तुमची strength काय आहे? - आधी ती शोधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:44 IST2020-07-09T18:39:42+5:302020-07-09T18:44:51+5:30
पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्ट हा सध्या फार महत्त्वाचा शब्द झाला आहे. पण सगळ्यांचीच ‘पर्सनॅलिटी’ एकाच पद्धतीने, एकाच साच्यात बसवून कशी ‘डेव्हलप’ होईल? मुळात आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे, आपल्या स्ट्रेंग्थ काय हे तरी नेमकं सगळ्यांना माहिती असतं का?

तुमची strength काय आहे? - आधी ती शोधा!
-जुई जामसांडेकर, निर्माण
व्यक्तिमत्त्व विकास अर्थात पर्सनॅलिटी याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कॉलेजच्या अंतिम वर्षात असो वा मॅनेजमेंट क्षेत्रत असो, चांगली नोकरी करणार असाल किंवा बिझनेस करणार असाल, यशस्वी व्हायचे असेल तर पर्सनॅलिटी हवी असं कुणीही सहज म्हणतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला पर्याय नाही हे सार्वत्रिक दिसतं. मला आठवतंय इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना आम्हा सगळ्यांना कॅम्पस प्लेसमेंट्सआधी कम्युनिकेशन कसं करायचं, मॅनर्स कुठले आहेत, बोलताना हातवारे कसे करायचे, कुठले कपडे घालायचे, ग्रुप डिस्कशन कसं करायचं असे सर्व टेकनिक्स शिकवले जायचे.
पण प्रश्न असा आहे की, सगळ्याच जणांची ‘पर्सनॅलिटी’ अशी एकाच पद्धतीने, एकाच साच्यात बसवून कशी ‘डेव्हलप’ होईल? तसेच,
आयुष्यात चांगली जडण-घडण होण्यासाठी, ख:या अर्थाने यशस्वी होण्यासाठी अशी ‘पर्सनॅलिटी’च बनवली तर ते पुरेसे आहे का?
मेडिकल कॉलेजमधील एक अतिशय शांत स्वभावाची; पण अत्यंत हुशार मुलगी अत्यंत निराश होऊन मला म्हणाली, ‘मला काहीच जमत नाही, मी तर आयुष्यात काहीच करू शकणार नाही!’
तिला विचारलं, असं का वाटतं तुला?
ती म्हणाली, ‘माङयात लिडरशिप क्वालिटीज नाहीत. मला ग्रुपमध्ये बोलताही येत नाही!’
तिला म्हटलं, ते ठीक आहे; पण तू तुझं काम प्रामाणिकपणो, अतिशय नावीन्यपूर्णतेने, उत्साहांत करतेस त्याचं काय?
पण ती म्हणाली, एकूण असं दिसतं की ते काही मोठं महत्त्वाचं नाही !’ असं तिला का वाटलं असेल? यश मिळवण्यासाठी प्रत्येकांत लिडरशिप क्वालिटीज असायलाच हवेत का?
निर्माण उपक्रमांतर्गत अनेक युवांशी बोलताना मला असं दिसतं की, वरील उदाहरणांतील परिस्थिती फक्त एकाच कॉलेजची नाही अथवा एकाच क्षेत्रशी संबंधित नाही तर ती सार्वत्रिक आहे. कम्युनिकेशन, पर्सनॅलिट यांना खूपच महत्त्व दिलं जातं.
लिडरशिप, इंटिलिजन्स हे गुण उच्च दर्जाचे मानले जातात. पण ते करताना प्रामाणिकपणा, उदारता आणि खरेपणा याप्रकारच्या गुणांना खूपच कमी लेखलं जातं.
‘सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल्स’ या पुस्तकात स्टीफन कॉव्हेनी पर्सनॅलिटी आणि कॅरॅक्टर एथिक्स म्हणजे काय हे खूप छान समजावलं आहे. मागील 2क्क् वर्षे सक्सेसशी निगडित काय लिखाण झालेले आहे याचा कॉव्हेने सखोल अभ्यास केला. तो असं म्हणतो की, पहिली 15क् वर्षे सक्सेसचा मूळ पाया कॅरॅक्टर एथिक्स होता. त्यांत इंटिग्रिटी, ह्युमिलिटी, फिडेलिटी, धाडस, पेशन्स, मोडेस्टी, साधेपणा, न्याय आदींचा समावेश होता. बेंजामिन फ्रॅँकलिनचे आत्मचरित्र याचं उत्तम उदाहरण आहे!
