पाहतो आम्ही ‘ते’. मग?

By Admin | Updated: October 1, 2015 17:56 IST2015-10-01T17:56:01+5:302015-10-01T17:56:01+5:30

आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अनेक मुली या सा:याच्या अॅडिक्ट आहेत. जरा त्यांच्याशी बोललं की कळतं, त्यांचे प्रश्न भलतेच आहेत. त्या जीव रमवतात कुठंतरी इतकंच.

We look at 'Te'. Then? | पाहतो आम्ही ‘ते’. मग?

पाहतो आम्ही ‘ते’. मग?

>टीप - खालील वाचकांची पत्रं आहेत....
---------------------------
 
मुली आणि पॉर्न?
लगेच संस्कृती बुडते असं काही बोललं की?
पण आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अनेक मुली या सा:याच्या अॅडिक्ट आहेत.
जरा त्यांच्याशी बोललं की कळतं, त्यांचे प्रश्न भलतेच आहेत. त्या जीव रमवतात कुठंतरी इतकंच.
मला वाटतं, जर बोलायला, समजून घ्यायला, आधार द्यायला जिवाभावाची माणसं असतील ना सोबत, तर कुणी मुद्दाम असलं परकं, कृत्रिम सुख पाहत बसणार नाही!
पण हे सारं कुणाला आपल्या समाजात पटत नाही, कळतही नाही!
- अनघा, पुणो
 
पाच वर्र्षापूर्वी जेव्हा मी बारावीत शिकत असताना व्हिडीओ पाहिला. यापूर्वी तसल्या पुस्तकातूनच काहीबाही वाचायचो. तेही चोरूनलपून, क्रमिक पुस्तकांच्या आत ठेवून जेणोकरून कोणाला संशय येणार नाही. आता स्मार्ट मोबाइलचा काळ आहे.  मी पदवीच्या पहिल्या वर्षाला असतानाच मोबाइलमध्ये पहिल्यांदाच पोर्न व्हिडीओ पाहिला. आपण आतार्प्यत जे कधीच पाहिलं नाही ते पाहिल्यामुळे चांगलंच वाटत होतं. परंतु हे व्हिडीओ पाहिल्यानंतर बैचेनी अशी काही वाटली नाही कारण आजर्प्यत ते वाचण्यात होतं आज ते दृश्य स्वरूपात पाहिलं होतं. अनेक दिवसांपासून ‘त्या’ क्रियेविषयी जी माहिती मिळत नव्हती, ती मिळाली एकदाची! मग जेव्हा पहावेसे वाटे तेव्हा मित्रंकडून ब्लूटूथने घ्यायचो. पाहिलेल्या व्हिडीओवर चर्चाही रंगाला यायची. सुरुवातीच्या मित्रंसोबतच्या चावट गप्पा या कल्पित असायच्या; परंतु आता पुराव्यासकट चर्चा चालायची. परंतु या अश्लील चर्चेत घाणोरडं असं काही वाटलं नाही. आणि का वाटावं,  पोर्नमध्ये काम करणा:या अभिनेत्रीला घेऊन हिंदी चित्रपट काढले जातात, सगळंच संमत होतंय, तर तरुण मुलांनी त्यापासून लांब रहावं, अशी अपेक्षाच अनाठायी आहे. एक मात्र नक्की, लहान वयातच अशा पोर्न साइट या पाहिल्यामुळे मुलं-मुलींच्या मनावर त्याचा खूप परिणाम होतो आणि ते धोकादायक आहे.                                                                                                                                                                                
वैभव, लातूर
 
मी सातवीत होतो तेव्हा गुपचूप सेक्सी फोटो पहायचो, मग व्हिडीओ पाहू लागलो, चुकतंय आपलं हे कळायचं मला, पण स्वत:ला थांबवता आलं नाही. उलट तसलं काही बरंच फोनमध्ये असलेल्या मित्रंशी मी मैत्री केली. एकीकडे गिल्ट वाटायचं, एकीकडे मजा यायची. आता मी अकरावीत आहे, पण दहावीचं वर्ष सुरू असताना अभ्यासात लक्ष घातलं आणि ते व्यसन कसंबसं सोडवलं. मात्र खरं सांगतो, जेव्हा केव्हा मोबाइल हातात येतो, मी आजही स्वत:ला कण्ट्रोल करू शकत नाही.
- एक मित्र
 
ंमुलंच पोर्न बघतात, हा एक गैरसमज आहे. मुलीही बघतात. माझी एक चांगली मैत्रीण आहे, मी तिला मोबाइलमध्ये नवनवीन गाणी टाकून देत आहे. पण एकदा तिनंच सांगितलं की, तुङयाकडे तसलं काही असेल तर मला दे! 
हे असं राजरोस मागून पाहतात काही मुली, त्यामुळे हा प्रश्न ‘फक्त तरुणांचा’ आहे असं कुणी म्हणू नये. आणि बंदीनं प्रश्न सुटतील असा भाबडा विचार करू नये.
-विशाल
 
‘भाई तेरे पास नयेवाले बंडू होंगे तो दे ना’
असं कॅम्प्समध्ये तरुण मुलं एकमेकांना मुलींसमोरही विचारतात.
बंडू म्हणजे पोर्नचं एक विनोदी नाव.
गंमत म्हणून पाहणं, सोडून देणं हा काही गुन्हा नाही. आमच्या वयात हे एक तारुण्यसुलभ आकर्षण असतंच.
पण बंदी घाला, अगदी गुन्हे दाखल करा जोवर मोबाइलवर हे सारं मुक्त उपलब्ध आहे, तोवर तरुण मुलांना कसं आवरणार?
आणि का?
सगळेच काही अॅडिक्ट होत नाहीत लगेच! सगळ्या गोष्टी संस्कारात तोलणंच चूक आहे.
-एक मित्र
 
पालक इमोशनल ब्लॅकमेल करतात. मुलं ‘तसलं काही’ पाहतात याचा त्यांना धक्का बसतो. ते लगेच संस्कारबिनस्कार सांगतात. पण यासा:यात तरुण मुलांची घुसमट होतेय याचा कुणीच विचार करत नाही.
आपल्याकडे मुली तरी नाजूक विषय मैत्रिणीशी, आईशी बोलतात. शेअर करतात. समस्या असेल तर उत्तरं मिळवतात. पण मुलांचं काय?
ते घरात कुणाशी बोलत नाही. त्यांना काही समस्या असेल हेच घरात कुणी लक्षात घेत नाही. घरात वडिलांशी बोलणं हा तर खूप लांबचाच विषय. मग मित्रंशी बोलावं लागतं. ते एवढे हुशार की काही माहिती नसताना उत्तरं देतात, सल्ले देतात. नाहीतर पोर्न दाखवतात. 
जास्त कुणाशी बोललं तर लोकांना वाटतं, याचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे.
मग काय आपल्याकडे स्मार्टफोन आहे. फोन आपला, प्रश्न आपला, उत्तरं आपली. त्यामुळे सरसकट मुलांना आणि  पोर्नला दोष देण्यापेक्षा घरात संवाद कसा वाढेल, मुलांना आपल्याशी बोलता कसं येईल एवढं जरा पालक-शिक्षकांनी पहायला हवं.
- जी. उमेश

Web Title: We look at 'Te'. Then?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.