वी आर ‘नॉट’ दॅट सोशल!

By Admin | Updated: February 1, 2017 15:42 IST2017-02-01T15:42:45+5:302017-02-01T15:42:45+5:30

जगभरात सतत हा नाही तर तो रिपोर्ट जाहीर होत असतो. सतत. आता अलीकडेच झाला की, जर्मनीचा पासपोर्ट जगात सगळ्यात ताकदवान आहे. नंबर वनचा पासपोर्ट तो आहे आणि भारताचा नंबर लागला ८१ वा. वाईट वाटलं वाचून...

We Are Not That Social! | वी आर ‘नॉट’ दॅट सोशल!

वी आर ‘नॉट’ दॅट सोशल!

 काय ‘चाल्लंय?’
सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचक

जगभरात सतत हा नाही तर तो रिपोर्ट जाहीर होत असतो. सतत. आता अलीकडेच झाला की, जर्मनीचा पासपोर्ट जगात सगळ्यात ताकदवान आहे. नंबर वनचा पासपोर्ट तो आहे आणि भारताचा नंबर लागला ८१ वा. वाईट वाटलं वाचून...
पण एक रिपोर्ट वाचून जरा आनंदच झाला...
म्हणजे आपण मागे आहोत याचा आनंद वाटावा असेही दिवस आता आले आहेत..
तर मुद्दा असा की, हुटसूट आणि वी आर सोशल या दोन कंपन्यांनी अभ्यासबिभ्यास करून एक अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केला. त्यांचा अहवाल काय तर जगातल्या कुठल्या देशातले फेसबुक यूजर्स सगळ्यात अ‍ॅक्टिव्ह आहेत.
तर त्यात पहिला नंबर आला आॅस्ट्रेलियाचा. तिथल्या एकूण यूजर्सपैकी ७५ टक्के यूजर्स रोजच अ‍ॅक्टिव्ह असतात. रोज आपापल्या मोबाइलवरून फेसबुक तपासतात. त्याखालोखाल इटाली आणि त्यापाठोपाठ पोलंडचा नंबर लागतो.
जगभरातल्या एकूण फेसबुक यूजर्सपैकीही ५५ टक्के लोक रोज अ‍ॅक्टिव्ह असतात.
आणि मुख्य म्हणजे आता जगभरात फेसबुक वापरणाऱ्यांपैकी ९१ टक्के यूजर्स हे मोबाइलवरूनच फेसबुक हॅण्डल करतात...
तर ही झाली जगात काय चाललंय याची माहिती...
आता यात आनंद वाटावा असं काय आहे?
तर आनंद याचा की, रोज अ‍ॅक्टिव्ह यूजर्सच्या यादीत भारताचा क्रमांक बराच खाली आहे...
म्हणजे काय तर आपण सोशल मीडिया पागल झालोत, पण आपल्यापेक्षाही जास्त पागल सोशल जगात आहेत...
बरंय म्हणाचं आपलं अजून...

- निशांत महाजन

Web Title: We Are Not That Social!