शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

आयुष्यात मैत्री असेल तर आपण नशीबवान आहोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 6:55 PM

जगण्याच्या वाटेवर दोस्त बदलतीलही; पण आपण बदलत नाही, कारण आपल्यातला दोस्त आपल्याला बदलू देत नाही!

-निशांत महाजन

दोस्ती क्या है?क्या है दोस्ती?- या प्रश्नाचं उत्तर दोस्तहो, कुणाला देता आलंय, एका वाक्यात बरोबर?गाळलेल्या जागा भरा किंवा संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या असं म्हणत तरी कुठं येते दोस्ती आयुष्यात?तिला ना कुठले प्रमेय, ना कुठली गृहीतकं.पुस्तकातल्या कुठल्याच चौकटीत बसू नये आणि तरी जगण्याचं पुस्तक व्यापून उरावी अशी ही जादू आहे.ती जादू भेटते कशी? कुणाला? का?याची काही उत्तरं नाहीत, आहेत त्या फक्त जाणिवा, हिंदीत म्हणतात ना, सिर्फ एहसास! ये बतानेवाली, समझानेवाली चीज नहीं, ये सिर्फ महसूस की जा सकती है!खरं सांगायचं तर ती महसूसही नाही होत, किंवा महसूस करूनही नाही भागत, ती ‘निभवावी’ लागते, आणि जिथं मित्राचा संकटात निभाव लागतो तिथंच ती निभतेही, टिकतेही!आणि म्हणून हा फ्रेण्डशिप डे!ज्यानं त्यानं आपणच आपल्याला विचारावा हा प्रश्न की, खरंच आपण अशी दोस्ती निभावतोय का? दोस्त म्हटलं की फक्त विश्वास, स्वत:पेक्षाही जास्त त्याच्यावर जास्त भरवसा असा कुणी चेहरा येतो का डोळ्यासमोर?आपल्याआधी आपला विचार करणारा, आपले कान धरणारा, आपल्याला लागेल असं बोलणारा, आपला मनसोक्त अपमान करणारा, पाठीत चार फटके मारणारा आणि सारं जग आपल्याकडेच पाठ करून उभं राहिलं तरी आपली साथ न सोडणारा.असा कुणी मित्र असेलच आपला.तर आपण नशीबवान आहोत!***आपण कधी हरतो, थकतो कधी जगण्याच्या वाटेवरत्या वाटेवर आपल्याला हात देतो तो दोस्त.आपल्याला उभारी देतो, समजावतो, उमेद दाखवतो,पायाखालच्या वाटेवर नाही तर स्वत:च्या पावलावर विश्वास ठेव म्हणतो, तो असतो मित्र.असा कुणी असेलच आपला मित्र.तर आपण नशीबवान आहोत!*****शाळेत, आपल्याच बेंचवर बसून मोठा झालेला असतो तो,कुणी आपल्या शेजारी आपल्या ऑफिसच्या डेस्कशेजारीच डेस्क लावून बसतो,कुणी आपल्या बसमध्ये रोज असतो,कुणी येतो शेजारी अवचित राहायलाआणि मग प्रश्न पडतो की, इतकी वर्षे याच्याशिवाय कसं काय आपण जगत होतो आयुष्य? किती सहज आपण आपलं जगणं वाटून घेतलं त्याच्यासोबत? किती सहज आजवरचा प्रवास त्याच्यासह केल्यासारखंच जगतोय आपण आता.असा कुणी असेलच आपला मित्र.तर नशीबवान आहोत आपण!***मित्र मित्र म्हणता, मैत्रीण नसते का अशी कुणी?मुळात मित्र हा शब्द वाटत असला पुल्लिंगी तरी अपेक्षित असतं त्यात निरपेक्ष मैत्र.त्यामुळे मित्र काय नी मैत्रीण काय, त्यांना कुठं कळतात जगाची नाती?त्यांना कुठं समजतात तीच ती जुनी वेढी, ज्यात मित्रला लिंगभाव जोडला जातो,ज्यात मुलामुलींच्या मैत्रीला लावले जातात नियम,त्यापलीकडे असतं मैत्र.शारीर काही नसतं त्यात, असतं निखळ-अवखळ असं दोस्तीचं जिंदादिल रूप.ते रूप विसरून जातं, कोण मुलगा नी कोण मुलगी.त्यांना दिसतो फक्त आपला मित्र, दोस्त, आपलं मैत्र.असं निखळ नजरेचं आणि नितळ मनाचं असेल कुणी आपल्या आयुष्यात.तर खरंच समजा, नशीबवान आहोत आपण!***मग ऑनलाइन मैत्रीचं काय?की ऑनलाइन नसतात का मित्र? की ते नुस्ते लाइक्स आणि अंगठय़ांपुरते.तेवढय़ापुरतेच नसतात तिथंही काहीजण.तिथंही भेटते, निखळ मैत्री.होतात नव्या ओळखी.जुळतात मनाचे धागे आणि दोस्ती तिथंही दाखवतेच आपले रंग.फक्त तसा मित्र त्या आभासी जगात आपल्याला शोधता आला पाहिजे.त्यासाठी आपलीही नजर हवी स्पष्ट.त्या नजरेला सापडलंच असं मैत्रतर खरंच समजा, नशीबवान आहोत आपण!***सगळ्यात महत्त्वाचं. नसेलही आपल्या आयुष्यात असा कुणी मित्रतर आपण तसं होऊ!विश्वासानं मित्र जोडू, जिवाला जीव देऊ,मदतीला हात देऊ,निभावू दोस्ती.खरं सांगतो, तेवढं जरी जमलं.तरी नशीबवान आहोत आपण!