शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इंजिनिअरिंगच्या ३ इण्टर्नशिपमध्ये काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 04:30 IST

प्रत्येक वर्षीची इण्टर्नशिप तुम्हाला वेगळं काही शिकवेल, आणि त्यातून कदाचित प्री-प्लेसमेण्ट जॉब आॅफरही तुम्हाला मिळू शकेल!

- सर्वेश अग्रवाल

प्रत्येक वर्षीची इण्टर्नशिपतुम्हाला वेगळं काही शिकवेल,आणि त्यातून कदाचितप्री-प्लेसमेण्ट जॉब आॅफरही तुम्हाला मिळू शकेल!येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इण्टर्नशिप करणं सक्तीचं असून, त्यांना योग्य इण्टर्नशिप मिळावी म्हणून प्रयत्न करणं महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थांसाठीही बंधनकारक. आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच एआयसीटीई या तांत्रिक शिक्षणासाठी सर्वोच्च असलेल्या संस्थेनंही याप्रकारच्या इण्टर्नशिपची गरज व्यक्त केली आहे. एआयसीटीई स्वत: संस्थांना योग्य कंपन्यांत इण्टर्नशिप मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठीच्या व्यवस्था तयार करण्यात येत आहेत. लिंकडिन, इण्टर्नशाळा यासारख्या समाजमाध्यमांना, पोर्टल्सना त्यात सहभागी करून घेतलं जात आहे. इण्टर्नशिप सक्तीची तर केली; पण आपल्याला योग्य इण्टर्नशिप मिळणार कुठं? ती कधी करायची? कोणत्या कंपनीत केली तर फायद्याचं, आपल्याला कंपनीवाले का घेतील, मुख्य म्हणजे कोणत्या इण्टर्नशिपमध्ये आपण काय शिकणं अपेक्षित आहे, असे अनेक प्रश्न इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पडणं अत्यंत रास्त आहे. त्यामुळे कोणत्या इण्टर्नशिपचा काय हेतू असला पाहिजे, या प्रश्नाचे उत्तर शोधायला मदत करणाºया या काही टिप्स..१) पहिली इण्टर्नशिप सॉफ्ट स्किलसाठी..पहिल्या वर्षी तुम्ही जी इण्टर्नशिप कराल त्यावेळी हे लक्षात ठेवलं पाहिजे की इंजिनिअरिंगचं टेक्निकल ज्ञान तुमच्याकडे कमीच असणार आहे. हा टप्पा आहे जास्तीत जास्त सॉफ्ट स्किल्स शिकण्याचा. कंपनीच्या वातावरणात कसं वावरतात, इतरांशी, वरिष्ठांशी कसं बोलतात, संवाद कसा साधतात ही सारी संवाद सूत्रं या इण्टर्नशिपमध्ये शिकायला हवीत. त्यातून तुम्हाला काम करण्याची वेगळी नजर मिळेल. त्यामुळे पहिल्या इण्टर्नशिपमध्ये जास्तीत जास्त सॉफ्ट स्किल्स शिका. बोलणं-वागणं-बसणं, चर्चा करणं, ऐकून घेणं, इथपासून सॉफ्ट स्किल्स शिकण्याची सुरुवात होऊ शकते.२) दुसरी इण्टर्नशिप मॅनेजमेण्ट, कण्टेण्ट रायटिंग किंवा सेल्समध्येया इण्टर्नशिपमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल तर सुधारेलच, पण तुम्हाला टीममध्ये काम कसं करायचं हे शिकता येईल. त्यातून तुम्हाला कार्पोरेट जगात डोकावून पाहण्याची एक संधी मिळेल. किंवा मग एखाद्या एनजीओत इण्टर्नशिप करा. आपल्या कामाचा, जगण्याचा फोकस, आपल्या कामाचा उपयोग हे सारं तुम्हाला त्यातून ठरवता येईल.तिसरी इण्टर्नशिप : प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिेकशनसाठीद्वितीय आणि तृतीय वर्षापर्यंत तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलेलं हवं. तुम्हाला तुमच्या फिल्डचा अंदाज यायला हवा. तेच तुम्ही आधीच्या इण्टर्नशिपमधून शिकलेलं असता. आता तिसºया इण्टर्नशिपला प्रत्यक्ष कामात उतरा. जे तुम्ही शिकलात ते आणि ते कंपनीत काम चालतं ते प्रत्यक्ष करून पाहा. तुमच्या क्षेत्रातील प्रोफेशनल्सशी संपर्क करा. त्यांच्याकडून काम शिका. हे काम करताना तुम्हाला कळेल की आपल्याला नक्की किती येत आहे? या क्षेत्रात आपल्याला खरंच रस आहे का? काम करायला आवडेल का, याचा काम करून अंदाज घ्या. मग पुढे काय करायचं ते ठरवा.इण्टर्नशिपच्या पुढे जॉबतुमच्या पहिल्या दोन इण्टर्नशिपमुळे तुमचा रिझ्युम उत्तम होऊ शकतो. तिसºया इण्टर्नशिपसाठी तुम्हाला मोठ्या ब्रॅण्डची कंपनी मिळू शकते. एकदा इण्टर्नशिप मिळाली की झोकून देऊन काम करा. मिळेल ते शिका. नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि टुल्स शिकून घ्या. तुमची तिसरी इण्टर्नशिप तुम्हाला तुमचा पहिला जॉब मिळवून देऊ शकते. त्याला म्हणतात प्री-प्लेसमेण्ट आॅफर. ती संधीही तुम्हाला मिळेल. फक्त इण्टर्नशिप मन लावून आणि उत्तम करा.संस्थापक, सीईओ इण्टर्नशाळा