कोणत्याही व्यक्तीचं यश आणि त्याला मिळणारा दीर्घकाळ आनंद त्यानं अंगीकारलेल्या चारित्र्य तत्त्वांमधून (कॅरॅक्टर प्रिन्सिपल्स) येतो. पण गेल्या 5क् वर्षांत महत्त्वाचे निर्णय घेताना आणि गंभीर प्रश्न सोडवताना सोशल इमेज, त्याबद्दलचे टेकनिक्स आणि क्विक फिक्सस असे ‘सोशल बॅण्ड-एड्स आणि अॅस्पिरिन’ वापरले जात आहेत. याने तात्पुरते प्रॉब्लेम्स सुटतात; पण हे अतिशय कृत्रिम आहे. याने मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि काही काळाने तोच प्रश्न समोर उभा राहतो. दुस:या महायुद्धानंतर सक्सेस हे पर्सनॅलिटी, पब्लिक इमेज, अटिटय़ूड बिहेव्हियर, स्किल्स टेकनिक्स यांचं फंक्शन बनलं. डोळसपणो बघितलं तर असं लक्षात येते की, या सर्व गोष्टी फक्त मानवी सुसंवाद चांगला होण्यासाठी उपयोगी आहेत. Smiling wins more friends than frowning किंवा Whatever the mind of man can conceive and believe it can achieve अशी वाक्यं खूप प्रेरणादायक वाटतात. प्रत्यक्षात पर्सनॅलिटीमधील हा दृष्टिकोन फेरफार करणारा, संशयास्पद व इतर लोकांनी आपल्याला छान म्हणावं याला उत्तेजन देणारा आहे, असे स्टिफन कॉव्हे म्हणतात. खरे तर आपल्याकडे मी कसा आहे? माङयात नेमके कुठले गुण आहेत? हे सांगणारे खूप कमी टूल्स प्रचलित आहेत. या संदर्भातली व्होकॅब्यूलॅरी ही सहजासहजी उपलब्ध नाही. जे टूल्स उपलब्ध आहेत ते मुख्यत: बाह्यअंगांशी निगडित आहेत. पण माङयात कुठले गुण आहेत? माझं वेगळेपण कशात आहे? ते कसं ओळखायचं? माझी खरी ताकद काय?
त्याला खतपाणी कसं घालायचं? याचं उत्तर सहसा मिळत नाही. पॉङिाटिव्ह सायकॉलॉजीमध्ये अलीकडे झालेल्या अनेक संशोधनातून सिद्ध झालेला या प्रश्नांवरचा रामबाण उपाय म्हणजे तुमचे कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स!
कॅरॅक्टर?- हा खूपच जड शब्द वाटतो. मुख्यत: कॅरॅक्टर हा शब्द चारित्नाशी जोडला जातो आणि म्हणूनच त्याची भीतीही वाटते. कुणी या विषयी बोलणार असेल तर नको रे बाबा असं होतं.
मात्र हेच कॅरॅक्टर स्ट्रेग्ंथ्स आपल्या आयुष्यात ‘स्व’ ची ओळख करून देण्यास मोलाची कामगिरी बजावतात. माझी खरी ताकद काय आहे हे सांगतात. पाश्चात्य देशांत कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्सवर खूप भरीव काम झालेलं आहे. मानसिक आजार नसणारे सर्वच जण चांगलंच आयुष्य जगत असतील असं नाही. मानसिक आजार नसणं आणि चांगलं समृद्ध जीवन जगणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे अनेक शोधनिबंधातून सिद्ध झालेलं आहे. म्हणून व्यक्तीच्या ऑप्टिमल डेव्हलपमेंटसाठी/चांगलं जीवन जगण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या कशा मोजायच्या याचा शोध सुरू झाला.
तो शोध नेमका काय आणि त्याचा आपल्या जगण्याशी काय आणि कसा संबंध आहे, याविषयी पुढच्या अंकात.
तोर्पयत तुम्ही एक होमवर्क करून पहा.
त्यासाठी सोबतची चौकट पहा, आणि बघा तुमच्या कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ काय आहेत?
कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स जाणून घेण्यासाठी काय करता येईल?
www.viastrengths.org या संकेतस्थळावर कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स असा सव्र्हे दिसेल.
तो भरा. त्यानुसार तुमच्या स्ट्रेंग्थ्सवर तिथं इन्स्टंट फीडबॅक मिळेल.
म्हणजे काय तर हा सव्र्हे पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंग्थ्स उतरत्या क्रमात दिसतील. म्हणजे सर्वात पहिली स्ट्रेंग्थ ही
तुमची टॉप स्ट्रेंग्थ आहे असं समजा. आणि बाकीच्या स्ट्रेंग्थ पाहून जरा असा विचार करा.
*पहिल्या सात टॉप स्ट्रेंग्थ्सपैकी काही स्ट्रेंग्थ्स निवडा. आपण त्यांना तुमच्या सिग्नेचर स्ट्रेंग्थ्स म्हणूया. पुढील काही दिवसांसाठी या स्ट्रेंग्थ्स रोज नवीन पद्धतीने वापरा.
* अशा कुठल्या स्ट्रेंग्थ्स आहेत ज्या आता टॉपमध्ये नाहीत; पण तुम्हाला त्या विकसित करायच्या आहेत? त्या तुम्ही कुठे वापराल याचा विचार करा.
* तुमच्या सिग्नेचर स्ट्रेंग्थ्सला तुम्ही अधिकाधिक विकसित कसे कराल? त्यासंबंधी प्लॅन करा.
* तुमच्या स्ट्रेंग्थ्सचा वापर तुम्ही तुमची एखादी नवीन चांगली सवय लावण्यास किंवा चुकीची सवय बदलण्यास कसा कराल हे पहा.
*तुम्ही तुमच्या कुठल्या स्ट्रेग्थ्स प्रोफेशनल कामांत वापराल याचा विचार करा.