शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

व्हॉट आॅर्डर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:24 IST

आॅनलाइन ७/१२ चा उतारा ते आधार हे सारं काय आहे, डिजिटल इंडिया की इंडस्ट्री ४.०?

डॉ. भूषण केळकरगेल्या वर्षी मी अमेरिकेत गेलो असताना मित्राबरोबर त्याच्या गाडीतून चाललो होतो. स्टारबक्समध्ये कॉफी प्यायला निघालो. गाडीत बसल्यावर मित्र म्हणाला ‘कॉफी’. तो मित्र माझ्याशी बोलत नव्हता, तो त्याच्या गाडीशी बोलत होता. गाडीनं विचारलं, स्टारबक्स? तो हो म्हणाल्यावर गाडीनं विचारलं, व्हॉट आॅर्डर? तो म्हणाला, माय युजवल फॉर मी, वन मोअर हॉट चॉकलेट! मग गााडीनं सांगितलं की सगळ्यात जवळचं स्टारबक्स २० मिनिटांवर (२० मैलांवर) आहे. तेवढ्यात शॉर्टेस्ट रूट स्क्रीन जीपीएसवर आला. आणि आम्ही निघालो. वाटेत आमच्या गप्पा चालू असताना अचानक गाडी बोलू लागली की ‘आम्हाला पोहोचायला ट्राफिकमुळे उशीर लागेल’ त्यामुळे गाडीनंच मग आमची आॅर्डर (त्या मित्राची नेहमीची कॉफी आणि माझे हॉट चॉकेलट) कॅन्सल करून पुन्हा रिआॅर्डरपण केली. म्हणजे आम्ही (आता उशिराने) पोहोचण्याची वेळ व कॉफी/चॉकलेट येण्याची वेळ साारखीच येईल! मला त्या हॉट चॉकलेटची नितांत गरज होती कारण मी हे सगळं पाहून एव्हाना गपगार पडलो होतो!हे काय आहे?हेच तर आहे इंडस्ट्री ४.०!तुम्ही म्हणाल, अहो अमेरिकेत हे होऊ शकेल; पण भारत आणि इतर विकसनशील देशांत ही फार पुढची गोष्ट आहे.असं म्हणता, जरा तपासून पाहूया.आपल्याकडेही आता शेतातला पाण्याचा पंप चालू करण्यासाठी अनेक शेतकरी मोबाइल फोनचा वापर करताहेत.जन्म दाखला, ७-१२चा उतारा या गोष्टी आता इंटरनेटवरून उपलब्ध होताहेत, नाशिक ते चंद्रपूर सगळीकडेच, देशभर! १०-१२ वर्षांपूर्वी पुण्यात जीपीएसविषयी उपहासानं बोललं जायचं की ११२ सदाशिव आणि ११३ सदाशिव हे दोन पत्ते गूगल शोधूच शकणार नाही; कारण ते कधीच जवळ जवळ नसतात! आज सदाशिव-नारायणपेठ सकट सर्व पुणे गूगल मॅपवर उपलब्ध आहे. तेही अचूक!माझ्या मित्राच्या आजोबांना साधा फोनसुद्धा १५ वर्षांपूर्वी हायफाय वाटायचा. आज ते विजेचं बिल मोबाइल अ‍ॅपवरून भरताहेत आणि बँकत जाणं कमी झालंय. बँकेच्या अ‍ॅपमुळे तब्येतीमुळे नाही बरं का, तब्येत खणखणीत आहे त्यांची!असो, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की इंडस्ट्री ४.० ही लाट, त्सुनामी फक्त युरोप-अमेरिकेसाठी नाही. ते स्वाभाविकच नाही का? थॉमस फ्रिडमनचं वर्ल्ड इज फ्लॅट नावाचं पुस्तक आहे. त्यात जागतिकीकरण, त्याचे सुदूर परिणाम व त्यांची अपरिहार्यता याचं वर्णन आहे. आता हेच बघा ना, सौदी अरेबिया आणि सिरिया-इराणमधील ताणतणावाचा परिणाम पुणे, मुंबई, नाशिकमध्ये पेट्रोलचे भाव वाढण्यात होतोच! एचवन बी व्हिसाच्या अमेरिकेतील नियमातील बदलांचा परिणाम भारतात आयटी कंपन्या किती पदवीधारकांना नोकºया देतील यावर होतो. सबब, इंडस्ट्री ४.० म्हणून जर्मनीत २०११ मध्ये सुरू झालेली ही लाट पुणे-मुंबई-नाशिक-नागपूरच नव्हे तर सातारा-सांगली-मालेगाव-चंद्रपूर अन् रत्नागिरीतपण दिसणार आहे, दिसत आहे.आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा ती दिसतेय. त्याची ही उदाहरणं..१) गाड्यांचं पार्किंग आता आॅटोमेटेड होतं आहे. पार्किंग लॉटमध्ये पार्किंग उपलब्ध आहे. ते कुठे आहे त्याचा नकाशाच तुम्हाला उपलब्ध होतो.२) घरातला रेफ्रिजरेटरसुद्धा नुसतेच तपमान नियंत्रित करतो असं नाही तर कुठल्या प्रकारचं व किती अन्न आहे याचा अंदाज घेऊन ते नियंत्रण करतोय. नुसतं एवढंच नाही तर तुम्हाला आजकाल मोबाइल वरून घराबाहेर कित्येक मैलच्या अंतरावरूनही ते नियंत्रण ठेवता येऊ शकतं.३) खरेदी करताना किमती व वस्तू/सेवांचा दर्जा याची तुम्हाला तुलना करता येते आहे. त्यात इतर लोकांच्या अनुभवावरून निर्णय पक्का करता येतोय.४) म्हणजे निष्कर्ष असा काढता येईल की इंडस्ट्री ४.० विकसित देशांमध्ये जेवढं खोलवर रुजलंय आणि जेवढं व्यापक झालंय, तेवढं भारतात (शहरी/ग्रामीण) नसलं तरी या बदलाची लाट भारतात आली आहे, रुजली आहे नक्की. ती वाढत जाणार हेही नक्की. डिजिटल इंडिया हा विचार केवळ संकल्पना नव्हे तर मूर्त रूपात येत असणारी क्रांती आहे.७-१२ चा उतारा, जन्म दाखलाा, एवढंच काय तर संपूर्ण आधार प्रणाली ही इंडस्ट्री ४.० चा आविष्कार आहे. सरकारी पातळीवरही या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतो आहे. कालचीच बातमी आहे - ‘पुणे महापलिकेचे इस्रोच्या सॅटेलाइटद्वारे अनधिकृत बांधकामांवर लक्ष’...आता बोला!!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com)