‘बंडू’च्या नादी लागलो तर बिघडलं काय?

By Admin | Updated: October 1, 2015 18:02 IST2015-10-01T18:02:03+5:302015-10-01T18:02:03+5:30

‘तसलं काही’ पाहून आपण काही गुन्हा करतोय, असं तरुण मुलामुलींना वाटतच नाही!

What is wrong with 'Bandu'? | ‘बंडू’च्या नादी लागलो तर बिघडलं काय?

‘बंडू’च्या नादी लागलो तर बिघडलं काय?

>‘तसलं काही’ पाहून
आपण काही गुन्हा करतोय,
असं तरुण मुलामुलींना
वाटतच नाही!
त्यांचं म्हणणंय,
जगण्यात थ्रिल नाही,
बोलायला कुणी नाही,
प्रश्न छळतात,
शरीर उधाणतं,
मन पागल होतं,
अशावेळेस जे
हातात आहे ते ‘पाहण्यात’ पाप काय?
 
पोर्न अॅडिक्शन नावाचा आजार खेडय़ापाडय़ातही मुलांना का पछाडतोय याची कारणं सांगणारा 
खेडय़ापाडय़ातल्या तरुण मुलामुलींचा एक बिनतोड सवाल!
 
तुम्ही ‘तसलं काही’ पाहता का?
असा ऑक्सिजननं थेट प्रश्न विचारला तसा आपलं मनमोकळं करणा:या पत्रंतून अनेक कहाण्या राज्यभरातील मित्रमैत्रिणींनी पाठवल्या. जसं काही सगळ्यांना खूप बोलायचं होतं, याविषयावर! मनात दडपून टाकलेल्या गोष्टी सांगायच्या होत्या. खेडय़ापाडय़ात राहणा:या मुलामुलींना तर आपबिती सांगितल्यागत बोलायचं होतं!
ही पत्रं हातात घेऊन वाचताना जाणवत होतं की, ही सारी मुलं काही अॅडिक्ट नाहीत. पण ‘अडकलेली’ मात्र आहेत.
अगदी खेडय़ातल्या मुलांनीही सातवी-आठवीत असल्यापासून तसल्या साइट्स आणि क्लिप्स पाहिलेल्या आहेत.
जे कुणाशीच बोलताही येत नव्हतं ते ‘पाहता’ यायला लागलं. याचं थ्रिल वाटतं होतं.
जे पूर्ण शहरी आणि अतिच सिकेट्रिव्ह होतं ते सारं आपल्यालाही पहाता येतं याचा आनंद होता.
पण संस्कारात बसतं का आपल्या, हा प्रश्नही होता. म्हणून मग आपण जे पाहतो त्याचा ‘गिल्ट’ वाटतो, असं अनेकांनी आपल्या पत्रंत सांगितलं आहे.
कितीतरी मुलामुलींनी लिहिलं आहे की, हे ‘असलं’ काही पाहिलं की घरच्यांसमोर अगदी देवासमोरही जाण्याची लाज वाटते. अपराधी वाटतं.
पण तरीही ‘ते’च पुन्हा पुन्हा पाहत रहावंसं वाटतं.
मुख्य म्हणजे या टप्प्यात अजून ग्रामीण मुलं असली तरी अनेक शहरी मुलं त्यापुढे निघून गेली आहेत. अनेक मुलांनी लिहिलं की, पोर्न पाहणं हा काही गुन्हा नाही. आम्ही सज्ञान आहोत आणि आमच्या ब:यावाईटाची जबाबदारी घेऊ शकतो. त्यात सरकारनं ढवळाढवळ करू नये. बंदी घालून हे सारं संपवता येणार नाही.
दोन टोकावरच्या यासा:या प्रतिक्रिया.
मात्र बंदीच्या वादात आणि चर्चेत न जाता पाहिलं तरी एक गोष्ट लक्षात येते की, समाजाला वाटतं त्यापेक्षा जास्त अॅडिक्शन याविषयाचं मुलांमध्ये आणि मुलींमध्येही आहेच.
मग या पत्रतच त्याची कारणं शोधली की, काय म्हणून या सा:याचं अॅडिक्शन मुलामुलींमध्ये वाढतंय? केवळ थ्रिल? आपण मॉडर्न आहोत हे दाखवण्याची सक्ती, की वयानुरूप असलेलं कुतूहल?
हे सारं तर होतंच, पण त्याच्यापुढची काही कारणं या पत्रंत दिसतात.
ती मात्र विचार करण्यासारखी आणि वयात येण्यापासून ते तरुण झालेल्या मुलामुलींच्या मानसिक आरोग्याची काळजी वाटावी अशीच आहेत.
संस्कार-संस्कृती आणि बंदी यापलीकडे जाऊन आरोग्य म्हणूनही या विषयाची दखल घ्यावीत इतकी ती कारणं गंभीर आहेत. कारण मुलामुलींची पत्रं वाचताना असं लक्षात आलं की, आजार भलताच आहे, त्याचं निदान न झाल्यानं केवळ लक्षणांवर मलमपट्टी सुरू आहे. 
पोर्नबंदी, अॅडिक्शन याच्या आधीच्या टप्प्यावर असलेले काही प्रश्न जर सुटले तर कदाचित व्यसनाधिनतेच्या टप्प्यावर तरुण मुलं जाणारही नाहीत.
मुलांनीच पत्रत सांगितलेले हे त्यांचे अस्वस्थ टप्पे.
 
