शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गावठीपणाचा शिक्का पुसलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 08:46 IST

शहरं भरभरून देतात, घ्यायचं काय हे आपण ठरवायचं!

- अविनाश बाळू मोरे

अळसुंदे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातलं एक छोटसं गाव. वडील वारले तेव्हा वय अवघं सात वर्षं होतं. तेव्हापासून आई आणि मी, माझा लहान भाऊ जवळच्याच मामाच्या गावात राहात होतो. माझं दहावीपर्यंतच शिक्षण मामाच्याच गावात झालं. काहीतरी करायची जिद्द ठेवणारा प्रत्येकजण मोठ्या शहराकडे धाव घेतो तसा मी ही धावलो. जगणं घडवण्याची जिद्द बाळगून शहरात कॉलेजला जायचं ठरवलं.घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी बार्शीला जायचा पर्याय निवडला. बार्शी तसं परवडणारं होतं. अकरावी-बारावीसाठी मी बार्शीत शिवाजी कॉलेजला प्रवेश घेतला. तो माझ्या शिक्षणाचा टर्निंग पॉइंट होता. छोट्याशा गावातून शहरात आल्यावर घरट्यातल्या पक्ष्याला आभाळाचं दर्शन झालं असंच म्हणावं लागेल. अभ्यासात थोडं दुर्लक्ष झालं म्हणून बारावीत मार्क्स कमी झाले; पण मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द अजून होती. राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करावा अशी मनात इच्छा होती; पण माझ्या आईच्या इच्छेखातर मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं.त्यासाठी मला पुणे-मुंबईसारख्या शहरात जायचं होत; पण इथेपण आर्थिक बाजू नको म्हणाली. शेवटी मी कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजात प्रवेश घेतला. कोल्हापूर जरी महानगर असलं तरी आपल्या मातीशी जोडलेलं होतं. मराठीचं रांगडेपण या मातीत अजूनही जिवंत आहे. इथं आल्यानं मला मनासारखं वाट्टेल ते करायचं स्वातंत्र्य मिळालं होतं. मी भरभरून जगलो.चार वर्षे होत आली. शेवटचं वर्ष हे करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं. इथं अडकला तर तो कायमचाच अडकतो. पण जर आपण ज्या उद्देशानं, जे मिळवायला इथं आलोय ते माझ्या लक्षात होतं. शेवटच्या वर्षात मोठ्या कंपनीत पदवी पूर्ण व्हायच्या आधी जॉबला लागणं हेच प्रत्येक इंजिनिअरचं स्वप्न असतं. मी गावातून आलेलो असल्यानं इथल्या शहरी मुलांच्या तुलनेत इंग्रजी भाषेत कमी पडायचो. इंग्लिश बोलता येत नसेल तर नामांकित कंपनीची स्वप्न सोडून द्यावी असा सगळ्यांचा सल्ला होता; पण मनात जिद्द पेटलेली होती. कॉलेजवर कॅम्प्स प्लेसमेंटसाठी येणारी पहिलीच मोठी कंपनी म्हणजे केपीआयटी. आपण याच कंपनीत प्लेस व्हायचं ही एकच जिद्द मनात ठेवून मी तयारी करत होतो. माझ्या तोडक्या-मोडक्या इंग्लिशची मित्र थट्टा करायचे; पण मी ठाम होतो. प्रयत्न करत होतो. माझ्या मोडक्या-तोडक्या इंग्लिशवर आणि मनातल्या जिद्दीवर शंभर विद्यार्थ्यांमधूनही मला नोकरी मिळाली. आईचं स्वप्न मी साकार केलं याचं मोठं सुख मनात होतं.मोठ्या शहराकडे देण्यासारखं खूप असतं; पण आपल्याला काय पाहिजे हे आपणच ओळखायंच असतं. गावाकडचा पोरगा, गावराण भाषाशैली म्हणून गावठी असा टॅग मलाही सुरुवातीला लावण्यात आला. पण असा विचार करणाºया, स्वत:ला उच्चशिक्षित शहरी म्हणवून घेणाºयांकडे मी साफ दुर्लक्ष केलं. त्यांना आपल्या कर्तृत्वानेच उत्तर द्यायचं असा सकारात्मक विचार केला.अळसुंदे ते कोल्हापूर अंतर तसं २५० किलोमीटरच, पण माझ्यासाठी हा प्रवास फार मोठा आणि महत्वाचा होता.माझ्यासारखे कित्येकजण गावातून शहरात येतात. स्वत:ची ओळख निर्माण करतात. गावापासून दूर येतात; पण तरी आपल्या मातीची ओढ मनात कायमच असते. गाव मनात असतंच...