आम्ही हपापलेले बघे

By Admin | Updated: October 22, 2015 21:36 IST2015-10-22T21:36:36+5:302015-10-22T21:36:36+5:30

आमच्या खेडय़ापाडय़ात ‘तसलं काही’ कुणी पाहत असेल असं मला वाटत नव्हतं. पोरांच्या मोबाइलमधे पैसेही नसतात.

We look down on useless | आम्ही हपापलेले बघे

आम्ही हपापलेले बघे

 आमच्या खेडय़ापाडय़ात ‘तसलं काही’ कुणी पाहत असेल असं मला वाटत नव्हतं.

पोरांच्या मोबाइलमधे पैसेही नसतात.
ते फक्त तालुक्याच्या गावाहून गाणी भरून आणतात. दिवसभर ऐकतात.
मोबाइल मारून आणणं म्हणतो आम्ही त्याला.
आणि त्या मोबाइलमधे सेक्सी क्लिप्सपण असतात हे मला माहितीच नव्हतं, मी पाहिलंही नव्हतं.
गावातल्या कॉलेजात जाणा:या पोरांना गाठलं. ते दाव म्हणालो.
त्यांनी दावलं नी मी खपलोच!
काय काय पोरं पाहतात.
आणि मग पोरं सांगत होती की, पोरी बी पाहतात.
मी स्वत: अनुभव घेतला म्हणून आता मला पटलं की, खेडय़ापाडय़ात पण पोरं तसलं काही पाहतात. त्यांना सगळं माहिती असतं. एक पोरगं मला म्हणालं, टीव्हीवर सनी लिओनीची जाहिरात लागतेय तू तेवढीच पाहत जा, तुला तेच ङोपेल!
ती जाहिरात मी ‘त्या’ नजरेनं पहिल्यांदा पाहिली, तेव्हा लक्षात आलं की मी अडाणी आहे!
एकच विनंती करतो, आमच्या खेडय़ापाडय़ातल्या पोरांना पुन्हा पुन्हा सांगा, दुष्काळ वाईट आहे, हे असलं पाहून पोट नाही भरणार, कामं करा!
बाकी काय सांगू.
- कुंडलिक पाटील

Web Title: We look down on useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.