यंदा काय डेकोरेशन?- इको फ्रेण्डली सजावटीच्या या घ्या आयडिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 07:00 AM2019-08-29T07:00:00+5:302019-08-29T07:00:02+5:30

आपण निसर्गाच्या अधिक जवळ जाऊ, त्याची काळजी घेऊ या भावनेनं डेकोरेशनही सजवता येऊ शकतं, त्यासाठी या आयडिया!

What Decoration This Year? - This Eco Friendly Decorative Take Idea! | यंदा काय डेकोरेशन?- इको फ्रेण्डली सजावटीच्या या घ्या आयडिया!

यंदा काय डेकोरेशन?- इको फ्रेण्डली सजावटीच्या या घ्या आयडिया!

Next
ठळक मुद्देपर्यावरणाला हातभार लागेल, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन आपला भोवताल सुंदर बनवता येईल असं नियोजन करा. हे डेकोरेशन सुंदर होईलच.

- आनंद पेंढारकर

गणपती बाप्पाचं आगमन अगदीच दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सगळीकडे डेकोरेशनची धामधूम आहे. सध्या जो तो एकमेकाला विचारतोय की, डेकोरेशन काय करणार?
दरवर्षीपेक्षा भारी, सगळ्यांपेक्षा भारी डेकोरेशन यंदा करायचंच म्हणून एक चुरस आपल्यात लागतेच. यंदा साधंच काहीतरी करू असं कितीही ठरवलं तरी ऐनवेळी काहीतरी भारी सुचतंच किंवा करावंसं वाटतंच आणि मग ‘डेकोरेशन’ची धामधूम जास्त वाढते.
मंडळांच्या गणपतीचं डेकोरेशन, सोसायटीत बसवलेल्या गणपतीचं डेकोरेशन आणि घरात स्थापन केलेल्या मूर्तीचं डेकोरेशन असे तीन प्रकार नाही म्हटलं तरी असतातच.
आणि दरवर्षीप्रमाणे या काळात इको-फ्रेण्डली गणपतीचीही चर्चा असतेच. थर्माकोल वापरू नये आणि प्लॅस्टिक वापरू नये हे सांगणंही आता जुनं झालं, कारण त्याचे तोटे तरुण मुलांनाही कळतातच. त्याशिवाय बाजारातून रेडिमेड मखरी आणून त्या सजवणंही अनेकांना काही फारसं आवडत नाही.
त्यामुळे हटके काहीतरी करणारे काही रेडिमेड थर्माकोलच्या वाटय़ाला जात नाहीत. मात्र तरीही इको-फ्रेण्डली म्हणून काय काय नि कशी सजावट करावी हे अनेकदा सुचत नाही किंवा आपल्या आवाक्यात आहे काही असं वाटत नाही.
त्यामुळे यंदा जर तुम्ही इको-फ्रेण्डली सजावट अर्थात डेकोरेशन करणार असालच तर या काही आयडिया खास तुमच्यासाठी.

सहज-सोपं आणि निसर्गप्रेमी डेकोरेशनसाठी...

1. मूर्ती छोटी आणा. शक्यतो स्वतर्‍च्या हातांनी मूर्ती घडवा. 
2. मूर्तीला कुठलेही मेटलचे रंग नकोत. नैसर्गिक रंग द्यावेत. म्हणजे आपण मूर्तीचं विसर्जन केलं तरी पाण्याचे स्नेत दूषित होणार नाहीत. त्याचा त्रास अगदी कीटक, जीवजंतू, मुंगीलाही होणार नाही.
3. छान प्रसन्न दिवे लावा, लायटिंगच्या माळा टाळा. त्यानं वीज तर जळतेच पण नंतर जो इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो, तेच फोकस आणि दिव्यांचंही. त्या ई-कचर्‍यावरही आपल्याकडे काहीही उत्तर नाही.
4. पानांचे द्रोण वापरा. प्लॅस्टिक, कागदी, थर्माकोलचे नकोत. पत्री, द्रोण, निर्माल्याची फुलं यापासून खत बनवता येतं किंवा नैसर्गिक रंग बनवता येतात का ते पाहा. ते कसं करायचं याचे अनेक व्हिडीओज् उपलब्ध आहेत.
5. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या माहितीचे प्रयोग करू नयेत. तुरटीचे गणपती करू नये त्यानं पाणी दूषित होण्याचा धोका आहेच.
6. पीओपीचे गणपती टाळावेत. अलीकडेच औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वाहत्या जलस्नोतात, नदी-तलावात पीओपी विसर्जनाला बंदी आहे. ते कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक आहे नाहीतर कायद्यानं कारवाई होऊ शकते.
7. डेकोरेशन करायचं तर घरातल्या चादरी, शाल, दुपट्टे वापरा. कागद, प्लॅस्टिक नको. 
8. झाडांचं, फूलझाडांचं, रोपांचं डेकोरेशन करा, ती रोपं नंतर वाटून टाका.
9. घरातच नाही तर कॉलनी आणि परिसरातल्याही निर्माल्याची काळजी घ्या. त्यावर प्रयोग करा.
10.  छान प्रसन्न सजावट करा आणि पर्यावरणाला हातभार लागेल, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन आपला भोवताल सुंदर बनवता येईल असं नियोजन करा. हे डेकोरेशन सुंदर होईलच.


( लेखक पर्यावरण अभ्यासक आहे.)

Web Title: What Decoration This Year? - This Eco Friendly Decorative Take Idea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.