नजर आणि नजरिया दोन्ही बदलतात तेव्हा

By admin | Published: December 25, 2014 07:23 PM2014-12-25T19:23:14+5:302014-12-25T19:23:38+5:30

‘निर्माण’ आणि ‘टाटा सेण्टर फॉर टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाइन’ -आयआयटी मुंबई यांच्या वतीनं आयआयटीत शिकणा:या तरुणांसाठी एक खास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यात सहभागी मित्रमैत्रिणींची एक खास भेट.

When both eyesight and attitude change | नजर आणि नजरिया दोन्ही बदलतात तेव्हा

नजर आणि नजरिया दोन्ही बदलतात तेव्हा

Next
>मेघना ढोके meghana.dhoke@lokmat.com
 
‘निर्माण’ आणि ‘टाटा सेण्टर फॉर टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाइन’ -आयआयटी मुंबई यांच्या वतीनं आयआयटीत शिकणा:या तरुणांसाठी एक खास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यात सहभागी मित्रमैत्रिणींची एक खास भेट.
-------------------
आयआयटीत शिकणारी ‘ती’ सारी मुलं.
त्यातही डिग्रीचा नाही तर ‘मास्टर्स’चा अभ्यास करणारी, देशातल्या सर्वोच्च संस्थेत रिसर्च करून, अवघड जटिल प्रश्नांवर टेक्नॉनॉजिकल सोल्यूशन शोधणारी.
थेट गडचिरोलीला गेली, डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेत त्यांच्या प्रेरणोनं तरुण मुलांसाठी सुरूझालेल्या ‘निर्माण’ उपक्रमात सहभागी झाली.
‘निर्माण’ आणि मुंबई आयआयटीतल्या टाटा सेण्टर फॉर टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाइन विभागाच्या वतीनं एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 
ती कार्यशाळा संपल्यावर ‘ऑक्सिजन’नं त्यातल्या सहभागी काही मुलीमुलांशी गप्पा मारल्या. विचारलं त्यांना की, मुळात या शिबिरात सहभागी व्हावं असं का वाटलं? आदिवासी भागातल्या या शिबिरानं तुम्हाला काय दिलं? 
उत्तरं देताना या मुलांनी अगदी निर्मळपणो मान्य केलं की, आमचा दृष्टिकोनच बदलला. काही गोष्टी आम्हाला माहितीच नव्हत्या, काही विचारांच्या कक्षेत नव्हत्या किंवा विचार कसा करावा हे लक्षात येत नव्हतं, ते सारं या शिबिरानं दिलं. त्यांच्या उत्तरात खूप ‘सच्चई’ तर होतीच, पण साधेपणा होता. आपण आयआयटीअन्स आहोत असा आविर्भाव तर नावालाही नव्हता. उलट होती मोठी उमेद आणि तयारी स्वत:ला काही प्रश्न विचारण्याची. समाजातले माहिती नसलेले, न दिसणारे प्रश्न समजून घेण्याची.
ते सारं त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहिलं.
आणि लक्षात आलं की, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या बातम्या. काही आयआयटीअन्सने बडय़ा पगाराच्या ऑॅफर्स नाकारून देशातच काम करण्याचा निर्णय घेतल्याचा. पगारापेक्षा कामाचं समाधान महत्त्वाचं असं त्या मुलांनी सांगितलं होतं.
निर्माणच्या शिबिरात सहभागी झालेल्या या तरुण मुलांनीही आपलं समाधान नक्की कशात आहे, असा प्रश्न स्वत:ला विचारला असेल या निमित्तानं असं त्यांच्याशी बोलताना जाणवत राहतं.
त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा सारांश. त्यांच्याच शब्दात.
-----------------
‘निर्माण’च्या शिबिरानं काय दिलं?
 