1) बोलायलाच कुणी नाही
पत्रंत एकूणएक तरुण मुलांनी लिहिलं आहे की, आमच्याशी कुणी बोलत नाही. बोलायलाच कुणी नाही. बोलायचं काय तर वयात येतानाचे शरीराचे अनेक प्रश्न, कुतूहल आणि मनात येणा:या भावना. ते सारं बोलावंसं, योग्य माहिती मिळवावंसं वाटतं. पण कुणी बोलत नाही. सांगत नाही. मग हातात जे येईल ते पाहणं, त्यातून समजून घेणं सुरू होतं. मात्र आपण जे पाहतो ते कधी आम्ही एन्जॉय करू लागतो हे कळत नाही. जे पाहतो, ते चूक आहे हे कळतं, पण तेही घरी सांगता येत नाही. म्हणून मग ‘पाहत’ राहणं सुरूच राहतं आणि त्यातून व्यसन बळावतं.
2) डिप्रेशन आलं म्हणून.
नापास झालो, प्रेमभंग झाला, काहीच जमत नाही, नोकरी लागत नाही अशी अनेक कारणं. त्यातून रिकामपण आणि त्यामुळे आपण कसं ‘तसलं’ काही पहायला लागलो याच्या कहाण्या अनेक तरुणांनी लिहिल्या आहेत. एवढंच कशाला तर डेंग्यू, मलेरिया, अपघात या काळच्या रिकामपणात आपण हेच उद्योग केले असंही अनेकांनी सांगितलं.
डिप्रेशन आणि औदासीन्य या मानसिक आजारावर औषध म्हणून हा उतारा केला जातोय का हे तपासायला हवं.
 
3) थ्रिल नाही कशातच म्हणून
हा मुद्दा झाडून सगळ्या पत्रत दिसतो आणि तरुण हातांचं रिकामपण जाणवत राहतं. तरुण मुलांना थ्रिल हवंय. पण रुटीन कॉलेज, त्यातलं एकसुरीपण, घरकाम. रिकामा वेळ, शारीरिक ऊर्जा जिरवायला काहीच साधन नाही. नुसतंच चकाटय़ा पिटत बसणं. पूर्वी टीव्ही पाहत मनोरंजन होत असे. आता त्याचाही कंटाळा आला.
आणि त्याच दरम्यान हातात स्मार्टफोन आला. त्यावर इंटरनेटही आलं. नेट नसलं तरी ब्लू टूथ होतंच. त्यामुळे मग मित्रंकडून सर्रास ‘देवाणघेवाण’ सुरू झाली आणि मग रिकाम्या वेळेत, माळरानात, शेतातही केवळ थ्रिल हवं म्हणून चोरून तसलं काही पाहणं सुरू झालं.
तीन-चार मुलांनी कहाण्या लिहिल्या आहेत की, वैरणीत, खळ्यात, झापात आपली तसली पुस्तकं आणि मोबाइल सापडल्यानं वडिलांनी आपल्याला तुफान चोपलं. 
त्यातून थ्रिल मिळतं, मजा वाटते.

Web Title: What is wrong with 'Bandu'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.