली तिथंच सोडून दिली, कारण गाडीत पेट्रोल संपलं होतं, पेट्रोल भरायचं तर खिशात पैसेच नव्हते.’मग क्षणभर थांबून म्हणाले, ‘पण मजा होती ते दिवस, मस्त होते. मला हवं ते म्युझिक करायचो, आता मला फॉम्यरुला बॉय मिट्स गर्ल, फॉल इन लव्ह प्रकारच्या त्याच त्या गोष्टींसाठी म्युझिक करावं लागतं.’नंतर म्हणाले, ‘तू गाणं लिहिशील? मणिूपरविषयी. त्या दिवशी तू मला तिथली माणसं, संस्कृती, निसर्ग वगैरे सांगत होतीस, तसं काही लिही आणि तिथून बाहेर पडलेल्या लोकांना साद घाल की, परत या, इथं तुमच्या मातीत..’मी ऐकतच राहिले. पटकन म्हणाले, ‘मी आजवर कधी गाणं लिहिलेलंच नाही.’ ‘प्रय} तर, बेदबतीजी आहेत, त्यांची मदत घे, जमेल तुला.’ ते म्हणाले. त्या दिवशी त्यांचा एक कार्यक्रम होता, के. एम. कॉन्झर्वेटरीचा, लहान मुलांच्या मदतीसाठी तो कार्यक्रम होता. त्याला ये, असं त्यांनी मला आमंत्रण दिलं. इम्फाळमध्ये असताना माझ्या म्युझिक कॉलेजला ये असं त्यांनी मला दिलेलं आमंत्रण त्यांनी असं न विसरता इथं कार्यक्रमाला बोलावून पूर्ण केलं. ओजा बेदबती आणि त्यांच्या चार शिष्य फायनल शूटसाठी चेन्नईत आल्या तेव्हा त्यांनी बारकाईनं प्रत्येकीची चौकशी केली. अगदी त्यांच्या प}ीनं आठवणीनं आमच्यासाठी पाठवलेली आठवणभेट आमच्या हॉटेलच्या पत्त्यावर आली. माणसांशी हे मैत्र जोडण्याची त्यांची कला मला मोहीत करून गेली. त्यांच्यासोबत काम करून मी इम्फाळला परत आले. पण आपण ए.आर. रहमानसोबत काम केलं हे सांगितलं नाही म्हटल्यावर कुटुंब, मित्र-मैत्रिणी सगळेच खवळले. पण आता मागे वळून पाहिल्यावर वाटतं, हार्मोनी प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा आम्ही सगळे सर रहमान यांच्या ऐकिव व्यक्तिमत्त्वावर भाळलेले होतो. त्यांच्या संगीताचे दिवाने होतो. पण त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी आम्हाला सहज आपलंसं केलं. अत्यंत सादगी, सहजता, मिश्कील स्वभाव, माणसांच्या कलानं काम करण्याची हातोटी नि संयम हे सारंच चकीत करणारं होतं. याहून मला मोठी वाटली त्यांची कामाकडे पाहण्याची दृष्टी. एकदम शांत. आपला प्रत्येक सूर उत्तमच लागावा, प्रत्येक काम परफेक्ट व्हावं म्हणून सुरू असलेले निरंतर प्रय}.सर रहमान मला भेटले. त्यांच्या या रूपाचं दर्शन झालं, नशीब थोर याहून मोठं काय असतं.(चित्रा इम्फाळ, मणिपूरस्थित मुक्त पत्रकार आहे.)