आयआयटी म्हणजे टेक्नॉलॉजिकली देशातली सर्वोच्च शिक्षण संस्था. त्या संस्थेत शिकून जे ज्ञान मिळतं, ते मात्र तळागाळात पोहचत नाही. आयआयटीअन्स  डिग्री मिळाली की सरळ परदेशात जातात. त्यांच्या शिक्षणाचा, गुणवत्तेचा फायदा देशाला फारसा होतच नाही. मला हा प्रश्न पडायला लागला होता की, आपली गरज खरंच कुणाला आहे? आपल्या शिक्षणाचा, त्यातून निर्माण होणा:या गोष्टींचा अधिक उपयोग कुणाला होऊ शकतो? डोक्यात ही विचारप्रक्रिया सुरू असतानाच हे जाणवत होतं की, ग्राउण्ड लेव्हलवर नेमके काय प्रश्न आहेत हे आपल्याला फारसे माहितीच नाहीत. इथं शिकताना आम्ही रुरल डेव्हलपमेण्टसाठीच काही प्रॉडक्ट्सचा विचार करतो. त्यातून निर्माणशी संपर्क झाला. निर्माण हे शिबिर घेणार असं कळलं. सवयीप्रमाणं त्यांनी दिलेलं सगळी स्टडी मटेरिअल, ते काय काम करतात. निर्माणचं, सर्चचं काम नेमकं काय हे समजून घेतलं, वाचलं.
 मात्र या शिबिराच्या निमित्तानं कळलं की, वाचणं वेगळं मात्र प्रत्यक्ष त्या भागात जाऊन ‘एक्सपिरीयन्स’ करणं, अनुभव घेणं वेगळं. पाहणं वेगळं. आपण त्या भागात जातो, त्या भागात प्रत्यक्ष माणसांना भेटून जो अनुभव घेतो, त्यानं जे समजतं ते वेगळंच असतं. त्यात डॉ. बंग यांचा समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असल्याचं लक्षात आलं. गावातली माणसं भेटली, जी आपल्या समस्यांवर स्वत: उत्तरं शोधत होती. त्यांचा उत्साह, ऊर्जा हे सारंच फार वेगळं होतं.
त्यातून माझी विचारप्रक्रिया ब:यापैकी बदलली आहे असं आता मला वाटतं. एक लक्षात आलं की, प्रश्न-समस्या सगळीकडेच आहेत. अगदी आमच्या आयआयटीतसुद्धा डेंग्यूच्या साथीसारखे प्रश्न काही दिवसांपूर्वी आलेच होते. त्यात आम्ही काय सोल्यूशन शोधलं? या शिबिरानंतर माङया लक्षात आलं की, समस्या आहे असं नुस्तं म्हणत न बसता, नक्की प्रश्न काय आहे हे समजणंही खूप महत्त्वाचं आहे. ते प्रश्न समजल्यावर आपण सोल्यूशन शोधायला तरी तयार आहोत का हे पाहणं आणखी महत्त्वाचं. आणि मग तो सोडवण्यासाठी काय हवं, ही गरज काय आहे हे ओळखणं त्याच्यापुढचं. ती प्रोसेस डोक्यात सुरू झाली.
समस्यांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. एकतर आपण प्रश्नांची उत्तरं शोधावीत आणि नसेल जमत तर जी माणसं ती उत्तरं शोधू शकतात, त्यांना आपल्या कामात सहभागी करून घ्यावं हे लक्षात आलं. विचारांची पद्धत बदलण्याचं हे काम या शिबिरानं माङयासाठी नक्की केलं !
- प्रबोध गडकरी, प्रोजेक्ट रिसर्च इंजिनिअर,  केमिकल डिपार्टमेण्ट
 
