शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नुसतं ट्रेडमिलवर पळण्यासारखं स्पर्धेत धावून काय मिळणार? बघा कोरोना पॉज काय म्हणतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 17:04 IST

माहिती तर पाहिजे, आपण कशासाठी पळतोय? कोरोना काळानं बेरोजगारी लादणं सुरूकेलं आहे, हे मान्य; पण तरुणांना तरी कुठं स्वत:ची नेमकी ओळख आहे? - तुमचं पॅशन काय, हे तरी यानिमित्तानं शोधा.

ठळक मुद्देआपली जीवनशैली कधी बदलणार याचा विचार झाला पाहिजे. 

डॉ. अच्युत गोडबोले

कोरोनाकाळ हा आताचा आहे. आता आणि एरव्हीही महत्त्वाचं काय, तर आपण आयुष्याकडं कसं बघतो?त्यावर खूप अवलंबून आहे. तरुण पिढीतले काही अपवाद सोडले तर बहुतेक जण आपलं आयुष्य पैसा, खोटी प्रतिष्ठा, करिअर यांच्या मागे धावण्यात घालवतात. स्पर्धा परीक्षा, त्यातली एकेका मार्कासाठीची जीवतोड मेहनत, नोकरीतल्या प्रमोशनसाठीची खेचाखेची, टू-बीएचकेसाठी जिवाचं रान.. यातच जगणं अडकून राहातं. सर्वस्व पणाला लावून एकाच गोष्टीसाठी इतर सगळे आनंद पणाला लावणं थांबलं पाहिजे. मुख्य गडबड इथे आहे. करोना आता आहे, थोडय़ा काळाने आटोक्यात येईलही. मात्न आपली जीवनशैली कधी बदलणार याचा विचार झाला पाहिजे. आपलं नेमकं झालंय काय ते आधी पाहू.1. गेल्या तीस वर्षात, जागतिकीकरण आल्यानंतरच्या काळात आपल्या सगळ्या आशा-आकांक्षा अवाढव्य होऊन बसल्या. पाश्चिमात्य जीवनशैलीचा मोह आपल्याला पडला. भुलवणा:या जाहिरातींचा सातत्यानं मारा सुरू झाला. आपला अटेंशन स्पॅन कमी होऊ लागला. हमखास यशस्वी व्हा, सर्वोत्कृष्ट सीईओ बना अशा पुस्तकांचा मारा सुरू झाला. तरु ण पिढी अतिमहत्त्वाकांक्षी बनली.2. मात्र तसं जगणं आत्मकेंद्री होत असताना अशी एखादी समूह पातळीवरची आपत्ती आली, की तरुण पिढी बिचकते, सैरभैर होते. भवतालाकडे आपण निकोप दृष्टीने बघतच नाही कधी. आपला दृष्टिकोन चंगळवादी, स्पर्धात्मक असा आपणच करून ठेवलाय. तो मुळात बदलण्याची गरज आहे. त्यातूनच या काळातली उत्तरं सापडू शकतील.3. आता तरी आपण आयुष्याकडं वेगळ्या, समृद्ध  नजरेनं बघण्याचा सराव करूया. मित्न, नातेवाईक यांचं मोल समजून घेऊया. स्वत:बरोबरचं नातंही नव्यानं शोधूया. पूर्वी चांगला माणूस कोण म्हणवला जायचा? तर ज्याला साहित्य-संगीत आणि कलांची आवड आहे, जो विज्ञाननिष्ठ आहे, विवेकवादी, परोपकारी आहे. आता सगळ्या व्याख्या बदलल्या. त्या कशामुळे? 4. अगदी आयुष्याचा जोडीदार निवडतानाही मानवी गोष्टी बाजूला ठेवत मुलं-मुली भौतिकच निकष लावतात.  चांगला माणूस  क्वचितच निवडला जातो. बहुतेकदा त्या माणसाऐवजी टू-थ्री बीएचके फ्लॅट, फोर व्हिलर यांचीच निवड होते. या सगळ्यात काय चूक, काय बरोबर याचा आता थोडा थबकून विचार करूया.5. या काळाचा प्रॉब्लेम मला काय वाटतो, तर मोठमोठी स्वप्नं हरेकाला दाखवली जातात; पण शंभरातल्या 1क् लोकांनाच शिखरावर पोहोचण्यात यश मिळतं. बाकीच्या नव्वद जणांचं काय? त्यांच्या अस्वस्थतेचं, अपयशाचं, नैराश्याचं उत्तर कोण देणार? फसव्या वक्त्यांची प्रेरणादायी भाषणं ऐकून कित्येक तरुण असेच वाहवत जातात. अंगाच्या कौशल्यांना वाव देत आनंदाने उपजीविका करण्याऐवजी स्पर्धेत अडकतात. आपल्या आयुष्याची सातत्याने इतरांशी तुलना करत राहातात. 

