फुटबॉल वर्ल्डकप गाइड काय पहाल? कसं पहाल?

By Admin | Updated: June 13, 2014 10:06 IST2014-06-13T10:06:19+5:302014-06-13T10:06:19+5:30

फिफा वर्ल्डकप २0१४, ब्राझील - १२ जून ते १३ जुलै सामन्यांची ठिकाणे - १२ एकूण संघ - ३२ मागच्या वर्षी कोण जिंकलं होतं? - स्पेन

What will the football world cup guide see? How do you see? | फुटबॉल वर्ल्डकप गाइड काय पहाल? कसं पहाल?

फुटबॉल वर्ल्डकप गाइड काय पहाल? कसं पहाल?

फिफा वर्ल्डकप २0१४, ब्राझील - १२ जून ते १३ जुलै
सामन्यांची ठिकाणे - १२
एकूण संघ - ३२
मागच्या वर्षी कोण जिंकलं होतं? - स्पेन
 
वेळापत्रकाचा अँप करा डाऊनलोड
सामन्यांचा लेखाजोखा ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग 
म्हणजे तुमच्या अँण्ड्रॉईड फोनवर अँप इन्स्टॉल करणे. Brazil Cup 2014  आणि World Cup 2014 हे दोन अँप्स एकदम उत्तम आहेत. worldcupbrazilcalendar.com या वेबसाइटवरून तुम्ही संपूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करून ते तुमच्या Google Calendar   मध्ये इम्पोर्ट करू शकता.
 
किती सामने? किती गट?
३२ संघ ए ते एच अशा आठ गटांत विभागले आहेत. 
पहिल्या फेरीत सर्व संघांमध्ये गटवार सामने होतील.
 दुसरी फेरी बाद फेरी असून, त्यात १६ संघ 
अटीतटींच्या लढतीत खेळतील. 
बाद फेरीतला कोणताही सामना बरोबरीत सुटणार 
नाही. 
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचलेल्या संघाला अंतिम 
सामन्यापूर्वी फक्त सहा सामने खेळायचे आहेत आणि 
त्यात बाद फेरीतील तीन सामने जिंकणे अनिवार्य आहे.
 
ग्रुप ऑफ डेथ
वर्ल्ड कप म्हटले की, प्रत्येक संघ जीवन-मरणाच्या 
ईर्ष्येने खेळतो. पण त्यातही काही गटांमध्ये अतिशय 
बलाढय़ संघ एकत्र आल्यामुळे अधिक रंगत निर्माण 
होते. यावेळी दोन ग्रुप्स ऑफ डेथ आहेत -
गट जी - यात जर्मनी, पोतरुगाल, घाना आणि अमेरिका 
हे संघ आहेत.
गट बी : यात गतविजेते स्पेन, गत-उपविजेते दि 
नेदरलॅण्डस, ऑस्ट्रेलिया आणि चिली हे संघ आहेत.
 
जिंकणार कोण?
बर्‍याच विश्लेषकांच्या अंदाजानुसार मायदेशात 
खेळणार्‍या ब्राझीलला जिंकण्याची सर्वात जास्त संधी 
आहे. बहुतेक अंदाजांनुसार ब्राझील किमान अंतिम 
फेरीत धडक मारणार. ब्राझीलचे प्रसिद्ध प्रशिक्षक 
स्कोलेरी यांच्यानुसार अंतिम फेरीत त्यांच्या संघाची 
गाठ दक्षिण अमेरिकेतील दुसरा बलाढय़ संघ 
अर्जेंटिनाशी पडेल.
फुटबॉल फॅन्स आणि जाणकार यांच्याशिवाय 
आर्थिक क्षेत्रातील मोठय़ा कंपन्याही वेगवेगळ्या 
आर्थिक निकषांच्या आधारे कोण जिंकणार याचा 
अंदाज बांधतात. उदाहरणार्थ, गोल्डमन सॅक्स या 
गुंतवणूक बँकेने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला ३-१ ने 
हरवून ब्राझील विश्‍वकरंडक जिंकणार, असा 
अतिमानवी अंदाज बांधला आहे.
ब्राझीलव्यतिरिक्त इतर हॉट फेव्हरिटस् आहेत र्जमनी, 
अर्जेंटिना आणि स्पेन
 