‘निर्माण’च्या शिबिरानं  काय दिलं?
‘व्हाट टू डू इन लाइफ?’ हा प्रश्न माङयासमोरही होताच. तो छळत असतानाच ‘निर्माण’ने एक प्रश्नावली समोर ठेवली. ज्यात प्रश्न होते, असे प्रश्न जे आपण कधीच स्वत:ला विचारत नाही. ऐसे ऐसे सवाल फिर खुद से पुछने पडे, जो पहले मैने कभी सोचे नहीं थे! ते प्रश्न अवघड होते, उत्तरं तर त्याहून अवघड. या शिबिराच्या निमित्तानं हे प्रश्न भेटले. मी विचारलं स्वत:ला की, आयुष्यात नेमकं मला कोणत्या मार्गानं जायचंय? नेमकं काय हवंय? गडचिरोलीला गेलो, ‘सर्च’चं काम पाहिलं. आरोग्यासंदर्भात त्यांनी केवढं मोठं काम केलंय. त्या कामातून लोकांना झालेला फायदा उघड दिसतो. आम्ही आयआयटीत जे काम करतो, जी रिसर्च करतो, त्याचा लोकांच्या आयुष्यावर कितीसा परिणाम होतो? लोकांना त्याचा काय उपयोग होतो? असा प्रश्न मी स्वत:ला विचारायला लागले. त्यात आमच्या ग्रुपमधे असेही काही होते, ज्यांनी या शिबिरापूर्वी खेडं कसं असतं, तिथं माणसं कशी राहतात हे पाहिलंही नव्हतं. त्यांना पहिल्यांदा ‘गाव’, तिथली माणसं, त्यांच्या समस्या दिसल्या. इथं आयआयटीमधे आम्ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी बरीच रिसर्च करतो. वेगवेगळे डिव्हाइस तयार करतो, ग्रामीण भागातील माणसांचं आयुष्य सुकर व्हावं म्हणून तंत्रज्ञान कसं वापरता येईल, याचा विचार करून, तसे तांत्रिक उपकरणं तयारही करतो.
पण जर गावच कधी पाहिलेलं नसेल, गावातल्या माणसांच्या समस्याच माहिती नसतील, त्यांच्या गरजाच आम्हाला कळत नसतील, तर त्यांना सोयीची टेक्नॉलॉजिकल उपकरणं आम्ही कशी बनवणार? किंवा बनवलीच तरी त्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही, हे आमच्या लक्षात आलं.
या शिबिरानं समस्या पाहण्याची आणि गरजा ओळखण्याची एक नजर आम्हाला दिली. आता त्या नजरेतून आम्ही आमचे दृष्टिकोन घडवू शकू असं वाटतं.
 
- हीना शहा,  प्रोजेक्ट रिसर्च इंजिनिअर, केमिकल डिपार्टमेण्ट
 
‘निर्माण’च्या शिबिरानं काय दिलं?
- गावातलं आयुष्य कसं असतं? लोकं खेडय़ात कशी राहतात. कशी जगतात? याविषयीचं माझं पर्सेप्शनच वेगळं होतं. या शिबिराच्या निमित्तानं कळलं की, मला जे वाटत होतं ते आणि प्रत्यक्षात गावातलं जगणं जे असतं ते हे एकमेकांपासून खूप वेगळं असतं. गावात काही फक्त समस्याच नसतात, खूप चांगल्या गोष्टीपण असतात. मी पाहिलेल्या या गावांमधेही अनेक सुंदर गोष्टी होत्या, बहौत सारी अच्छी चिजे भी थी! त्या गोष्टी तरी मला पूर्वी कुठं माहिती होत्या.
तसंही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून आमच्या डोक्यात एक बायस असतो. वाटतं, हे ना, हे तर आपल्याला माहिती आहे. प्रॉब्लम ना, करून टाकू सॉल्व्ह. त्यात काय एवढं? आयआयटीत शिकत असताना तर आपल्याला ‘माहिती आहे’, हा बायस जास्त होतो.
या शिबिराच्या निमित्तानं ज्या गावात गेलो, तिथली माणसं पाहिली तेव्हा कळलं की, आपल्याला माहितीच नाहीये की, लोकांना काय हवंय? 
आपण काय दिल्यानं लोकांचं आयुष्य सुधारेल हा विचारच चूक आहे. नेमकं लोकांना काय हवंय, त्यांच्या गरजा काय आहेत हे समजून घेतलं, तेही स्वत:च्या डोक्यातले बायस बाजूला ठेवून समजून घेतलं तर आपण लोकांच्या ‘ख:या’ गरजा समजून घेऊ शकू. आणि त्या ख:या गरजा कशा समजून घेता येतील हे यानिमित्तानं शिकायला मिळालं.
एक मुख्य मुद्दा माङया लक्षात आला की, आपल्याला जो माणसांचा प्रॉब्लम वाटतो, तो प्रॉब्लम आहे असं त्यांना वाटतही नसेल किंवा नाही. त्यामुळे आपल्याला वाटणा:या प्रॉब्लमवर आपण त्यांना काही सोल्यूशन दिलं तर, त्याचं समाधान आपल्याला, त्या सोल्यूशनचा त्यांना काही उपयोग नाही. त्याउलट त्यांचा खरा प्रॉब्लम काय, समस्या काय, तो समजून घेऊन त्यावर सोल्यूशन दिलं तर त्याचा उपयोग ! आता या शिबिरानंतर, मी माङो बायस बाजूला ठेवून, जे आहे, ते नेमकं काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करीन !
 - अक्षय एस, .टाटा फेलो, एम.टेक. ( केमिकल इंजिनिअरिंग)
 