मग करायचं काय?1. ऑनलाइन वावर असो की वास्तव जग, अनेक तरुणांचं भकास जगणं हे करोनाच्याही पूर्वीचं वास्तव आहे. तरु ण पिढी जणू अखंड एका ट्रेडमिलवर धावते आहे. ध्येय काय, जायचं कुठं आहे हे नक्की माहीत नाही. पण धावताहेत. मी याचं गेली अनेक वर्षे निरीक्षण करतोय.2. आता या सा:यात अचानक कोरोना आला. आता या सगळ्या सक्तीच्या लॉक झालेल्या काळात करायचं काय, असा ज्याच्या-त्याच्या पुढे एकदम प्रश्नच निर्माण झाला.3. तर असा प्रश्न पडलेल्यांना मी सांगेन आधी आपण स्वत:च स्वत:ची तपासणी करावी. आधी महत्त्वाचं हे, की स्वत:चा शोध घ्या. ही त्यासाठी मिळालेली चांगली संधी आहे. या इष्टापत्तीचं तरु णांनी सोनं करावं. नोकरी-व्यवसायातली जास्तीची कौशल्यं तर  या काळात शिका. भाषा, संभाषणकला शिका; पण सोबतच भवतालाकडे जरा संवेदनशीलतेने बघा. 4. इतरांचं दु:ख कधी-कितपत जाणवतं आपल्याला? आज गरिबी/बेरोजगारी किती वाढलीय. आपण देश म्हणून जीडीपीच्या अगदी दीडेक टक्का आरोग्यव्यवस्थेवर खर्च करतो. यातून काय प्रकारचं भवितव्य नव्या पिढीला मिळणार आहे? एकीकडे अकुशल, अशिक्षित माणसं, तर दुसरीकडे हजारो शिक्षक बेरोजगार. विचारा स्वत:ला हा विरोधाभास का? आपली व्यवस्था भ्रष्ट, किडलेली असण्याची मुळं कशात आहेत? हे प्रश्न पडले पाहिजेत. नसतील पडत तर विचारा स्वत:ला, की माङयातलं काय मेलंय नक्की? लहान मुलासारखं कुतूहल माङयात का नाही?आपलं काहीतरी चुकलंय. आपलं काहीतरी राहून गेलंय हे जाणवू द्या. कोरोना येण्याआधीच आपण ज्या चक्रात अडकलो होतो, त्याचं स्वरूप समजावून घ्या. आपण प्रश्न विचारूच नयेत अशी व्यवस्था यंत्नणोने केलेली असते. तो कट ओळखा.5. येत्या काळात ज्या क्षेत्नांना मोठी मागणी असणार आहे ते आहेत इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा, थ्री-डी-फोर -डी प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हचरुअल रिअॅलिटी. यातली कौशल्यं शिकायला घ्या.6. महत्त्वाचं हे, की जुन्या वृत्ती बदलून काही वेगळं जगणं सुरू करू शकतो का हे बघा. अनेक विषयांमधल्या नवनव्या गोष्टी समजून घ्या.7. या काळाला सामोरं जाण्याचा एकच एक फॉम्यरुला नाही. आणि ही आपत्ती काय कायमची नाही. नंतर उभं राहायचं असेल, यातून तगून-तरून जायचं असेल, तर काही गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे, बदलाला सामोरं जाणं. दुसरं, तुमचे बेसिक्स क्लियर असणं. शिवाय तुम्हाला अनलर्न आणि रिलर्न करता येणं महत्त्वाचं.  नवे ट्रेंड्स कळले पाहिजेत. व्यवहार महत्त्वाचा आहेच; पण त्यापलीकडेही खूप मोठं जग आणि त्यातल्या उलथापालथी आहेत. त्या पाहा. सापडेलच वाट.

मुलाखत आणि शब्दांकन- शर्मिष्ठा भोसले