डार्क हॉर्सेस
गेल्या काही काळात धडाक्याचा खेळ करून लक्ष वेधणार्‍या संघात यावर्षी समावेश आहे बोस्निया-
हर्झगोविनाचा. अनेक वर्षांच्या यादवीनंतर १९९२ मध्ये स्वतंत्र झालेल्या या देशाच्या फुटबॉल टीमचा 
मोठय़ा स्पर्धेतला हा पहिलाच प्रवेश. बोस्नियन टीमला आतापर्यंत युरोपियन चॅम्पियनशिपमध्येही 
प्रवेश मिळू शकला नाही. पण वर्ल्डकप पात्रता फेरीत मात्र या टीमने १0 पैकी ८ सामने जिंकून 
बलाढय़ ग्रीसलाही मागे टाकण्याची किमया केली. यांचा वर्ल्डकपमधील पहिलाच सामना बलाढय़ 
अर्जेंटिनाशी होणार आहे.
बोस्नियासारखेच डार्क हॉर्स असणारे आणखी दोन संघ म्हणजे बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि 
चिली. या संघांवर लक्ष ठेवाच.

हायटेक वर्ल्डकप
क्रिकेटसारख्या खेळात थर्ड अम्पायर, डिआरएस, हॉक-आय अशा अनेक उपायांची आणि 
तंत्रज्ञानाची पंचांना अचूक निर्णय घेण्यासाठी मदत होते. फुटबॉलमध्ये मात्र पंच आणि लाईन्समन 
यांच्यावरच योग्य-अयोग्य निर्णयांची मदार होती. २0१0 वर्ल्डकपमध्ये र्जमनी आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या फ्रॅन्क लॅम्पार्डने केलेला गोल टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत असूनही 
पंचांनी नाकारला आणि मोठे वादंग माजले. याचाच परिणाम म्हणून यावर्षीच्या स्पर्धेपासून गोल-
लाईन हे नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे १४ कॅमेर्‍यांच्या मदतीने 
फुटबॉल गोलरेषेच्या पार गेल्याचा सिग्नल रेफरीच्या मनगटावरील घड्याळावर व्हायब्रेशन आणि 
स्क्रिन-फ्लॅशच्या मदतीने एका सेकंदाच्या आत पोचणार आहे. गोल-लाईनमुळे रेफरींनी नक्कीच 
सुटकेचा श्‍वास सोडला असणार!
 
सोयीनुसार पहा मॅच
भारतातील अँण्ड्रॉईड आणि आय-फोनधारकांसाठी 
'Liv Sports' या अँपमध्ये फक्त १२0 रुपयांमध्ये 
आपल्या सोयीनुसार थेट प्रक्षेपण किंवा रिप्ले 
बघण्याची सोय आहे.
 
ब्राझील पहायचंय?
ब्राझीलमधील वर्ल्डकपच्या 
मैदानांची प्रत्यक्ष सैर करा गुगल 
स्ट्रीटव्ह्यूवर - 
http://goo.gl/fcCxss
 
लक्षवेधी खेळाडू
या पाच खेळाडूंचा खेळ आवर्जून पहावा असा असेल.
१. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) 
२. रोनाल्डो (पोतरुगाल) 
३. नेयमार (ब्राझील) 
४. इनिएस्टा (स्पेन)
५. अर्जेन रॉब्बेन (दि नेदरलॅण्डस्)
 
वर्ल्डकप ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर
ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर वर्ल्डकपची खबरबात 
ठेवण्यासाठी हे अकाउंटस् फॉलो करता येतील.
ट्विटर -
@FIFAWorldCup (Offcial channel)
@FutbolPictures
@Zonal_marking
@WhoScored
https://twitter.com/fifacom/lists
या लिंकवर वर्ल्डकप संबंधित सर्व अकाउंटची यादी 
आहे.
 
इन्स्टाग्राम
@leomessi (Leonel Messi)
@mb459 (Mario Ballotelli - Italy)
@didierdrogba (Didier Drogba - Ivory Coast)
@davidluiz_4 (David Luiz - Brazil)
@neymarjr (Neyma5 - Brazil)
- गणेश कुलकर्णी

 

Web Title: What will the football world cup guide see? How do you see?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.