शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

टेक क्रांतीत पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 06:00 IST

डिजिटल क्रांती + सोशल मीडिया यांच्या मदतीने येत्या काळात लवकरच काय काय बदलेल याची ही एक झलक.

डिजिटल क्रांती + सोशल मीडिया यांच्या मदतीने येत्या काळात लवकरच काय काय बदलेल याची ही एक झलक.

जाहिरात चकटफूसोशल मीडिया वापरून आपण आपल्या कामाची, वस्तू, उत्पादन, सेवेची जाहिरात स्वत:च करू शकतो. अलीकडेच झालेला एक अभ्यास सांगतो की, ८६ टक्के ग्राहक आता जुन्या पारंपरिक जाहिरात प्रकार अथवा माध्यमांवर विश्वास ठेवत नाहीत. सोशल मीडियातल्या गोष्टींना पर्सनल टच असल्यानं तिथली माहिती अधिक खरी वाटते. आजच्या घडीला जगातली ३९ टक्के जनता सोशल मीडियात लाइव्ह माहिती टाकत असते. त्यांच्यापर्यंत थेट फुकट पोहचण्याचं माध्यम आपल्या हाती आहे हे विसरायचं नाही.

सीएक्स आणि इएक्सकन्झ्युमर एक्सपिरिअन्स आणि यूजर एक्सपिरिअन्स असे हे दोन शब्द. तसा या शब्दांत फार फरक नाही. अगदी सूक्ष्मभेद आहे. पण नव्या काळात हा यूजर एक्सपिरिअन्स महत्त्वाचा. आपणही तेच करत असतो. अनेकदा आपण नेटवर माहिती वाचत असतो आणि जाहिराती येतात. त्यांना म्हणतात बॅनर अ‍ॅड्स. त्या आपण वाचतच नाही. ५४ टक्के यूूजर्स त्या बॅनर अ‍ॅड्स पाहतच नाही असं अभ्यास सांगतात. पण मग ते काय वाचतात, सोशल मीडियात तरी एखाद्याचा वस्तू अगर सेवा वापराचा अनुभव वाचतात. त्यामुळे आपण घरबसल्या आपल्या वस्तू वा सेवेची माहिती अशी यूजरला देऊ शकतो. आपण घरबसल्या आपला बिझनेस वाढवू शकतो.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीहे प्रकरण फार दूर नाही. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीसाठीचे विशिष्ट हेडसेट लावून आपण अवतीभोवतीचा सारा माहौलच अनुभवू शकतो. लवकरच हे सारं आपल्या टप्प्यात असेल. स्टॅटिस्टा डॉट कॉमच्या अंदाजानुसार २०१८ पर्यंत जगभरात १७ कोटींहून अधिक लोक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतील.

इमेज मेसेजिंगआपण हल्ली मेसेज पाठवतो, इमेज फॉरवर्ड करतो. येत्या काळात येइल इमेज मेसेजिंग. म्हणजे काय तर लिहिण्यापेक्षा आपण सरळ फोटो काढून पाठवू. आजही काही सोशल मीडिया साइट्स इमेज मेसेजिंग करू देतातच. पण येत्या काळात त्याचं प्रमाण वाढेल.

व्हिज्युअल सर्च

आपण आता गूगलवर माहिती शोधतो. पुढे फोटो आणि व्हिडीओच जास्त शोधू. त्याला म्हणायचं व्हिज्युअल सर्च. त्या सर्चमध्ये आपले फोटो आणि व्हिडीओ यावेत याचा विचार आजच करावा लागेल.

व्हाइस सर्चम्हणजे आवाजाचा सर्च. म्युझिकच्या जगासह अन्य ऐकण्याच्या गोष्टींसाठी हे व्हाइस सर्च वापरले जातील. रेकॉर्ड करणं वाढेल. आणि ऐकणंही.