शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

यंदा काय डेकोरेशन?- इको फ्रेण्डली सजावटीच्या या घ्या आयडिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 07:00 IST

आपण निसर्गाच्या अधिक जवळ जाऊ, त्याची काळजी घेऊ या भावनेनं डेकोरेशनही सजवता येऊ शकतं, त्यासाठी या आयडिया!

ठळक मुद्देपर्यावरणाला हातभार लागेल, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन आपला भोवताल सुंदर बनवता येईल असं नियोजन करा. हे डेकोरेशन सुंदर होईलच.

- आनंद पेंढारकर

गणपती बाप्पाचं आगमन अगदीच दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सगळीकडे डेकोरेशनची धामधूम आहे. सध्या जो तो एकमेकाला विचारतोय की, डेकोरेशन काय करणार?दरवर्षीपेक्षा भारी, सगळ्यांपेक्षा भारी डेकोरेशन यंदा करायचंच म्हणून एक चुरस आपल्यात लागतेच. यंदा साधंच काहीतरी करू असं कितीही ठरवलं तरी ऐनवेळी काहीतरी भारी सुचतंच किंवा करावंसं वाटतंच आणि मग ‘डेकोरेशन’ची धामधूम जास्त वाढते.मंडळांच्या गणपतीचं डेकोरेशन, सोसायटीत बसवलेल्या गणपतीचं डेकोरेशन आणि घरात स्थापन केलेल्या मूर्तीचं डेकोरेशन असे तीन प्रकार नाही म्हटलं तरी असतातच.आणि दरवर्षीप्रमाणे या काळात इको-फ्रेण्डली गणपतीचीही चर्चा असतेच. थर्माकोल वापरू नये आणि प्लॅस्टिक वापरू नये हे सांगणंही आता जुनं झालं, कारण त्याचे तोटे तरुण मुलांनाही कळतातच. त्याशिवाय बाजारातून रेडिमेड मखरी आणून त्या सजवणंही अनेकांना काही फारसं आवडत नाही.त्यामुळे हटके काहीतरी करणारे काही रेडिमेड थर्माकोलच्या वाटय़ाला जात नाहीत. मात्र तरीही इको-फ्रेण्डली म्हणून काय काय नि कशी सजावट करावी हे अनेकदा सुचत नाही किंवा आपल्या आवाक्यात आहे काही असं वाटत नाही.त्यामुळे यंदा जर तुम्ही इको-फ्रेण्डली सजावट अर्थात डेकोरेशन करणार असालच तर या काही आयडिया खास तुमच्यासाठी.

सहज-सोपं आणि निसर्गप्रेमी डेकोरेशनसाठी...

1. मूर्ती छोटी आणा. शक्यतो स्वतर्‍च्या हातांनी मूर्ती घडवा. 2. मूर्तीला कुठलेही मेटलचे रंग नकोत. नैसर्गिक रंग द्यावेत. म्हणजे आपण मूर्तीचं विसर्जन केलं तरी पाण्याचे स्नेत दूषित होणार नाहीत. त्याचा त्रास अगदी कीटक, जीवजंतू, मुंगीलाही होणार नाही.3. छान प्रसन्न दिवे लावा, लायटिंगच्या माळा टाळा. त्यानं वीज तर जळतेच पण नंतर जो इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो, तेच फोकस आणि दिव्यांचंही. त्या ई-कचर्‍यावरही आपल्याकडे काहीही उत्तर नाही.4. पानांचे द्रोण वापरा. प्लॅस्टिक, कागदी, थर्माकोलचे नकोत. पत्री, द्रोण, निर्माल्याची फुलं यापासून खत बनवता येतं किंवा नैसर्गिक रंग बनवता येतात का ते पाहा. ते कसं करायचं याचे अनेक व्हिडीओज् उपलब्ध आहेत.5. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या माहितीचे प्रयोग करू नयेत. तुरटीचे गणपती करू नये त्यानं पाणी दूषित होण्याचा धोका आहेच.6. पीओपीचे गणपती टाळावेत. अलीकडेच औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वाहत्या जलस्नोतात, नदी-तलावात पीओपी विसर्जनाला बंदी आहे. ते कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक आहे नाहीतर कायद्यानं कारवाई होऊ शकते.7. डेकोरेशन करायचं तर घरातल्या चादरी, शाल, दुपट्टे वापरा. कागद, प्लॅस्टिक नको. 8. झाडांचं, फूलझाडांचं, रोपांचं डेकोरेशन करा, ती रोपं नंतर वाटून टाका.9. घरातच नाही तर कॉलनी आणि परिसरातल्याही निर्माल्याची काळजी घ्या. त्यावर प्रयोग करा.10.  छान प्रसन्न सजावट करा आणि पर्यावरणाला हातभार लागेल, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन आपला भोवताल सुंदर बनवता येईल असं नियोजन करा. हे डेकोरेशन सुंदर होईलच.

( लेखक पर्यावरण अभ्यासक आहे.)