‘निर्माण’च्या शिबिरानं काय दिलं?
इट्स अलमोस्ट चेंज्ड माय पर्सपेक्टिव्ह. तसा मला ग्रामीण भाग नवीन नव्हता, कल्पना होतीच. पण त्या ग्रामीण भागाकडे पाहण्याची दृष्टी ‘आयआयटीअन’वाली. एक असतं ना, की आपल्याला माहिती आहेत ब:याच गोष्टी. मी मेकॅनिकल शाखेतून बीटेक केलं. मग पुढच्या अभ्यासासाठी आयआयटी मुंबईत आलो.
इथं आम्ही सामान्य माणसाच्या, ग्रामीण भागातल्या लोकांच्या विकासासाठीची उपकरणं तयार करतो, त्यासाठी रिसर्च करतो. मात्र सगळा विचार टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनंच करत होतो.
या शिबिराच्या निमित्तानं ग्रामीण भागाची ‘हार्टबिट’ पहिल्यांदा अनुभवली. जाणवली मला त्यांची नस.
आणि ती धडधड जाणवल्यावर माझी नजर, दृष्टिकोन, विचारप्रक्रिया बदलायला सुरुवात झाली.
- संगीथ संकर, टाटा फेलो, एम.टेक. (सेण्टर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्हज फॉर रुरल एरिया) 
 
‘निर्माण’च्या शिबिरानं काय दिलं?
डॉ. बंग, त्यांचं काम, निर्माण, सामाजिक प्रश्न, ते शिबिर, तो अनुभव, बदलेलं पर्ससेप्शन हे सारं तर या शिबिरात होतंच.
मात्र मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवली, ती म्हणजे आजवरच्या आयुष्यात स्वत:विषयी विचार करण्याची कधी वेळ आली नाही, फुरसत झाली नाही, गरजही पडली नाही. जो विचार केला तो अभ्यास, करिअर एवढाच.
अपने बारे में सोचनेका मौकाही नहीं मिला. जो जिंदगी में कभी सोचाही नहीं था खूद के बारे में, वो सोच ! खूद के बारे में कुछ सवाल पहली बार फेस किए.
म्हणजे काय, तर आयुष्यात मला नक्की काय कमवायचंय? सेटल व्हायचंय म्हणजे नेमकं
काय हवंय? माङया कामाचा मूळ हेतू काय ?  मला काय हवंय नक्की? किती अवघड होते हे सारे प्रश्न. त्या प्रश्नांना मला सामोरं जायला भाग पाडलं. अब ये सवाल पिछा नहीं छोडेंगे.
 
- विशाल झा, टाटा फेलो, मास्टर्स इन इंडस्ट्रिअल डिझाइन (आयडीसी)

Web Title: When both eyesight and attitude change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.