या वॉट्सअँपच करायचं काय
By Admin | Updated: March 12, 2015 15:08 IST2015-03-12T15:08:07+5:302015-03-12T15:08:07+5:30
परीक्षेच्या काळात घरोघर पेटलेलं एक नवं युद्ध! या व्हॉट्सअँपचं करायचं काय?

या वॉट्सअँपच करायचं काय
#Iamsleepless
#whoallareup
#iusedtosleep
हे आहेत तरुण ‘परीक्षाग्रस्त’ जगातले नवे लोकप्रिय व्हॉट्सअँप. मात्र हे जागरण अभ्यासामुळे होत नाहीये, तर जागं राहण्याची सवयच लागल्यानं अनेकांची झोप उडाली आहे.
व्हॅम्पिंग
या शब्दाचा डिक्शनरीत अर्थ पाहायला जाऊ नका. नव्या यंग स्लॅँगमधे (स्लॅँग म्हणजे शिवराळ भाषा) या शब्दाचा अर्थ भलताच आहे. व्हॅम्पिंग म्हणजे अशी तरुण मुलं, ज्यांना रात्री झोपणं हा प्रकारच अत्यंत बोअरिंग वाटतो. त्यांना झोपेपेक्षा मित्रमैत्रिणींशी बोलणं महत्त्वाचं वाटतं. म्हणून मग ते बेडवर झोपल्या झोपल्या स्वत:चे आळसटलेले फोटो काढतात. लूकिंग अँट द मून म्हणत स्वत:चे फोटो व्हॉट्सअँप ग्रुपवर टाकले जात आहेत. हे असं ‘अतिजागरण’ करकरून अनेकांची उष्णता वाढून
त्यांची ‘तोंडं’ आली आहेत!!
परीक्षेचे दिवस आणि व्हॉट्सअँप चेक केल्याशिवाय कुणाला चैनच पडत नाही!
असं म्हणतात की, सलग तीन मिण्टही तरुण मुलं व्हॉट्सअँपपासून लांब राहू शकत नाहीत. दर तीन मिण्टातून एकदा तरी फोन हातात घेतलाच जातो; नवा मॅसेज तर आला नाही हे पाहण्यासाठी!
परीक्षेच्या कठीण दिवसांत हे असं व्यसन; निकाल लावेल की काय?
व्हॉट्सअँपवरचे ग्रुप?
त्यांचं परीक्षेच्या काळात काय करायचं?
बोलत सुटलं तर वेळ जातो, नाही बोललो तर दोस्त त्या ग्रुपवरच आपली यथेच्छ धुलाई करतात? सोडताही येत नाही, पोस्टताही येत नाही; आणि नुस्तं वाचण्यातही चिक्कार वेळ जातो!
या सार्यात अभ्यास कसा करणार?
अनेक घरांत तर अबोले सुरूच आहेत.
पालकांनी डाटापॅकच बंद करून टाकले. पॅक मारायला पैसेच द्यायला तयार नाहीत; का तर म्हणे सतत टुकूटुकू?
अभ्यास कर मुकाट!
पण व्यसनी माणसाला व्यसन केल्याशिवाय जसं चैन पडत नाही; तसं नेटपॅकशिवाय अनेकांचं जगणं मुश्कील झालंय. एकदम जल बिन मछली.
तडफड होतेय नुस्ती!
काही घरांत कफ्यरू लागलाय, परीक्षा संपेर्यंत मोबाइल पूर्ण बंद!
मात्र या बंदीनं अभ्यासातलं लक्ष वाढण्याऐवजी लक्ष पूर्णच उडालंय!
पण हे आईबाबांना सांगणार कसं?