काय वाट्टेल ते घालाल तर.?
By Admin | Updated: April 16, 2015 16:58 IST2015-04-16T16:58:57+5:302015-04-16T16:58:57+5:30
मी काय मला वाट्टेल ते घालीन, लोकांना काय समजायचं ते समजू दे, असं म्हणत अनेकजण (खरंतर अनेकजणी) ऑफिसात काय वाट्टेल ते घालतात.

काय वाट्टेल ते घालाल तर.?
मी काय मला वाट्टेल ते घालीन, लोकांना काय समजायचं ते समजू दे, असं म्हणत अनेकजण (खरंतर अनेकजणी) ऑफिसात काय वाट्टेल ते घालतात.
तंग कपडे, घट्ट कपडे, ङिारमिरीत साडय़ा, कपडे.
हे सारं का तर आपल्याकडे लोकांचं लक्ष जावं म्हणून आणि आपण किती मॉडर्न आहोत, वेगळे आहोत हे लोकांना दिसावं म्हणून!
पण असं तुम्ही करत असाल तर शिष्ट-अशिष्ट संकेत फक्त लक्षात ठेवा.
1) प्रत्येक ऑफिसमध्ये वावरण्याचे, कपडे घालण्याचे काही संकेत असतात, आपल्याला ते कितीही जुनाट वाटले तरीही! त्यामुळे तिथल्या वातावरणात अशोभनीय वाटले तरी शक्यतो तिथल्या वातावरणाशी मिळतेजुळते कपडे घालावेत.
2) आपल्याला आवडीचे कपडे बाहेर घालावेत पण आपण फार कूल आहोत हे दाखवण्यासाठी भडक टी-शर्ट ऑफिसमध्ये घालू नयेत.
3) अंतर्वस्त्र दिसतील असे कपडे घालू नयेत. खोल गळे, उघडय़ा पाठी तर अत्यंत असभ्य!
4) आपली इनरवेअर दिसेल अशा जिन्स मुलंही घालतात, मुलींनी आणि मुलांनीही त्या ऑफिसमध्ये शनिवारीसुद्धा म्हणजे विकेण्डलाही घालू नयेत!
5) अतिगबाळं राहणंही तुमच्या अत्यंत निष्काळजी वृत्तीविषयी बोलतं, ते ही टाळाच!
- मृण्मयी सावंत